सर्वात स्वस्त 7-सीटर कारवर 40000 रुपयांचा डिस्काऊंट

तुमचे कुटुंब मोठे आहे आणि कारचं बजेट कमी आहे, अशा परिस्थितीत तुम्ही 7 सीटर बजेट कारचा (Seven seater Cars) विचार करायला हवा.

सर्वात स्वस्त 7-सीटर कारवर 40000 रुपयांचा डिस्काऊंट
datsun go plus
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 10:15 PM

मुंबई : तुम्हाला नवीन कार घ्यायची आहे, परंतु कुटुंब मोठे आहे आणि बजेट कमी आहे, अशा परिस्थितीत तुम्ही 7 सीटर बजेट कारचा (Seven seater Cars) विचार करायला हवा. विशेष म्हणजे कमी बजेटमध्ये मोठी कार खरेदी करायची असेल तर बाजारात बरेच पर्याय आहेत. Datsun Go Plus (+) ही कार यापैकी एक उदाहरण आहे. ही 7 सीटर कार कंपनीने अगदी कमी किंमतीत उपलब्ध करून दिली आहे.

जपानी उत्पादक डॅटसनने अलीकडेच या लोकप्रिय 7 सीटर कारची किंमत अपडेट केली आहे, परंतु अद्याप ही कार अगदी स्वस्त किंमतीत उपलब्ध आहे. ही कार 4.25 लाख रुपये ते 6.99 लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. बाजारात ही कार 5 वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. चला तर मग या कारची खासियत आणि काही खास वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊया…

डॅटसन गो प्लस ही देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आहे. ही कार मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे. या कारचा लुकदेखील चांगला आहे. डॅटसन गो प्लसमध्ये 1198 सीसी 3 सिलेंडर SOHC पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5000 आरपीएम वर 67 Hp पॉवर आणि 4000 आरपीएमवर 104 एनएम टॉर्क निर्माण करतं.

या कारच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास यामध्ये की-लेस एंट्री आणि 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे, जी अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्लेला सपोर्ट करते. याशिवाय यात 14 इंचाचे अ‍ॅलोय व्हील आणि मॅन्युअल एयर कंडिशनिंग देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी, यात रीयर पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट सिस्टम, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) आणि ड्युअल फ्रंट एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. एक लीटर पेट्रोलमध्ये ही कार 19 किलोमीटर मायलेज देते.

Datsun GO+ वर मिळतेय ऑफर

या महिन्यात कंपनी Datsun GO+ कारच्या खरेदीवर मोठी सवलत देत आहे, ज्यामध्ये आपण 40,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. यात 20,000 रुपयांची रोख सूट आणि 20,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. अशा परिस्थितीत सूट मिळाल्यानंतर ही कार तुम्हाला 3.85 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत मिळेल.

इतर बातम्या

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय

सिंगल चार्जवर 220km रेंज, होंडाची Two-Door इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

Maruti Swift ला मागे टाकत ‘ही’ कार ठरली देशात नंबर वन, लॉकडाऊन असूनही रेकॉर्डब्रेक विक्री

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.