70 हजारांची TVS Jupiter अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

तुम्हाला एखादी स्कूटर खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला स्कूटर खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत

70 हजारांची TVS Jupiter अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
TVS Jupiter (Photo : TVS)

मुंबई : तुम्हाला एखादी स्कूटर खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला स्कूटर खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत TVS Jupiter स्कूटर खरेदी करु शकाल. (Buy TVS Jupiter in half price; know Where to get this offer)

गेल्या काही वर्षांपासून देशातील ग्राहकांकडून टीव्हीएस (TVS) च्या स्कूटर्सना चांगली पसंती मिळत आहे. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये या स्कूटरच्या किंमतीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी एक चांगली ऑफर घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्ही TVS Jupiter स्कूटर अवघ्या 34,650 रुपयात खरेदी करू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत स्कूटर किंवा बाईक खरेदी करू शकता. यावरुन तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या दुचाकींचं नूतनीकरण करून त्या दुचाकींची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

अवघ्या 34 हजारात TVS Jupiter

CredR वर तुम्हाला केवळ 34,650 रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली TVS Jupiter स्कूटर खरेदी करता येईल. ही स्कूटर 110cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही फर्स्ट ओनर स्कूटर आहे. ही स्कूटर खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वॉरंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या स्कूटरची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.

ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-scooters-in-Pune-Pune/TVS-Jupiter-Limited/20738/?f=eyJidWRnZXRNaW5NYXhMaXN0IjpbeyJtaW5CdWRnZXQiOiIyNTAwMSIsIm1heEJ1ZGdldCI6IjM1MDAwIn1dfQ%3D%3D&sort=kms-asc) जाऊन या स्कूटरबाबतची माहिती घेऊ शकतात. ही स्कूटर पुण्यात उपलब्ध आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही स्कूटर फक्त 16,000 किलोमीटर धावली आहे. यात तुम्हाला स्कूटर, टायर्स, इंजिन, परफॉरमन्स, एक्सटीरियर बॉडी, फोर्क असेंबली, मीटर सेक्शन, फ्रंट आणि रियर व्हील सेक्शनच्या फीचर्सविषयीची माहिती मिळेल.

(सूचना : या बातमीत संबंधित स्कूटरबाबत दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

इतर बातम्या

Maruti ते Hyundai, किफायतशीर किंमतीत ऑटोमॅटिक गियरवाल्या कार, पाहा यादी

सिंगल चार्जवर 95 किमी ड्रायव्हिंग रेंज, Bajaj Chetak Electric Scooter पुणे, बंगळुरुनंतर आता मुंबईतही उपलब्ध

i20 ते Cretaपर्यंत Hyundaiच्या कार महागल्या, इथे पाहा मॉडेल्स आणि त्याच्या किंमती

(Buy TVS Jupiter in half price; know Where to get this offer)

Published On - 9:00 am, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI