तुमची पर्सनॅलिटी आणि बाईकनुसार ऑनलाईन हेल्मेट डिझाईन करा, घरपोच डिलिव्हरी मिळवा

आता तुम्ही तुमच्या मोटरसायकलनुसार तुमचे हेल्मेटदेखील डिझाइन करू शकता. (Design Royal Enfield Helmet according to your bike)

तुमची पर्सनॅलिटी आणि बाईकनुसार ऑनलाईन हेल्मेट डिझाईन करा, घरपोच डिलिव्हरी मिळवा
Royal Enfield Helmet
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 10:43 AM

मुंबई : रॉयल एनफील्ड या ब्रँडचे (Royal Enfield ) नाव समोर येताच रॉयल एनफील्ड बुलेट, रॉयल एनफील्ड क्लासिक 350, रॉयल एनफील्ड हिमालयन आणि रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर यांसारख्या जबरदस्त बाईक्स डोळ्यासमोर येतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, मोटारसायकल्स तयार करणाऱ्या या ब्रँडने आता मोटारसायकल सबंधित इतर अ‍ॅक्सेसरीजदेखील बनवण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने अलीकडेच रॉयल एनफील्ड हेलमेट सादर केले आहे, ज्याची रचना आपल्या गरजेनुसार कस्टमाइज केली जाऊ शकते. (Design Royal Enfield Helmet according to your bike online and get home delivery)

आता तुम्ही तुमच्या मोटरसायकलनुसार तुमचे हेल्मेटदेखील डिझाइन करू शकता. यासाठी तुम्हाला रॉयल एनफील्डच्या संकेतस्थळावर लॉग इन करून अकाऊंट तयार करावे लागेल. यानंतर, तुम्हाला MiY विभागात जाऊन उत्पादनाची निवड (प्रोडक्ट सिलेक्शन) करावी लागेल. वेबसाइटवरील सर्व पर्याय टॉगल लेआउटसह उपलब्ध आहेत. या साईटवर तुम्ही फुल फेस किंवा हाफ फेस हेल्मेटदेखील निवडू शकता.

वेबसाइटवर आपल्याला बाईकच्या मॉडेलनुसार हेल्मेट निवडण्याचा पर्याय मिळेल, यात बुलेट, हिमालयन, इंटरसेप्टर, क्लासिक 350 आणि इतर कटेगरींचा समावेश आहे. येथे तुम्ही स्वत: निवडलेलं हेल्मेट रंग आणि लूक्सनुसार कस्टमाईज करु शकता. ही सिस्टिम अधिक जबरदस्त तेव्हा ठरते जेव्हा तुम्हाला हेल्मेटवर कस्टम लेटरिंग जोडण्याची परवानगी मिळते.

हे हेल्मेट खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे. त्यानंतर, कंपनी लवकरच तुमच्या पत्त्यावर तुमचे कस्टमाईज केलेले हेल्मेट डिलिव्हर करेल. हेल्मेटचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी कंपनीकडून हेल्मेट सुरक्षित पॅकिंग करुन पाठवले जाते. यासह मेटल स्टँड देखील देण्यात आलं आहे. या कस्टमाईज हेल्मेटची किंमत 3,200 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

दुचाकीशी संबंधित इतर अनेक अॅक्सेसरीज रॉयल एनफील्डच्या वेबसाइटवरुन खरेदी करता येतील. यामध्ये सीट्स, प्रोटेक्शन, बॉडी पार्ट आणि इंजिनशी संबंधित सर्व प्रकारचे पार्ट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

इतर बातम्या

रॉयल एनफिल्डने वाढवली बाईकची किंमत, जाणून Classic 350 साठी किती पैसे मोजावे लागणार

नुसता धुर्र! Royal Enfield लवकरच 5 दमदार बाईक भारतात लाँच करणार

अवघ्या 60 हजारात खरेदी करा 74 kmpl मायलेज देणारी बाईक

‘या’ आहेत देशातील टॉप 10 टू व्हीलर्स , विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

(Design Royal Enfield Helmet according to your bike online and get home delivery)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.