वजन कमी करण्यासाठी अॅपल साइडर व्हिनेगर फायदेशीर, मात्र ‘या’ गोष्टी कटाक्षाणे पाळा!

अॅपल साइडर व्हिनेगर विशेषतः वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. हे पेय सेवन केल्याने मधुमेह टाईप 2, उच्च कोलेस्ट्रॉलसारखे आजार बरे होतात. अॅपल सायडर व्हिनेगरच्या फायद्यांविषयी बहुतेक लोकांना माहित आहे.

वजन कमी करण्यासाठी अॅपल साइडर व्हिनेगर फायदेशीर, मात्र 'या' गोष्टी कटाक्षाणे पाळा!
Apple Cider Vinegar

मुंबई : अॅपल साइडर व्हिनेगर विशेषतः वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. हे पेय सेवन केल्याने मधुमेह टाईप 2, उच्च कोलेस्ट्रॉलसारखे आजार बरे होतात. अॅपल सायडर व्हिनेगरच्या फायद्यांविषयी बहुतेक लोकांना माहित आहे. परंतु, अॅपल साइडर व्हिनेगर पिण्याचे नेमके प्रमाण आणि नेमका वेळ याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असते किंबहुना याबाबत संभ्रम असतो. (Keep these things in mind when including apple cider vinegar in the diet)

वजन कमी करण्याठी अॅपल साइडर व्हिनेगर अनेकजण पितात. मात्र, अॅपल साइडर व्हिनेगर पिताना अनेक गोष्टी आपण कटाक्षाणे पाळल्या पाहिजेत. अॅपल साइडर व्हिनेगर जास्त प्रमाणात पिणे मुळात चुकीचे आहे. एक ग्लास पाण्यामध्ये तीन चमचे अॅपल साइडर व्हिनेगर मिक्स केले पाहिजे. तसेच अॅपल साइडर व्हिनेगर घेतल्यानंतर किमान अर्धा तास दुसरे काहीही खाल्ले पिले पाहिजे नाही.

त्याचबरोबर काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रात्रीच्या वेळी अॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. याशिवाय तुम्हाला शांत झोप लागते, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते. अॅपल सायडर व्हिनेगर, मध आणि कोमट पाण्यात मिसळून प्या. जर, आपल्याला बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असेल, तर सकाळच्या वेळी अॅपल सायडर व्हिनेगर सेवन करा. सकाळी एका ग्लास पाण्यात, एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून सेवन केल्याने ही समस्या कमी होईल.

अॅपल साइडर व्हिनेगरमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे आपले वजन कमी करण्यात मदत करतात. याशिवाय, रक्तातील साखर देखील कमी करते, ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. हे व्हिनेगर आपल्या शरीरास कर्करोगापासून वाचवते आणि कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करते. कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्याबरोबरच तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Keep these things in mind when including apple cider vinegar in the diet)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI