संपूर्ण आयुष्य पर्यावरणासाठी समर्पित केलं, एक कोटी झाडांकडून ऑक्सिजन मिळवून देणारा देवमाणूस, अख्ख्या जगाचा सलाम !

काही ऋण हे कधीच फेडता येत नाहीत. आपण त्या ऋणांप्रती प्रामाणिकपणे कृतज्ञ राहायचं. कारण तोच एक चांगला मार्ग आहे (Story of Tree Man of India Daripalli Ramaiah).

संपूर्ण आयुष्य पर्यावरणासाठी समर्पित केलं, एक कोटी झाडांकडून ऑक्सिजन मिळवून देणारा देवमाणूस, अख्ख्या जगाचा सलाम !
Tree Man of India, एक कोटी झाडांकडून ऑक्सिजन मिळवून देणारा देवमाणूस
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 9:55 PM

मुंबई : काही ऋण हे कधीच फेडता येत नाहीत. आपण त्या ऋणांप्रती प्रामाणिकपणे कृतज्ञ राहायचं. कारण तोच एक चांगला मार्ग आहे. आम्ही आज ज्या व्यक्तीच्या कर्तव्याविषयी सांगणार आहोत त्या व्यक्तीचं व्यक्तीमहत्त्व इतकं मोठं आहे की, संपूर्ण जग आज त्या माणसाला आणि त्यांच्या कार्याला सलाम करतंय. विशेष म्हणजे ही व्यक्ती भारतात जन्माला आलीय. खरंतय हे आपल्या भारतीयांचं देखील चांगलं भाग्य आहे. या माणसाने देशात 1000 किंवा 2000 नाही तर तब्बल 1 कोटी पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी फक्त झाडे लावली नाही तर ती प्रत्येक झाडे जगवली देखील आहेत. त्यामुळे आज संपूर्ण जग त्यांच्या कार्याला सलाम करतं (Story of Tree Man of India Daripalli Ramaiah).

Tree Man of India

आम्ही ज्या पर्यावरण प्रेमीबाबत बोलतोय ती व्यक्ती म्हणजे दरिपल्ली रामय्या (Daripalli Ramaiah). दरिपल्ली रामय्या हे नाव आज जगभरातील पर्यावरण प्रेमी आदर्शाने घेतात. तेलंगाणाच्या खम्मम जिल्ह्यात राहणारे रामय्या आज 84 वर्षांचे झाले आहेत. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पर्यावरणासाठी समर्पित केलं. त्यांनी आतापर्यंत एक कोटी पेक्षाही जास्त झाडे लावले आहेत. विशेष म्हणजे त्यांचं झाडे लावण्याचं काम अद्यापही जारीच आहे. रामय्या फक्त झाले लावत नाहीत तर त्यांचं लहान मुलासारखं संगोपनही करतात. त्यामुळेच त्यांना जग Tree Man of India या नावाने ओळखतं. रामय्या यांना त्यांच्या कार्याबद्दल केंद्र सरकारने 2017 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानित केलं होतं. एवढंच नाही तर अॅकेडमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीसकडून त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल डॉक्टरेटची उपाधी दिली आहे (Story of Tree Man of India Daripalli Ramaiah).

आधी गावाच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार केला

दरिपल्ली रामय्या यांचं तेलंगणात रेड्डील्ली हे गाव आहे. त्यांनी आपल्या गावातूनच वृक्ष लागवडच्या मोहिमेला सुरुवात केली. त्यांनी आपल्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरात झाडे लावण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या गावाच्या पूर्व-पश्चिम दिशेला किलोमीटरच्या अंतरावर झाडे लावली. काही दिवसांनी गावाचा आजूबाजूचा परिसर पूर्णपणे हिरवागार झाला. गावाच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार केल्यानंतर ते आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊ लागले. तिथे ते झाडे लावू लागले.

झाडांच्या लागवडीसाठी 3 एकर जागा विकली

रामय्या जेव्हा घराबाहेर पडायचे तेव्हा त्यांच्या खिशात वेगवेगळ्या झाडांची बियाणे आणि सायकलवर रोपं असायचे. जिथे खाली जागा मिळेल तिथे ते झाडे लावायचे. त्यानंतर दररोज ते त्या ठिकाणी जाऊन झाडांचे संगोपनही करायचे. तिथे स्वत: प्रत्यक्षपणे जाऊन पाहणी करायचे. त्यांना वृक्षलागवडीचे इतका छंद होता की, त्यांनी बि-बियाणांसाठी आणि झाडांचे रोपे खरेदी करण्यासाठी स्वत:ची 3 एकर जमीन विकली होती.

आज ऑक्सिजनसाठी खूप वणवण, रामय्या यांचं मोठं काम

झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, असं आपल्याला शाळेत शिकवलं गेलंय. याशिवाय पाठ्यपुस्तकांमध्ये आपण हेच वाचत आलेलो आहोत. ऑक्सिजन या प्राणवायूचं नेमकं महत्त्व काय हे आपण कोरोना महामारीच्या संकटात प्रकर्षाने अनुभवलं. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. अनेक रुग्णांना आजही ऑक्सिजन घेण्यासाठी प्रत्येक श्वासासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सध्याचे ऑक्सिजन पुरवणारे जे झाडे आहेत त्यापैकी एक कोटी झाडे हे दरिपल्ली रामय्या यांनीच लावले आहेत. रामय्या यांचं हे काम आजच्या घडीला खरंच उपयुक्त ठरलं आहे.

हेही वाचा : ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा देणार, अजित पवारांची घोषणा 

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.