AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rabi Season : हरभऱ्याचे क्षेत्र वाढले, आवकही वाढली दराचे काय? पीक कापणी मात्र जोमात

लातूर कृषी उत्पन्न बाजारपेठेत चर्चा ही सोयाबीनची असली तरी आवक मात्र, रब्बी हंगामातील हरभरा पिकाची आवक वाढत आहे. यंदा विक्रमी क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. पावसाने पेरणीला झालेला उशिर आणि कृषी विभागाने हरभराबाबत केलेली जनजागृती अखेर कामी आली असून ज्वारीच्या क्षेत्रात घट तर हरभऱ्यामध्ये वाढ असेच चित्र राज्यभरात आहे. त्यानुसार आता हरभऱ्याची आवकही सुरु झाली आहे. पहिल्या पेऱ्यातील हरभरा कापणी जोमात सुरु आहे.

Rabi Season : हरभऱ्याचे क्षेत्र वाढले, आवकही वाढली दराचे काय? पीक कापणी मात्र जोमात
रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या काढणीला सुरवात झाली आहे. उत्पादन वाढले दर घटले अशी स्थिती आहे.
| Updated on: Feb 24, 2022 | 12:15 PM
Share

लातूर : लातूर कृषी उत्पन्न बाजारपेठेत चर्चा ही सोयाबीनची असली तरी आवक मात्र, (Rabi Season रब्बी हंगामातील (Chickpea Crop) हरभरा पिकाची आवक वाढत आहे. यंदा विक्रमी क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. पावसाने पेरणीला झालेला उशिर आणि (Agricultural Department) कृषी विभागाने हरभराबाबत केलेली जनजागृती अखेर कामी आली असून ज्वारीच्या क्षेत्रात घट तर हरभऱ्यामध्ये वाढ असेच चित्र राज्यभरात आहे. त्यानुसार आता हरभऱ्याची आवकही सुरु झाली आहे. पहिल्या पेऱ्यातील हरभरा कापणी जोमात सुरु आहे. हे सर्व असले तरी बाजारपेठेत हरभऱ्याला केवळ 4 हजार 800 रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन वाढले की काय अवस्था होते यावरुन लक्षात येत आहे. दुसरीकडे खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने या पिकांना विक्रमी दर मिळत आहे तर हरभऱ्याला आता हमीभाव केंद्राचाच आधार घ्यावा लागणार आहे.

हरभरा पिकाची सर्वाधिक आवक

गेल्या चार महिन्यात दिवसाकाठी जेवढी आवक सोयाबीनच्या झाली नाही त्यापेक्षा अधिकची आवक ही हरभरा पिकाची होत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला 25 हजार पोते हे हरभऱ्याचे दाखल होत आहेत. मात्र, दर हा 4 हजार 800 पेक्षा अधिकचा मिळालेला नाही. हंगामाच्या सुरवातीलाच ही अवस्था तर भविष्यात काय असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. सध्या कापणी कामे जोमात सुरु आहेत. भविष्यात आवक वाढून दर घसरतील यामुळे मळणी झाली की थेट विक्रीच हा एकसुत्री कार्यक्रम मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी हाती घेतलेला आहे.

हरभरा पिकाला आता हमीभाव केंद्राचाच आधार

हरभऱ्याचीही हमीभावाने खरेदी व्हावी त्याअनुशांने खरेदी केंद्र उभारण्यााच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय ज्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर विक्री करायची आहे त्यांच्यासाठी नोंदणीही सुरु झाली आहे. 15 फेब्रुवारी 15 मार्च दरम्यान नोंदणी आणि त्यानंतर प्रत्यक्ष खरेदी सुरु होणार आहे. यंदा केंद्र सरकारने 5 हजार 230 रुपये दर ठरवून दिला आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावरील विक्री हाच शेतकऱ्यांसमोर पर्याय आहे. कारण खुली बाजारपेठ आणि खरेदी केंद्रवरील दर यामध्ये 400 रुपयांची तफावत आहे.

अशी आहे नोंदणीची प्रक्रिया

धान्य विक्रीपूर्वी शेतकऱ्यांना आपल्या धान्याची नोंद ही खरेदी केंद्रावर करावी लागते. त्यानुसार आधार कार्ड, सातबारा, 8 अ उतारा, तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा पीक पेरा उतारा किंवा हरभरा पिकाच्या नोंद असलेला सातबारा, आधार लिंक असलेले बँक पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत.

संबंधित बातम्या :

Coconut Farming : काय सांगता? मराठवाड्यातही नारळाच्या बागा, कृषी तज्ञांनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र..!

शेतकऱ्यांना मिळतोय जोडव्यवसयाचा ‘आधार’, गायीच्या दूधदरात अखेर वाढ?

Good News : केळीचा गोडवा वाढला, व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचला

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.