AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : शेत मजुरावर वन्य प्राण्यांचा हल्ला, जखमी मजुरावर उपचार सुरु

आतापर्यंत वन्यप्राण्यांमुळे रबी हंगामातील पिकांचे नुकसान होत होते. पण पाण्याच्या शोधात असलेले वन्यप्राणी आता कशालाही भिक घालत नाहीत. सध्याच्या वाढत्या उन्हामुळे जंगली भागातील पाणवट्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात शेत शिवारात आलेल्या रान डुक्कारांनी शेतमजुरावर हल्ला केल्याची घटना हादगाव तालुक्यातील कोथळा गावात घडली आहे.

Nanded : शेत मजुरावर वन्य प्राण्यांचा हल्ला, जखमी मजुरावर उपचार सुरु
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात शेती काम करीत असताना झालेल्या वन्यप्राण्याच्या हल्ल्यात शेतमजुर जखमी झाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 19, 2022 | 11:24 AM
Share

नांदेड : आतापर्यंत वन्यप्राण्यांमुळे (Rabi Season) रबी हंगामातील पिकांचे नुकसान होत होते. पण पाण्याच्या शोधात असलेले (Wild Animal) वन्यप्राणी आता कशालाही भिक घालत नाहीत. सध्याच्या वाढत्या उन्हामुळे जंगली भागातील पाणवट्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात शेत शिवारात आलेल्या रान डुक्कारांनी (Farm Worker) शेतमजुरावर हल्ला केल्याची घटना हादगाव तालुक्यातील कोथळा गावात घडली आहे. सोमवारी देविदास वानखेडे हे शेतामध्ये शेती मशागतीचे काम करीत होते. पाण्याच्या शोधात असलेल्या रानडुक्करांनी अचानक पाठीमागून त्यांच्या हल्ला चढविला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शेतशिवरात शुकशुकाट, वन्यप्राण्यांना रान मोकळे

सध्या रब्बी हंगामातील कामे संपलेली आहेत. शिवाय वाढत्या उन्हामुळे शेताकडे कोणी फिरकत नाही. पण देविदास वानखेडे हे मजुरीने शेती मशागतीच्या कामासाठी गेले होते. भर दुपारच्या वेळी पाण्याच्या शोधात रानडुक्कर हे शिवार पालथा घालत होते. दरम्यान, वानखेडे हे बैलजोडीच्या मदतीने शेत कोळपण्याचे काम करीत असताना अचानक पाठीमागून त्यांच्यावर रानडुक्करांचा हल्ला झाला आहे. यामध्ये ते जखमी झाले आहेत.

शासकिय रुग्णालयात उपचार सुरु

रानडुक्काराच्या हल्ल्यातून वानखेडे यांनी कसाबसा आपला बचाव केला शिवाय सदरील घटनेची माहिती शेती मालक व इतरांना फोनवरुन दिली. त्यानंतर ग्रमस्थांनी शेत जवळ करीत त्यांना हदगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताला मार लागला आहे.

कृत्रिम जलसाठ्यांवर वन्यप्राण्याची भागतेय तहान

नांदेडच्या किनवट तालुक्यातील जंगलातील नैसर्गिक जलसाठे आटून गेल्याने हरणाचा कळप कृत्रीम जलसाठ्यावर येताना दिसत आहेत.विभागाने तयार केलेल्या कृत्रिम जलसाठ्यावर हरीण येऊन पाणी पीत असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेयत. पैनगंगा नदीचे पाणी आटल्यामुळे किनवट तालुक्यात सध्या पाणीटंचाई सदृश्य स्थिती निर्माण झालीय, त्यामुळे वन विभागाने तयार केलेल्या पाणवठ्यावर वन्यप्राणी तहान भागवत आहेत.

संबंधित बातम्या :

Pune: काळीज चर्रर्रर्र…..! सख्खे बहीण-भाऊ सायकलवर खेळता खेळता कॅनलमध्ये पडले, जागीच मृत्यू

Curfew in Achalpur | अचलपुरात संचारबंदीचा दुसरा दिवस, शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा पुढं ढकलल्या; गावात तणावपूर्ण शांतता

Beed : उसाच्या शेतामध्ये गांजाचे आंतरपिक, उसापेक्षा गांजाच वाढल्याने फुटले भिंग

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...