EV लाँचिंगला उशीर होऊ नये म्हणून Apple स्वतःच कार डेव्हलप करणार; कंपनीची घोषणा

क्युपर्टिनो-आधारित टेक जायंट कंपनी Apple इतर कोणत्याही ऑटोमेकरच्या मदतीशिवाय स्वतःचे इलेक्ट्रिक वाहन विकसित करत आहे.

EV लाँचिंगला उशीर होऊ नये म्हणून Apple स्वतःच कार डेव्हलप करणार; कंपनीची घोषणा
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 6:03 PM

मुंबई : क्युपर्टिनो-आधारित टेक जायंट कंपनी Apple इतर कोणत्याही ऑटोमेकरच्या मदतीशिवाय स्वतःचे इलेक्ट्रिक वाहन विकसित करत आहे. माईल इकॉनॉमिक डेली (मॅकरुमर्स द्वारे) नुसार, आयफोन निर्माती कंपनी सध्या फाइनल पार्ट सप्लायर्स निवडत आहे. यापूर्वी, टेक दिग्गज कंपनीने जॉइंट डेव्हलपमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट प्रोडक्शन कराराबाबतची माहिती घेण्यासाठी बीएमडब्ल्यू, ह्युंडई, निसान आणि टोयोटाशी संपर्क साधला होता. (Apple will develop car itself so that the EV launch will not be delayed)

अ‍ॅपल नुकतीच जागतिक ऑटोमोबाईल पार्ट उत्पादकांना रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन (आरएफआय), रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) आणि रिक्वेस्ट फॉर कोटेशन (आरएफक्यू) पाठवण्याच्या प्रक्रियेतून गेली आहे. अ‍ॅपलने अलीकडेच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन, स्टीयरिंग, डायनॅमिक्स, सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा अनुभव असलेल्या दोन माजी मर्सिडीज अभियंत्यांची नियुक्ती केली आहे.

हे अभियंते आता Apple च्या स्पेशल प्रोजेक्ट्स ग्रुपमध्ये प्रोडक्ट डिझाईन इंजिनीअर म्हणून काम करत आहेत, ज्यांना Apple कारसाठी नियुक्त केले आहे. Apple चे विश्वासार्ह विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी यापूर्वी दावा केला होता की, Apple कारचे लाँचिंग 2025-2027 पर्यंत होण्याची शक्यता नाही.

कुओ यांनी एका संशोधन नोटमध्ये म्हटले आहे की, अ‍ॅपल कारचे स्पेसिफिकेशन अजून फायनल झालेले नाहीत. वाहन लॉन्च करण्याची अंतिम मुदत 2028 किंवा त्याहून पुढे वाढवली गेली तर त्यात आश्चर्य वाटणार नाही. याव्यतिरिक्त, Apple च्या इलेक्ट्रिक कार प्रकल्पाचे सध्याचे प्रमुख डौग फील्ड हे फोर्डसाठी कंपनी सोडत आहेत. फोर्डने कंपनीचे मुख्य प्रगत तंत्रज्ञान आणि एम्बेडेड सिस्टम अधिकारी म्हणून फील्ड यांची नेमणूक केली आहे.

कारची बॅटरी असेल खास

अ‍ॅपलची ही कार बॅटरी असलेली कार असेल, अ‍ॅपल ही बॅटरी मजबूत बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अ‍ॅपल कंपनी कारच्या बॅटरीसाठी मोनो सेल्स वापरेल. डिझाइनसाठी उत्कृष्ट साहित्य वापरले जाईल. या बॅटरीची खास गोष्ट अशी असेल की, ती तुम्हाला मोठ्या रेंजसाठी सपोर्ट करेल. अ‍ॅपलच्या सूत्रांनी हे उघड केले आहे की, ही नेक्स्ट लेव्हल बॅटरी असेल.

अ‍ॅपल यासाठी Lidar सेन्सर्स वापरेल, जे तुम्हाला रस्त्याचे 3D व्ह्यू देतील. 2017 मध्ये, Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक Apple च्या ऑटोनमस ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरबद्दल बोलले होते. हे असे तंत्रज्ञान आहे ज्याला मदर ऑफ ऑल AI प्रोजेक्ट्स म्हटले जात आहे.

इतर बातम्या

जिच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लॉबिंग केलं होतं, त्या ‘फोर्ड’नं देशातून गाशा का गुंडाळला? वाचा सविस्तर

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

(Apple will develop car itself so that the EV launch will not be delayed)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.