AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑटो क्षेत्राला धक्का!’बजाज ऑटो’वर मोठा सायबर हल्ला; रॅन्समवेअर अटॅकमुळे कंपनीत उडाली खळबळ

प्रमुख ऑटोमोबाईल कंपनी बजाज ऑटो आणि तिची उपकंपनी 'बजाज ऑटो टेक्नॉलॉजी लिमिटेड' (BATL) यांच्या सिस्टीमवर 23 जून रोजी सकाळी रॅन्समवेअर सायबर हल्ला झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे उद्योग जगतात मोठी खळबळ उडाली असून, कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान टीमने सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मदतीने सिस्टीम सुरक्षित करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

ऑटो क्षेत्राला धक्का!'बजाज ऑटो'वर मोठा सायबर हल्ला; रॅन्समवेअर अटॅकमुळे कंपनीत उडाली खळबळ
| Edited By: | Updated on: Jun 24, 2026 | 3:45 PM
Share

हॅकर्सनी आता ऑटो कंपन्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, बजाज ऑटोच्या डेटा सिस्टीमवर रॅन्समवेअरद्वारे सायबर दरोडा टाकण्यात आला आहे. कंपनीने स्वतः या सायबर हल्ल्याचा खुलासा केला आहे. सुदैवाने, घटना समजताच सुरक्षेच्या दृष्टीने तांत्रिक पावले उचलण्यात आली असून, डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सिस्टीम पूर्ववत करण्यासाठी तज्ज्ञांचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटो सायबर हल्ल्याचा बळी ठरली आहे. कंपनीने मंगळवारी माहिती दिली की, रॅन्समवेअर हल्ल्यामुळे त्यांची प्रणाली आणि त्याची उपकंपनी बजाज ऑटो टेक्नॉलॉजी लिमिटेड (BLTL) च्या काही प्रणालींवर परिणाम झाला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा सायबर हल्ला 23 जून रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास झाला. कंपनीला या घटनेची माहिती मिळताच तांत्रिक टीम, सायबर सुरक्षा तज्ञ आणि व्यवस्थापनाने तातडीने कारवाई सुरू केली. हल्ल्याचा परिणाम मर्यादित करण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कंपनीने अनेक सुरक्षा उपाययोजना केल्या.

त्याचा काय परिणाम झाला?

बजाज ऑटोने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, प्राथमिक तपासणीच्या आधारे उचललेली पावले यशस्वी झाली आहेत आणि हल्ल्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात नियंत्रित करण्यात आला आहे. तथापि, कंपनीने हे सांगितले नाही की हल्ल्यामुळे किती सेवांवर परिणाम झाला, कोणताही ग्राहक किंवा कंपनीचा डेटा चोरीला गेला आहे की नाही किंवा त्याचा उत्पादन किंवा व्यावसायिक क्रियाकलापांवर काही परिणाम झाला आहे की नाही.

रॅन्समवेअर हल्ला म्हणजे काय?

रॅन्समवेअर हा सायबर हल्ल्याचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये हॅकर्स एखाद्या कंपनीच्या किंवा व्यक्तीच्या संगणक प्रणालीत प्रवेश करतात आणि डेटा लॉक किंवा एन्क्रिप्ट करतात. यानंतर डेटा परत देण्याच्या बदल्यात खंडणीची मागणी केली जाते. अलिकडच्या वर्षांत जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या अशा हल्ल्यांना बळी पडल्या आहेत. या घटनेमुळे उद्योग जगतात मोठी खळबळ उडाली असून, कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान टीमने सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मदतीने सिस्टीम सुरक्षित करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?