परदेशी तेलबिया ‘जोजोबा’ची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा, जाणून घ्या सर्वकाही

उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांसमोर नवनवे पर्याय समोर येत आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्याला मागणी आहे त्या पिकाची देखील शेतकरी लागव़ड करु शकतात. जोजोबा शेती हा त्यामधलाच प्रकार आहे पण गेल्या काही वर्षांपासून याचे उत्पादन हे भारतामध्येही वाढत आहे. जोजोबा ही विदेशी वंशाची वनस्पती आहे.भारतातही आता याच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. राजस्थानातील शेतकरी जोजोबा रोपांची लागवड करीत आहेत. ही एक राजस्थानी वनस्पती आहे.

परदेशी तेलबिया 'जोजोबा'ची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा, जाणून घ्या सर्वकाही
विदेशी वनस्पती असलेल्या जोजोबाची लागवड भारत देशामध्ये वाढत आहे,
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 4:23 PM

मुंबई : उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांसमोर नवनवे पर्याय समोर येत आहेत. यामध्ये (International Market) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्याला मागणी आहे त्या पिकाची देखील शेतकरी लागव़ड करु शकतात. जोजोबा शेती हा त्यामधलाच प्रकार आहे पण गेल्या काही वर्षांपासून याचे उत्पादन हे भारतामध्येही वाढत आहे. (Jojoba Plant) जोजोबा ही विदेशी वंशाची वनस्पती आहे. भारतातही आता याच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. (Rajasthan) राजस्थानातील शेतकरी जोजोबा रोपांची लागवड करीत आहेत. ही एक राजस्थानी वनस्पती आहे. अशा परिस्थितीत त्याच्या रोपट्याला जास्त पाण्याची गरज भासत नाही. भारतामध्ये ज्याप्रमाणे मोहरी, राई, शेंगदाणे, तीळ, सोयाबीन व सूर्यफूल यांपासून तेल काढले जाते. त्याचप्रमाणे जोजोबा हे परदेशी तेलबियांचे पीकही आहे.अॅरिझोना, मेक्सिको आणि दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये याच्या गेल्या अनेक वर्षापासून उत्पादन घेतले जाते. आता भारतातही याची लागवड केली जात आहे. जोजोबा हा एक भाजीचा प्रकार असून याच्या बियांपासून 45 ते 55 टक्के तेल काढले जाते. इस्त्राईलमध्ये याच्य़ा लागवडीला प्रारंभ झाला होता. याच देशामध्ये सर्वाधिक उत्पादन घेतले जात आहे. सुरवातीला लोक व्हेल माशाची शिकार करून तेल बाहेर काढत असत, ज्यामुळे व्हेलची प्रजाती नष्ट होऊ शकते. त्यामुळेच त्याच्या शिकारीवर बंदी घातली गेली, मग इतर पर्यायांचा शोध सुरू झाला आणि जोजोबाला वनस्पती यामध्ये समोर आली.

भारतामध्ये कुठे केली जाते लागवड

जोजोबाची लागवड भारतातील राजस्थान येथे केली जात आहे. येथील शेतकरीही जोजोबा निर्यात करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. जोजोबाच्या गुणांमुळे त्याला परदेशात प्रचंड मागणी आहे. अल्पाधीतच भारतामधील जोजोबाला मागणी वाढत आहे.जोजोबा तेलाची किंमत जास्त असल्याने कॉस्मेटिक कंपन्या सध्या उत्पादनांमध्ये त्याचा वापर करत आहेत. जोजोबा तेल गंधहीन आणि उत्तम प्रतीचे आहे . याचे महत्व कळावे म्हणून राजस्थान सरकारने असोसिएशन ऑफ राजस्थान जेजोबा वृक्षारोपण संशोधन प्रकल्पाची स्थापना केली आहे. जोजोबाच्या बियांवर प्रक्रिया करून देश-विदेशात विक्री केली जाते, त्यासाठी सर्वप्रथम शेतातील बियाणे गोळा केले जाते. नंतर ते सावलीत वाळवले जातात. त्यांच्या बिया सुकण्यास वेळ लागतो. तीन टक्क्यांपर्यंत ओलावा आल्यावर त्यांची सालं बाहेर काढून पोत्यात भरून घेतली जातात.

अशाप्रकारे जोजोबातून उत्पन्नही मिळते

जोजोबाची बियाणे प्रक्रिया प्रकल्पात टाकून दळून घेतले जातात. त्यामुळे त्याच्यातून तेल बाहेर पडू लागते.हे तेल फिल्टरने गाळले जाते आणि फिल्टर केलेले तेल स्टेनलेस स्टीलच्या टाक्यांमध्ये गोळा केले जाते. गरजेनुसार छोटे-मोठे पॅकिंग करून बाजारात पाठवले जाते. गेल्या काही वर्षांत जोजोबाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. वाढीव उत्पादनामुळे भारतामधून त्याची निर्यात इतर देशांनाही होत आहे. हे कमी पाण्यात सहजपणे वाढवता येते. वाढती मागणी लक्षात घेता जोजोबाचे अनेक प्रोसेसिंग युनिटही सुरू करण्यात येऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालाला मागणीही वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून याकडे पाहिले तर उत्पादनात वाढ होणार आहे.

संबंधित बातम्या :

निसर्गाचा लहरीपणा : महिन्याभरापूर्वी पाण्यामुळे तर आता पाण्याविना पिकांचे नुकसान, कांदा उत्पादकांवर अशी ‘ही’ वेळ

सातबारा उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब, क्षेत्र वहिताखाली अन् उत्पादनातही होणार वाढ

Latur Market: जे शेतकऱ्यांच्या मनात तेच सोयाबीनच्या बाजारात, अखेर चार महिन्यानंतर…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.