AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural Department : शेतकऱ्यांनी शेत सोडले अन् कृषी विभागाने त्याचे नंदनवन केले, रायगड कृषी विभागाचा प्रेरणादायी उपक्रम

पोलादपूर तालुक्यातील देवपूर हे सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले गाव आहे. मात्र, या भागातील शेतकरी हे मुंबई, पुणे जवळ करुन उदरनिर्वाह करतात. या गावातून जवळपास सर्वच ग्रामस्थ हे स्थलांतरित झाल्याने शिवारातील 26 एकर क्षेत्र हे पडीक होते. केवळ एक शेतकरी पांरपरिक पध्दतीने शेती करीत होता. येथील कृषी विभागाने शिवारात सामुदायिक शेती करण्याचा निर्धार केला आणि आता चित्र बदलत आहे.

Agricultural Department : शेतकऱ्यांनी शेत सोडले अन् कृषी विभागाने त्याचे नंदनवन केले, रायगड कृषी विभागाचा प्रेरणादायी उपक्रम
रायगड कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमिन कसली गेली आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 12, 2022 | 3:03 PM
Share

रायगड : आतापर्यंत आपण शेतकऱ्यांनी शेतामध्ये केलेल्या नवनवीन उपक्रम पाहिले आहेत. भले ते (Agricultural Department) कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली का असेना पण तो प्रयोग शेतकऱ्यांचा असतो. पण (Raigad) रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची शेती चक्क कृषी विभागाने कसली आहे. अहो खरंच.. पोलादपूर तालुक्यातील देवपूर येथील शिवारात हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून गेल्या काही वर्षापासून पडीक पडलेल्या या जमिनीवर आता (Paddy Crop) धान पीक जोमात बहरणार आहे. शेतकऱ्यांची जमिन अन् कृषी विभागाने कशी कसली असा प्रश्न पडला असेल पण त्याचे कारणही तसेच आहे. पण कृषी पोलादपूर कृषी कार्यलय व गुरुकृपा शेतकरी गटाच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. सामुदायिक शेतीचे उत्तम उदाहरण या माध्यमातून समोर आले असून या शिवाारातील 26 एकरातून यंदा धान पिकाचे उत्पादन घेतले जाणार आहे.

नागरिकांच्या स्थलांतरामुळे जमिन पडीक

पोलादपूर तालुक्यातील देवपूर हे सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले गाव आहे. मात्र, या भागातील शेतकरी हे मुंबई, पुणे जवळ करुन उदरनिर्वाह करतात. या गावातून जवळपास सर्वच ग्रामस्थ हे स्थलांतरित झाल्याने शिवारातील 26 एकर क्षेत्र हे पडीक होते. केवळ एक शेतकरी पांरपरिक पध्दतीने शेती करीत होता. येथील कृषी विभागाने शिवारात सामुदायिक शेती करण्याचा निर्धार केला आणि आता चित्र बदलत आहे. पडीक क्षेत्रावर यंदा धानाची लागवड केली आहे. याकिरता सर्व कृषी विभाग आणि गुरुकृपा शेतकरी गटाचे सर्व सदस्य हे सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर दाखल झाला होता.

26 एकरामध्ये भात शेती

रायगड जिल्ह्यामध्ये धान पीक हे मुख्य पीक आहे. देवपूर शिवारातील 26 एकरावर देखील धान पिकाचेच उत्पादन घेतले जाणार आहे. त्याअनुशंगाने शेतीची मशागत करुन येथील पडीक क्षेत्र पेरणीयोग्य करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या या पुढाकाराने शहरात गेलेले ग्रामस्थही धान पिकाच्या लागवडीसाठी गावाकडे परतले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने ठरवले तरी माळरानाचेही नंदनवन होऊ शकते याचे उदाहरण सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर पाहवयास मिळाले आहे.

टोकण पध्दतीने धानाची लागवड

कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि गुरुकृपा शेतकरी गटाचा सहभाग यामुळे माळरानावर ते ही टोकन पध्दतीने धानाची लागवड केली गेली आहे. टोकण पध्दतीने लागवड केल्यास उत्पादनात वाढ होते त्यामुळे हा प्रयोग करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पडीक असलेल्या या गावच्या शिवारात यंदा धान पीक बहरणार असल्याने ग्रामस्थांमध्येही एक वेगळाच आनंद आहे. या गुरुकृपा शेतकरी गटानेच पीक जोपासण्याचीही जाबाबदारी घेतली आहे. कृषी विभागाचा हा एक वेगळा उपक्रम असून राज्यातील इतर जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.