5

Pulsar प्रेमींसाठी खुशखबर! कंपनीकडून 220F मध्ये महत्त्वाचे अपडेट्स, जाणून घ्या सर्वकाही

बजाज ऑटो (Bajaj Auto) कंपनी लवकरच आपल्या बाईकच्या पल्सर (Bajaj Pulsar) रेंजमध्ये नवीन रंगाचा पर्याय देऊ शकते.

Pulsar प्रेमींसाठी खुशखबर! कंपनीकडून 220F मध्ये महत्त्वाचे अपडेट्स, जाणून घ्या सर्वकाही
Bajaj Pulsar 220F
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 6:30 AM

मुंबई : बजाज ऑटो (Bajaj Auto) लवकरच आपल्या बाईकच्या पल्सर रेंजमध्ये नवीन रंगाचा पर्याय देऊ शकते. यापूर्वी आपण पल्सर 150 चे काही फोटोज ऑनलाइन पाहिले आहेत. दरम्यान, आता पल्सर 220 एफ (Pulsar 220F) नवीन रंगासह ऑनलाइन पाहायला मिळाली आहे. 220F कंपनी रेड/व्हाईक कलर स्कीमसह सादर करु शकते. नवीन पल्सर 220 एफ दोन नवीन पेंट स्कीममध्ये लाँच केली जाईल. यापैकी पहिली कलर स्कीम ब्लॅक मॅटसह रेड ग्राफ्रिक्ससह असेल, तर रेड आणि ब्लॅक शेडसह दुसरी कलर स्कीम सादर केली जाऊ शकते. (Bajaj Pulsar 220F will be launched in new colors scheme soon)

कंपनीने अद्याप या दोन नवी कलर स्कीमबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये पल्सर 220 एफ सर्वात जुनी बाईक आहे. यात कंपनीने गेल्या काही वर्षांत उत्कृष्ट अपग्रेडसह बाईक बाजारात दाखल केली आहे. ज्या बजाज बाईक्समध्ये आजही जुन्या हार्डवेअरचा वापर केला जातो, त्या बाईक्सच्या यादीत 220 एफचादेखील समावेश आहे. आतापर्यंत या बाईकला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आला आहे.

बाईकमध्ये 220 सीसीचे सिंगल सिलिंडर ऑइल कूल्ड इंजिन आहे जे 8500 आरपीएम वर 20.11 बीएचपी पॉवर आणि 7000 आरपीएम वर 18.55 एनएमची पीक टॉर्क देते. गीअरबॉक्स 5 स्पीड युनिटसह सादर करण्यात आहे. यामध्ये 17-इंचाचा एलॉय आहे जो समोरच्या भागात टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस डुअल शॉक अब्जॉर्बरसह मिळेल.

ब्रेकिंगसाठी वाहनात डिस्क ब्रेक वापरण्यात आले आहेत. जर आपण या बाईकच्या काही महत्त्वाच्या फीचर्सविषयी चर्चा केली तर तुम्हाला यात एलईडी टेल लँप्स, सेमी डिजिटल कन्सोल, हॅलोजन टाइप प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि 15 लीटर इंधन टाकी देण्यात आली आहे. या बाईकची किंमत सध्या 1.25 लाख रुपये इतकी आहे.

नव्या अवतारात Pulsar 180 बाजारात

देशभर विविध डीलरशिप्सवर दिसणारी बाईक बजाज ऑटोने (Bajaj Auto) कोणताही गाजावाजा न करता गेल्या महिन्यात लाँच केली आहे. बजाज पल्सर 180 (Bajaj Pulsar 180) असं या बाईकचं नाव आहे. या बाईकची किंमत 1,07,904 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे. ही बाईक बजाजच्या अधिकृत संकेतस्थळावर लिस्ट करण्यात आली आहे. नवी 2021 बजाज पल्सर 180, पल्सरच्या जुन्या लोकप्रिय स्टाईलमध्येच सादर करण्यात आली आहे.

