AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madha : कहाणी साखर कारखान्याची निवडणुकीची, 4 टर्मपासून श्रीसंत कुर्मदास साखर कारखाना बिनविरोध, नेमके गुपित काय ?

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने हे पश्चिम महाराष्ट्रात आहेत. शिवाय माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे गाळप हे देशात सर्वाधिक असते. असे वेगळेपण असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पडसाळीचा श्रीसंत कुर्मदास साखर कारखान्याची निवडणुक ही बिनविरोध होत आहे. याला कारणही तसेच आहे.

Madha : कहाणी साखर कारखान्याची निवडणुकीची, 4 टर्मपासून श्रीसंत कुर्मदास साखर कारखाना बिनविरोध, नेमके गुपित काय ?
श्रीसंत कुर्मदास साखर कारखानाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 11, 2022 | 4:02 PM
Share

माढा : एखाद्या विधानसभा सदस्याला जेवढे महत्व आहे तेवढेच (Sugar Factory) साखर कारखान्याच्या चेअरमनला. यामध्ये (Western Maharashtra) पश्चिम महाराष्ट्रात तर चेअरमन यांचा रुबाब काही वेगळाच असतो. सध्या पश्चिम महारष्ट्रात साखर कारखाना (Election) निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक मात्तबरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. असे असताना वेगळेपण ठरत आहे ते माढा तालुक्यातील पडसाळीच्या श्रीसंत कुर्मदास साखर कारखाना याचे. सलग चौथ्या वेळेस या साखर कारखान्याची निवडणुक ही बिनविरोध झाली आहे. कारखान्याच्या 17 संचालकांच्या जागेसाठी 17 जणांचेच अर्ज आणि छाननीच्या दिवशी निवडणुक निर्णय अधिकारी यांनी अर्जाची तपासणी केले असता सर्व अर्ज वैध ठरले. यामुळे पुन्हा चेअरमन पदी माजी आ. धनाजीराव साठे यांची नियुक्ती झाली आहे.

कारखाना निवडणुकीचे वेगळेपण काय ?

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने हे पश्चिम महाराष्ट्रात आहेत. शिवाय माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे गाळप हे देशात सर्वाधिक असते. असे वेगळेपण असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पडसाळीचा श्रीसंत कुर्मदास साखर कारखान्याची निवडणुक ही बिनविरोध होत आहे. याला कारणही तसेच आहे. कारखान्याचे चेअरमन माजी आ. धनाजी साठे यांनी शेतकऱ्यांचे ऊस बील देण्यासाठी चक्क स्वत:ची मालमत्ता गहाण ठेवली जात होती. चेअरमन पदी असताना त्यांनी अशा प्रकारे पाऊल उचलीत शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा दिला होता. त्याची उतराई आता शेतकरी करीत आहेत. गेल्या 4 टर्मपासून कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध होत आहे.

स्व. विलासराव देशमुख यांच्या सहकार्यातून कारखाना उभारला

स्व. विलासराव देशमुख आणि धनाजीराव साठे हे जवळचे मित्र होते. माढा तालुक्यात उसाच्या उत्पादनासाठी पोषक वातावरण आणि साखर कारखान्यांची संख्या पाहता तालुक्यातील पडसाळी येथे साखर कारखाना उभा कऱण्याचे ठरले होते. दरम्यान, विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री पदी असताना त्यांनी हा कारखाना उभारणीसाठी सहकार्य केले होते. 2005 पासून या कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध होत आहे. यंदा चौथ्यावेळीही निवडणुक बिनविरोधच झाली आहे.

बिनविरोध निवडणूक होताच जल्लोष

सलग चौथ्या टर्मला श्रीसंत कुर्मदास साखर कारखान्याची निवडणुक ही बिनविरोध झाली आहे. तर दुसरीकडे लगतच्या मोहोळ, पंढरपूर तालुक्यांमध्ये कारखान्याच्या निवडणुकाही चुरशीच्या होत आहेत. यंदाची निवडणुक पार पडताच चेअरमन पदी धनाजीराव साठे यांचीच नियुक्ती झाली आहे. संचालकांच्या निवडी होताच साठे समर्थकांनी कारखाना परिसरात एकच जल्लोष केला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.