AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मीरच नाही, तर तुमच्या शेतातही सफरचंदाची शेती शक्य, कसं शक्य? वाचा इंदापूरचा यशस्वी प्रयोग

इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे खरं करुन दाखवलंय इंदापूर तालुक्यातील सणसर गावच्या प्रभाकर खरात यांनी. खरात यांनी सफरचंदाची शेती करून त्याचं यशस्वीरित्या उत्पादन घेतलंय.

काश्मीरच नाही, तर तुमच्या शेतातही सफरचंदाची शेती शक्य, कसं शक्य? वाचा इंदापूरचा यशस्वी प्रयोग
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 10:16 AM
Share

पुणे : इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे खरं करुन दाखवलंय इंदापूर तालुक्यातील सणसर गावच्या प्रभाकर खरात यांनी. खरात यांनी सफरचंदाची शेती करून त्याचं यशस्वीरित्या उत्पादन घेतलंय. याशिवाय जम्मू-काश्मीर व्यतिरिक्त इतर ठिकाणी सफरचंदाची लागवड कशी करावी याचं उत्तम मार्गदर्शन खरात कुटुंबीय करत आहेत.

प्रभाकर खरात हे मुळचे शिक्षक मात्र सेवा निवृत्त झाल्यापासून ते शेती करतात. शेती करत असताना एक वेगळा प्रयोग करायचा म्हणून त्यांनी सफरचंदाची लागवड करायची ठरवली. यासाठी त्यांनी दार्जिलिंगहून सफरचंदाची रोपं मागवली होती. या रोपांची लागवड करुन अवघ्या 15 ते 19 महिन्यात त्यांनी सफरचंदाचं पहिलं उत्पादन यशस्वीपणे काढलं. यामुळे परिसरात सफरचंदाची शेती चांगलीच चर्चेत आली‌‌य.

“एकूण 20 ते 25 प्रकारची वेगवेगळी उत्पादने यशस्वीपणे घेतली”

प्रभाकर खरात यांचा धाकटा मुलगा ही त्यांना शेतीत मदत करतो. सफरचंदाचा 10 गुठ्यांतील यशस्वी प्रयोग केल्यानंतर त्यांनी सिडलेस लिंबू, खायचा बदाम याशिवाय मसाल्याच्या पदार्थासह एकूण 20 ते 25 प्रकारची वेगवेगळी उत्पादने यशस्वीपणे घेतली आहे. याशिवाय ऊस उत्पादन किंवा नेहमीच्या पिकांपेक्षा सफरचंद, सिडलेस लिंबू, खायचा बदाम यातून अधिकचा नफाही त्यांना मिळतो आहे, अशी माहिती कालिदास खरात यांनी दिली.

योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केलं तर शेतीत नफा

योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केलं तर शेतीत कसा नफा होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे खरात कुटुंब आहे. यशस्वी प्रयोगानंतर ते इतर शेतकऱ्यांनाही उत्तम मार्गदर्शन करत आहेत. जम्मू-काश्मीर व्यतिरिक्त इतरही ठिकाणी सफरचंदाची शेती करता येते. याचा उत्तम प्रयोग इंदापूर तालुक्यातल्या सणसर येथील खरात गुरुजींनी करुन दाखवलाय.

हेही वाचा :

वजन कमी करण्यासाठी अॅपल साइडर व्हिनेगर फायदेशीर, मात्र ‘या’ गोष्टी कटाक्षाणे पाळा!

सुंदर त्वचा हवीय?, सफरचंदच्या सालीचा ‘हा’ फेसपॅक एकदा नक्की ट्राय करा!

त्रिपुराच्या युवा शेतकऱ्याची कमाल, काश्मिरी सफरचंदाच्या लागवडीतून 6 लाखांची कमाई

व्हिडीओ पाहा :

Successful Apple farming in Sansar village of Indapur Pune Know how

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.