Jeep Wrangler मेड इन इंडियाअंतर्गत लाँच होणार, किंमत कमी होणार?

मेड इन इंडिया जीप रँगलर (Jeep Wrangler) मार्चमध्ये लाँच होणार, कंपनीची मार्केटमध्ये 180 कोटी रुपयांची गुंतवणूक

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:32 PM, 24 Feb 2021
Jeep Wrangler मेड इन इंडियाअंतर्गत लाँच होणार, किंमत कमी होणार?
2021 Jeep Wrangler

मुंबई : जीप इंडिया (Jeep India) कंपनी Wrangler ही कार लोकली असेंबल करत आहे आणि आता हे मेड इन इंडिया मॉडेल पुढील महिन्यात भारतात लाँच होण्यास सज्ज झाले आहे. जीप इंडिया लोकली असेंबल्ड Jeep Wrangler कार 1 मार्च रोजी लाँच करणार आहे. ही कार कंप्लीटली नॉक्ड डाऊन म्हणजेच CKD यूनिट म्हणून विकली जाईल. स्टेलांटिस इंडियाने महाराष्ट्रातील राजनंदगांव प्लांटमध्ये जीप रँगलरचं असेम्बलिंग सुरु केलं आहे. (2021 Jeep Wrangler will be launched under Made in India prices may decrease)

2021 Jeep Wrangler ची किंमत किती आहे ते 15 मार्चला कळेल. दरम्यान, देशभरातील 26 डीलरशिपवर या कारसाठी बुकिंग सुरू करण्यात आली आहे. ही कार भारतात असेंबल केल्यामुळे या एसयूव्हीवरील कर आकारणी कमी होईल आणि त्याचा फायदा ग्राहकांना मिळेल. असा अंदाज आहे की नवीन एसयूव्हीची किंमत तिच्या जुन्या मॉडेलपेक्षा कमी असेल. असं म्हटलं जातंय की, ही एसयूव्ही मर्सिडीज बेंझ जी-क्लास आणि लँड रोव्हर डिफेंडरशी स्पर्धा करेल. जीप इंडियाने म्हटले आहे की, ते बाजारात 180 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे त्यांच्या लोकल उत्पादनात आणखी वाढ होईल.

जीप रँगलर 2020 मध्ये 63.94 लाख (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) किंमतीमध्ये लाँच केली होती आणि मागील वर्षी या कारची फक्त पहिली बॅच विकण्यात आली होती. जीप रँगलर एक अपडेटेड आणि रिवाईज्ड डॅशबोर्डसह येते. या कारमध्ये युकनेक्ट 4 सी एनएव्ही 8.4 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. ही प्रणाली नेव्हिगेशन, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोसह येते. यामध्ये तुम्हाला ड्युअल झोन स्वयंचलित हवामान नियंत्रण आणि इतर वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

काय आहेत जीप रँगलरची वैशिष्ट्ये?

नवीन रेंगलर जीपमध्ये पॅसिव किलेस एन्ट्री, पुश बटन स्टार्ट आणि बाकी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. रेंगलरमध्ये तुम्हाला 5 सीटर कॅबिन लेआउट मिळते जे प्रीमियम लेदर आणि डॅशबोर्डसह येत असून सॉफ्ट फिल देते. एसयूव्हीमध्ये आपणास डिफ लॉक देखील मिळतात जे आपण इलेक्ट्रॉनिक स्विचसह सक्रिय करू शकता. हे स्विच सेंटर कन्सोलमध्ये दिले जाईल. या कारमध्ये तुम्हाला हाय आणि लो मोडसह 4 व्हील ड्राईव्ह मोड मिळेल. कारला 2.0 लिटरचे वॉर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल जे आठ स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्ससह असेल जे 268 बीएचपी पॉवर आणि 400 न्यूटन मीटर टॉर्क प्रदान करते. हे ऑफरोडींग व्हेईकल असल्यामुळे कंपनीने यात 10.8 इंचचे ग्राऊंड क्लिअरन्स दिले आहे. रोड चाचणीदरम्यान अनेकदा गाडीची झलक पहायला मिळाली आहे. (Made in India Jeep Wrangler will be launched in March)

इतर बातम्या

एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार

सिंगल चार्जवर 480KM धावणार, Hyundai Ioniq 5 क्रॉसओव्हर बाजारात, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

कार घेण्याचा विचार करताय? 4 लाखांपेक्षा कमी किमतीत हे जबरदस्त पर्याय

(2021 Jeep Wrangler will be launched under Made in India prices may decrease)