ह्युंदाई कारवर 5 लाखांपेक्षा जास्त डिस्काउंट, जाणून घ्या
तुम्ही या महिन्यात नवीन ह्युंदाई कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 5 लाख रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकता.

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (HMIL) ने या महिन्यात म्हणजेच मार्च 2026 मध्ये आपल्या कारवर मोठी सूट आणि ऑफर आणली आहे. जर तुम्ही या महिन्यात नवीन ह्युंदाई कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 5 लाख रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकता. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. Hyundai Grand i10 Nios, i20, Creta, Creta Electric, Verna, Aura, Exter आणि Ioniq 5 आणि Alcazar वाहनांवर ही सूट दिली जात आहे. या ऑफरमध्ये रोख सूट, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज बोनस आणि कॉर्पोरेट बेनिफिट्स यांचा समावेश आहे. नवीन ह्युंदाई कार स्वस्तात खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. ऑफर्स जाणून घ्या.
Hyundai Grand i10 Nios
सर्वात जास्त फायदे या छोट्या कारवर 68,000 पर्यंत मिळतात. यात 20,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. तसेच जुनी कार स्क्रॅपेजमध्ये दिल्यास 20,000 रुपयांचा वेगळा फायदा होणार आहे.
Hyundai i20
ह्युंदाईची ही प्रीमियम कार खरेदी केल्यास एकूण 58,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. यात 15,000 रुपयांचा रोख डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 20,000 रुपयांचा स्क्रॅपेज बोनस तसेच कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.
Hyundai Exter
तुम्हाला ह्युंदाईकडून ही छोटी एसयूव्ही खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यावर 43,000 पर्यंत बचत करू शकता. यामध्ये 15,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा स्क्रॅपेज बोनस आणि 15,000 रुपयांचा स्क्रॅपेज बोनस आणि अनेक फायद्यांचा समावेश आहे.
Hyundai Creta
देशातील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही क्रेटाला निवडक पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 55,000 रुपयांपर्यंत फायदे मिळत आहेत. यात 20,000 रुपयांचा रोख डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 20,000 रुपयांचा स्क्रॅपेज बोनस आणि अनेक फायद्यांचा समावेश आहे. त्याच वेळी, क्रेटा इलेक्ट्रिकवर 80,000 पर्यंत सूट मिळत आहे.
Hyundai Verna
ज्यांना सेडान आवडते त्यांच्यासाठी ही सर्वात चांगली संधी आहे. Verna च्या ऑटोमॅटिक (iVT) मॉडेलवर एकूण 1.10 लाख रुपयांपर्यंत मोठी सूट मिळत आहे. यात 40,000 रुपये रोख सूट आणि 35,000 रुपये स्क्रॅपेज बोनसचा समावेश आहे.
Hyundai Ioniq 5
कंपनी ह्युंदाईची लक्झरी इलेक्ट्रिक कार Ioniq 5 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट देत आहे. त्याच्या जुन्या स्टॉकवर (MY25) ग्राहक 5.05 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकतात. जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंतच ही ऑफर उपलब्ध आहे.
Hyundai Alcazar आणि Aura
मार्च महिन्यात अल्काझारवर 70,000 पर्यंत सूट मिळत आहे. तर ह्युंदाई सेडान सेगमेंटमध्ये आपली फेमस कार ऑरा वर 10,000 रुपयांपर्यंत फायदे देत आहे.
महत्त्वाची गोष्ट
या सर्व ऑफर्स केवळ मार्च 2026 पर्यंत आहेत. त्यामुळे त्यांचा फायदा घ्यायचा असेल तर घाई करावी लागेल. तसेच, विविध शहरे आणि शोरूम्सवर सवलतीच्या रकमेत थोडा बदल होऊ शकतो. अचूक माहितीसाठी तुमच्या जवळच्या ह्युंदाई शोरूमला भेट द्या.
