AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

द्राक्षातील दर निश्चितीचा उपक्रम आता पपईसाठीही, नियम मोडणार की टिकणार..!

शेतीमालावर झालेला खर्च, वाातावरणातील बदल आणि पदरी पडलेल्या मालाचे काय मुल्य असावे याबाबत आता स्थानिक पातळीवरच निर्णय होऊ लागले आहेत. उत्पादनावर झालेला खर्च आणि त्या तुलनेत किती नफा असावा हे धोरण ठरवून दर निश्चित केले जात आहेत. यापूर्वी नाशिक, सोलापूर आणि सांगली येथे द्राक्षाचे दर निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार काही भागांमध्ये विक्रीही सुरु आहे. आता अशाच प्रकारचा निर्णय खानदेशात पपई उत्पादक, बाजार समिती आणि खरेदीदारांनी घेतला आहे.

द्राक्षातील दर निश्चितीचा उपक्रम आता पपईसाठीही, नियम मोडणार की टिकणार..!
नंदूरबारमध्ये पपईचे दर ठरल्यामुळे आता पुन्हा 15 दिवसानंतर तोड सुरु झाली आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 22, 2022 | 11:39 AM
Share

जळगाव : शेतीमालावर झालेला खर्च, (Climate Change) वाातावरणातील बदल आणि पदरी पडलेल्या मालाचे काय मुल्य असावे याबाबत आता स्थानिक पातळीवरच निर्णय होऊ लागले आहेत. उत्पादनावर झालेला खर्च आणि त्या तुलनेत किती नफा असावा हे धोरण ठरवून दर निश्चित केले जात आहेत. यापूर्वी नाशिक, सोलापूर आणि सांगली येथे द्राक्षाचे दर निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार काही भागांमध्ये विक्रीही सुरु आहे. आता अशाच प्रकारचा निर्णय खानदेशात (Papaya Production) पपई उत्पादक, बाजार समिती आणि खरेदीदारांनी घेतला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे निर्णय घेण्याचे ठरले होते पण एकमत न झाल्याने हा निर्णय रखडला होता. आता पपई काढणी सुरु झाल्याने हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ असल्याने प्रति किलो (Papaya Rate) 8 रुपये दरनिश्चित करण्यात आला आहे. एकमुखाने हा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात खरेदी-विक्री होताना त्याची अंमलबजावणी होणेही गरजेचे आहे. अन्यथा यामध्ये फूट पडली तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याबाबत शहादा बाजार समितीमध्ये निर्णय झाला आहे. सध्या हंगाम जोमात सुरु असून या निर्णयाचा शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना फायदा होणार आहे.

उत्पन्नापेक्षा नुकसानच अधिक

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. सर्वाधिक फटका फळबागायत शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. त्यामुळे खानदेशातील अनेक शेतकऱ्यांनी पपई बागाची मोडणी करुन इतर पिकांचा पर्याय निवडला. तर काहींनी तळहाताच्या फोडाप्रमाणे बागा जोपासल्या. आता प्रत्यक्ष विक्रीची वेळ आली असताना व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने मागणी होत आहे. त्यामुळे उत्पादनावर झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नसल्याने हा दर निश्चित केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

काय आहे बाजारपेठेतले चित्र?

पपई उत्पादनात मोठी घट झाल्याने आहे त्या शेतीमालाला चांगला दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यानुसारत शाहदा बाजार समितीमध्ये झालेल्या बैठकीत हा दर ठरवून घेण्यात आला आहे. असे असले तरी खानदेशात सध्या सरासरी 16 टन पपईची आवक होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातून अधिकची आवक असून त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावातील चोपडा, यावल, जामनेर, मुक्ताईनगर येथून आवक सुरु आहे. वाढत्या उष्णतेमध्ये स्थानिक बाजार पेठेत मागणी नसली तरी राजस्थानमधून मागणी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जे नुकसान निसर्गामुळे झाले आहे त्याची तर भरपाई व्हावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करी आहेत.

निर्णय झाला टिकवणे महत्वाचे…

जानेवारीमध्ये द्राक्ष काढणीला वेग येताच नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक संघानेही महिन्यानुसार द्राक्षाचे दर निश्चित केले होते. पण काळाच्या ओघात व्यापाऱ्यांनी याला विरोध केला. निर्यातीसाठी ठरलेला दर परवडत नसल्याचे सांगून नियमाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे आता खानदेशात पपईचे ठरलेले दर आणि त्यासंबंधीची नियमावलीची अंमलबजावणी होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Cotton Crop: इतिहासात पहिल्यांदाच पांढऱ्या सोन्यानं कात टाकली, व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा, शेतकऱ्याला आनंदाचं भरतं!

देर आए… दुरुस्त आए..: ज्वारी पिकाला मिळणार गतवैभव, स्थानिक पातळीवर काय होणार प्रयत्न ? वाचा सविस्तर

FRP : ज्याची धास्ती शेतकऱ्यांना ‘तोच’ निर्णय राज्य सरकारचा, ‘एफआरपी’ बाबत नेमके काय झाले?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली