काय बोलता! फोल्डेबल मोबाईल नव्हे फोल्डेबल स्कूटर, फीचर्स जाणून घ्या
इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये स्कूटर निर्माता कंपनी होंडाने फोल्डेबल स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरचे वजन फक्त 19 किलो ग्रॅम आहे. या स्कूटरच्या सर्व फीचर्सबद्दल चला तर मग जाणून घेऊया.

इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या ऑटो एक्स्पोमध्ये अनेक कंपन्यांनी आपली वाहने लोकांसमोर सादर केली. या वाहनांच्या कलेक्शनमध्ये होंडा या प्रसिद्ध स्कूटर निर्मात्याने अशी स्कूटर लाँच केली ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या स्कूटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही फोल्डेबल स्कूटर आहे. या स्कूटरचे वजन फक्त 19 किलो ग्रॅम आहे.
मोटोकॉम्पॅक्टो असे या स्कूटरचे नाव असून ही फोल्डेबल ई-स्कूटर आहे. सूटकेससारखी दिसणारी ही ई-स्कूटर एकदम अनोखी आहे. होंडाने सर्वप्रथम 2023 मध्ये याचा उल्लेख केला होता, परंतु आता तो लाँच केला जात आहे.
पुढील वर्षी 2026 पर्यंत ते लोकांपर्यंत पोहोचवले जाईल. फोल्डेबल असल्यामुळे ते खूप ट्रॅव्हल फ्री आहे. या स्कूटरचे वजन केवळ 19 किलो ग्रॅम असले तरी त्याची क्षमता 120 किलो उचलण्याची आहे.




या बाईकमध्ये अनेक छोट्या छोट्या स्टायलिंग एलिमेंट्सची भर पडली आहे. यात एक छोटी होंडा ब्रँडिंग देखील आहे. स्कूटरची लांबी 742 मिमी, रुंदी 94 मिमी आणि उंची 536 मिमी आहे. ही स्कूटर तुम्ही कुठेही सोबत घेऊन जाऊ शकता. यात फोल्डेबल सीट आणि हँडलबार देखील आहेत.
होंडाने या मोटोकॉम्पॅक्टमध्ये कायमस्वरूपी मॅग्नेट डायरेक्ट ड्राइव्ह मोटर बसवली आहे, G490 वॉट आणि 16 एनएम टॉर्क जनरेट करते. स्कूटरची रेंज 19.31 किमी आणि टॉप स्पीड 24.14 किमी प्रति तास आहे. यात 0.7 केडब्ल्यूएच बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जो 3 तासात फुल चार्ज होऊ शकतो. 2026 पासून भारतात विक्रीसाठी तयार होईल.
कंपनीने सध्या या स्कूटरच्या किंमतीचा कोणताही उल्लेख केलेला नाही. मात्र, कंपनी 1 लाखांच्या आत लाँच करू शकते, अशी अपेक्षा आहे. ही स्कूटर चालवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवान्याची गरज भासणार नाही.
‘हे’ देखील वाचा
इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये काही कंपन्या सर्वसामान्यांसाठी इलेक्ट्रिक सायकल घेऊन या एक्स्पोमध्ये पोहोचल्या आहेत. ओयूएनसीने या एक्स्पोमध्ये एक सायकल लाँच केली आहे. ओयूएनसी इलेक्ट्रिक सायकलची लिफ्टिंग क्षमता 120 किलो आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही सायकल चालवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा परवाना आणि नोंदणीचे पालन करावे लागणार नाही. ही सायकल दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनीने याच्या बेस व्हेरियंटची किंमत 36,999 रुपये तर टॉप मॉडेलची किंमत 41,999 रुपये ठेवली आहे.