Electric Scooter | इलेक्ट्रिक स्कूटर महागणार! स्वस्ताईचे उरलेत काही दिवस

Electric Scooter | इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किंमतीत वाढ होऊ शकते. सध्याच्या किंमती पण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. पण केंद्र सरकारच्या सबसिडीमुळे त्यांच्या किंमती कमी आहेत. सबसिडीमुळे इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती कमी आहेत. पण ही सबसिडी बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेण्याची शक्यता आहे.

Electric Scooter | इलेक्ट्रिक स्कूटर महागणार! स्वस्ताईचे उरलेत काही दिवस
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 4:01 PM

नवी दिल्ली | 23 डिसेंबर 2023 : जर तुम्ही नवीन वर्षात ईव्ही घेण्याच्या विचारात असाल तर घाई करा. याच वर्षाअखेरीस ईव्ही स्कूटर, बाईक खरेदी करा. कारण पुढील वर्षात, 2024 मध्ये ईव्ही महाग होण्याची शक्यता आहे. सध्या डिस्काऊंटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करता येऊ शकते. अनेक ईव्ही कंपन्या त्यांच्या उत्पादनावर सवलत देत आहेत. तर काहींनी ऑफर पण आणली आहे. या वर्षाअखेरपर्यंत ग्राहकांना स्कूटर, बाईक खरेदी करता येणार आहे. कारण केंद्र सरकार लवकरच ईव्हीवरील सबसिडी बंद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर महागण्याची शक्यता आहे. FAME III मध्ये केंद्र सरकार रुची दाखवत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सबसिडी मिळणार नाही. ईव्ही महागण्याची शक्यता आहे.

अनेक कंपन्यांची ऑफर

अनेक इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपन्यांनी या वर्षाच्या अखेरीला ईव्ही खरेदीवर सूट जाहीर केली आहे. Aathar ने या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरवर खास 24,000 रुपयांपर्यंतची सवलत जाहीर केली आहे. एथर 450S आणि 450X मॉडलवर 6,500 पर्यंत रोख सवलत देण्यात येत आहे. तर कॉर्पोरेट ऑफरअंतर्गत 1,500 रुपयांचा अतिरिक्त लाभ देणार आहे. ग्राहक या महिन्यात ‘एथर इलेक्ट्रिक डिसेंबर’ ही स्कीम राबवत आहे. त्यातंर्गत 5,000 रुपयांपर्यंत लाभ घेता येईल. ही ऑफर 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.

हे सुद्धा वाचा

ओलाच्या स्कूटरवर मोठी सवलत

बाजारातील खेळाडू ओलाने पण बंपर डिस्काऊंट जाहीर केला आहे. या महिन्यात ही स्कूटर खरेदी केल्यास जोरदार ऑफरचा लाभ घेता येईल. ओलाने S1X+ ची किंमत 20,000 रुपयांपर्यंत कपात केली आहे. या ऑफरचा लाभ ग्राहकांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत घेता येईल. तर काही क्रेडिट कार्डवर 5,000 रुपयांपर्यंतची सवलत मिळले. डाऊन पेमेंट पण कमी आहे. झिरो प्रक्रिया शुल्क आणि 6.99 टक्के व्याज दरासह ही बाईक घरी घेऊन जाता येईल.

हिरो मोटोकॉर्प पण मागे नाही. ती पण शर्यतीत उतरली आहे. Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटर वर 38,500 रुपयांपर्यंतची सवलत जाहीर केली आहे. यामध्ये 7,500 रुपयांचा ईएमआय, 8,259 रुपयांचा एक्सटेंडेड वॉरंटी, , 6,500 रुपयांचे रोख सवलत, 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 7,500 रुपयांचा बोनस डिस्काऊंट, 2,500 रुपयांचा कॉर्पोरेट सवलत आणि 1,125 रुपयांची मेंबरशिप स्कीम यांचा फायदा घेता येईल. 5.99 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदरावर ही ईव्ही घरी आणता येईल.

सबसिडी लवकरच बंद होण्याची शक्यता

टाईम्स ऑफ इंडियातील अहवालानुसार, इलेक्ट्रिक दुचाकीसाठी देण्यात येणारी सबसिडी काही दिवसातच बंद होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार FAME III तिसरा टप्पा सुरु करण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह आहे. FAME II, एप्रिल 2019 मध्ये सुरु झाला होता. मार्च 2022 मध्ये संपणार होता. तो मार्च 2024 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.