ही बाईक लाँच करण्यापूर्वीच डीलरशिपकडे या बाईकसाठी अनधिकृत बुकिंग सुरु करण्यात आलं होतं. परंतु आता तुम्ही अधिकृतपणे या बाईकचं बुकिंग करु शकता. ग्राहकांनी पब्लिक डिस्प्ले आणि टेस्ट रायडिंगला सुरुवात केली आहे. नवीन पल्सर 180 नेकेड मोटारसायकल आहे जी हॅलोजन हेडलँप आणि बल्ब इंडिकेटर्ससह येते. या बाईकमध्ये मागील बाजूस LED टेल लँप देण्यात आले आहेत.

फीचर्स

बजाज पल्सर 180 या बाईकचं मीटर कंसोल अॅनालॉग टॅकोमीटर आणि LCD स्क्रीनसह मिळेल. यामध्ये तुम्हाला फ्यूल लेवल आणि ओडोमीटर मिळेल. बाईकमध्ये BS 6- कंप्लायंट 180cc एयर कूल्ड सिंगल सिलेंडर देण्यात आलं आहे. जे 8500 rpm वर 17 PS पॉवर आणि 6500 rpm पर 14.2Nm टॉर्क जनरेट करु शकतं. या बाईकचं इंजिन 5 स्पीड गीयरबॉक्ससह डिझाईन करण्यात आलं असून या बाईकचं वजन 145 किलो इतकं आहे.

ब्रेकिंगसाठी या बाईकमध्ये 280 mm फ्रंट डिस्क आणि 230 mm रियर डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. सेफ्टी नेटमध्ये सिंगल चॅनल एबीएस देण्यात आलं आहे जे स्टँडर्ड किटचा एक भाग आहे. ही बाईक दोन रंगांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. ज्यामध्ये लेजर ब्लॅक आणि न्यूक्लियर ब्लू या दोन रंगांचा समावेश आहे. ही बाईक लाँच झाल्यानंतर या बाईकची टीवीएस आपाचे RTR 180 आणि होंडा हॉर्नेट 2.0 या दोन बाईक्ससोबत टक्कर होणार आहे.

बजाजच्या पल्सर रेंजमधील मोटारसायकलींना भारतात मोठी मागणी आहे. या रेंजमध्ये कंपनीने अनेक गाड्या सादर केल्या आहेत. बजाजच्या पल्सर 125 आणि पल्सर 150 या बाईक्सना मोठी मागणी आहे. बजाज पल्सर 180 ही बाईक पल्सर 125 आणि पल्सर 150 हून अधिक पॉवरफुल आणि दमदार आहे. पल्सर रेंजमधील मोटारसायकल्सचं डिझाईन खूपच आयकॉनिक आहे, त्यामुळे या रेंजमधील प्रत्येक बाईकला देशभरात मोठी पसंती मिळाली आहे.

हेही वाचा

Honda ची आफ्रिका ट्विन अ‌ॅडव्हेन्चर भारतात दाखल, जाणून घ्या नवे फिचर्स

कनेक्टेड टेक्नोलॉजीसह Yamaha च्या 2021 FZ FI आणि FZS FI बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Bajaj Pulsar 220F will be launched in new colors scheme soon)

Non Stop LIVE Update
उद्योगमंत्री उद्य सामंत यांचे धक्कादायक विधान, तो एमओयु सापडत नाही
उद्योगमंत्री उद्य सामंत यांचे धक्कादायक विधान, तो एमओयु सापडत नाही
काय झाडी फेम शहाजी बापू पाटील याचं कुणाला आश्वासन? मंत्रीपद मागतो...
काय झाडी फेम शहाजी बापू पाटील याचं कुणाला आश्वासन? मंत्रीपद मागतो...
प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गात आडवे येणाते ते दोन भटजी कोण?
प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गात आडवे येणाते ते दोन भटजी कोण?
विधानसभा अध्यक्ष संतापतात तेव्हा..., म्हणाले 'मक्तेदारी चालणार नाही'
विधानसभा अध्यक्ष संतापतात तेव्हा..., म्हणाले 'मक्तेदारी चालणार नाही'
बदलापूरच्या तरुणाची 'ती' आदर्श कृती, परदेशात भारतीयांची मान उंचावली
बदलापूरच्या तरुणाची 'ती' आदर्श कृती, परदेशात भारतीयांची मान उंचावली
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?