Mukesh Ambani यांच्या 3 आलिशान कार, किंमत वाचून फुटणार घाम

Mukesh Ambani Luxury Cars : बड्या बड्या दिग्गजांकडे आलिशान कारचा ताफा असतो. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्याकडे पण लक्झिरियस कार आहेत. अनेकांना त्यांच्याकडे कोणत्या महागड्या कार आहेत, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तर त्यांच्याकडे या आलिशान कार आहेत...

Mukesh Ambani यांच्या 3 आलिशान कार, किंमत वाचून फुटणार घाम
अंबानी कुटुंबियांचा आलिशान कारचा जत्था
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 4:54 PM

अंबानी कुटुंबाकडील लक्झरी कारच्या कलेक्शनविषयी प्रत्येकाला माहिती हवी असते. मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश अंबानी आणि अनंत अंबानी, सून श्लोका मेहता आणि होणारी सून राधिका मर्चेंट हे नेहमीच मुंबईपासून ते जामनगरपर्यंत त्यांच्या खास आलिशान कारमधून प्रवास करतात. धाकटा मुलगा अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग समारंभापूर्वी अंबानी कुटुंबियांनी 3 आलिशान कार खरेदी केल्या आहेत. त्यातील एका कारसोबत शाहरुख खान पण जामनगरमध्ये दिसला होता.

नव्या दमाची Ferrari Purosangue

देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब अंबानींकडे नुकतीच एक नवीकोरी आलिशान सुपरकार दाखल झाली आहे. तिचे नव फेरारी पुरोसांग्वे असे आहे. फेरारीच्या या एसयुव्हीची किंमत 10 कोटी रुपयांहून अधिक आहे. फेरारी पुरोसांग्वेमध्ये 6.5 लिटरचे नॅचरल एस्पिरेटेड V12 इंजिन आहे. ते 715 बीएचपीचे कमाल पॉवर आणि 716 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. या सुपरकारमध्ये 8-स्पीड ड्युअल क्लच ट्रांसमिशन आहे. ही एसयुव्ही केवळ 3.3 सेकंदात 0-100 kmp वेगाने धावते. या कारचा टॉप स्पीड 310 kmph आहे.

हे सुद्धा वाचा

एकदम जबरदस्त Bentley Bentayga

बेंटलीने वर्ष 2022 मध्ये बेंटायग लाँच केली होती. या सुपरकारची किंमत 7 कोटी रुपयांहून अधिक आहे. अंबानी कुटुंबियांनी या समारोहपूर्वीच ही कार ताफ्यात दाखल करुन घेतली. बेंटली बेंटायगासह जामनगरमध्ये सलमान खान दिसला होता. या सुपरकारमध्ये 4.0 लिटरचे V8 ट्विन टर्बो इंजिन देण्यात आले होते. ते 542 एचपी की कमाल पॉवर आणि 770 न्यूटन मीटरचे पिक टॉर्क जनरेट करते. 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसह बेंटायग केवळ 4.5 सेकंदात ताशी 0-100 किलोमीटर धावते.

Land Rover Range Rover ने वाढवली शान

अंबानी कुटुंबियांनी नुकतीच नवीन लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी खरेदी केली. या कारची किंमत 5 कोटी रुपये आहे. या कारमध्ये आकाश अंबानी अनेकदा दिसतात. रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफीमध्ये 4.4 लीटरचे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. ते 523 एचपीचे कमाल पॉवर आणि 750 न्यूटन मीटरचा पिक टॉर्क जनरेट करते. ही आलिशान कार 4.6 सेकंदात ताशी 0-100 kmph वेगाने धावते.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.