Jalgaon : केळीची बाग आगीच्या भक्ष्यस्थानी, कापणी सुरु असतानाच नेमकं घडले काय ?

केळी हे बारमाही बाजारपेठेत असलेले पीक असले तरी सध्याच्या वाढत्या उन्हामुळे मागणी वाढली होती. त्यामुळे दरातही वाढ झाली होती. याचा फायदा होईल असे शेतकरी महेश पाटील यांना वाटत होते. मात्र, अवघ्या काही क्षणात त्यांचे स्वप्न तर धुळीस मिळालेच पण यामध्ये त्यांचे 15 लाखाचे नुकसान झाले आहे. सध्या काही केळीच्या खोडाची कापणी झाली होती पण अधिकचे नुकसानच या घटनेत झाले आहे.

Jalgaon : केळीची बाग आगीच्या भक्ष्यस्थानी, कापणी सुरु असतानाच नेमकं घडले काय ?
शॉर्टसर्किटमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या केळी बागेचे नुकसान झाले आहे.
Image Credit source: TV9 Marathi
अनिल आक्रे

| Edited By: राजेंद्र खराडे

Apr 27, 2022 | 12:40 PM

जळगाव : जिल्ह्यात केळी बागाचे मोठे क्षेत्र आहे. मध्यंतरीच्या वातावरणातील बदलावर शेतकऱ्यांनी मात केली मात्र असे असूनही यावल साकळी येथील शेतकरी आपली (Banana Crop) केळीची बाग वाचवू शकला नाही. शॉर्टसर्किटमुळे आतापर्यंत (Sugarcane) ऊसाचे फड पेटले होते. अशा अनेक घटना राज्यातील विविध भागांमध्ये घडल्या आहेत. मात्र, कापणी सुरु असतानाच (Short Circuit) शॉर्टसर्किटमुळे केळीची बाग उध्वस्त झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील साकळी शिवारात घडली आहे. त्यामुळे शेतकरी महेश पाटील यांचे न भरुन निघणारेच नुकसान झाले आहे. विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामुळे हा प्रकार घडला आहे. यामध्ये त्यांचे 15 लाखाचे नुकसान झाले आहे.

दृष्टीक्षेपातील उत्पादन आगीने उध्वस्त

केळी हे बारमाही बाजारपेठेत असलेले पीक असले तरी सध्याच्या वाढत्या उन्हामुळे मागणी वाढली होती. त्यामुळे दरातही वाढ झाली होती. याचा फायदा होईल असे शेतकरी महेश पाटील यांना वाटत होते. मात्र, अवघ्या काही क्षणात त्यांचे स्वप्न तर धुळीस मिळालेच पण यामध्ये त्यांचे 15 लाखाचे नुकसान झाले आहे. सध्या काही केळीच्या खोडाची कापणी झाली होती पण अधिकचे नुकसानच या घटनेत झाले आहे.

15 लाखाचे नुकसान

साकळी शिवारात महेश पांडूरंग पाटील यांनी 7 हजार 500 केळीच्या खोडाची लागवड केली होती. वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग जोपासल्यानंतर आता कुठे कारणीला सुरवात झाली होती. तर दुसरीकडे पिल बाग उभा होता. या पिल बागाला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी शेतात पाइपलाइन टाकली होती. हे सर्व सुरु असतानाच अचानक केळीच्या बागेला आग लागली आहे. यामध्ये केळी पिकाचे तर नुकसान झालेच पण पाईपलाईन आणि ठिबकच्या नळ्याही जळून खाक झाल्या आहेत.

नुकसानभरपाईची मागणी

यंदा प्रत्येक पिकावर अवकाळीची अवकृपा राहिलेली आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये पाटील यांनी केळी बोग जोपासली. पण महावितरणच्या हलगर्जीपणामुळे पाटील यांचे नुकसान टळले नाही. विद्युत तारांच्या घर्षणामुळे झालेल्या दुर्घटनेत त्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे पाटील यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें