क्लच आणि गियर नसलेला भारतातला सर्वात अ‍ॅडव्हान्स ट्रॅक्टर लाँच, 50 टक्के इंधनाची बचत होणार

Proxecto ने भारतातील पहिला हायब्रिड ट्रॅक्टर लाँच केला आहे, जो पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. या ट्रॅक्टरमध्ये बॅटरीसुद्धा नसणार.

क्लच आणि गियर नसलेला भारतातला सर्वात अ‍ॅडव्हान्स ट्रॅक्टर लाँच, 50 टक्के इंधनाची बचत होणार
Hybrid Tractor HAV S1
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 6:40 PM

मुंबई : Proxecto ने भारतातील पहिला हायब्रिड ट्रॅक्टर लाँच केला आहे, जो पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. या ऑटोमॅटिक हायब्रिड ट्रॅक्टरमध्ये बॅटरीसुद्धा नसणार आणि यामध्ये सुमारे 2 डझन अशी वैशिष्ट्ये आहेत जी या उद्योगात अद्याप लाँच झालेली नाहीत. HAV tractor प्रथम नोव्हेंबर 2019 मध्ये जगातील सर्वात मोठ्या अ‍ॅग्रीटेक इव्हेंटमध्ये सादर करण्यात होता. हा कार्यक्रम जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि तेव्हापासून या ट्रॅक्टरची आतुरतेने वाट पाहिली जात होती. (India First Fully Automatic Hybrid Tractor HAV S1 launched; check price and features)

आधी सांगितल्याप्रमाणे, या ट्रॅक्टरमध्ये दोन डझन अशी वैशिष्ट्ये आहेत जी पहिल्यांदाच वापरली गेली आहेत. हा एकमेव हायब्रीड ट्रॅक्टर आहे ज्यात बॅटरी वापरण्यात आलेली नाही. हा ट्रॅक्टर डिझेल आणि सीएनजी दोन्हीवर चालू शकतो. इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्यावर, हाच ट्रॅक्टर नंतर सहजपणे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये रूपांतरित करता येईल. AWED Technology मुळे या ट्रॅक्टरची सर्व चाके इलेक्ट्रिक ड्राइव्ह करतात. ज्यामुळे वाहन चालविणे अगदी स्मूद होते. यामध्ये क्लच किंवा गियर नाही. केवळ फॉरवर्ड, न्यूट्रल आणि रिव्हर्सचा पर्याय देण्यात आला आहे.

50 टक्के इंधनाची बचत

Diesel Hybrid S1 मॉडल हे पारंपारिक ट्रॅक्टरच्या तुलनेत 28 टक्के कमी इंधन वापरते. S 2 CNG Hybrid मॉडेल जवळपास 50 टक्के कमी इंधन वापरते. सध्या हे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहे. सोबतच या ट्रॅक्टरच्या सर्व व्हील्समध्ये सस्पेंशन देण्यात आलं आहे. सोबतच हाईट अॅडजस्टमेंट फीचरही देण्यात आलं आहे.

किंमत 8.49 लाखांपासून

कंपनी 10 वर्षांसाठी लिमिटेड प्रोडक्ट वॉरंटीही देत ​​आहे. याशिवाय दोन व्हेरिएंट्समध्ये एसी सुविधादेखील देण्यात आली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, या ट्रॅक्टरचं बेस मॉडेल HAV S1 50HP ची किंमत 9.49 लाख रुपयांपासून सुरू होते. तर याचं टॉप व्हेरिएंट HAV S1+ 50HP ची किंमत 11.99 लाख रुपये असेल आणि यात एअर कंडिशनिंग केबिन असेल. या व्यतिरिक्त कंपनीने HAV S1 45HP मॉडेलही लाँच केलं आहे. या मॉडेलची किंमत 8.49 लाख रुपये इतकी आहे.

30 मे पासून बुकिंग सुरु

सर्वात खास गोष्ट म्हणजे हा ट्रॅक्टर मेड इन इंडिया आहे. हा ट्रॅक्टर पूर्णपणे इको फ्रेंडली आहे कारण त्यामध्ये बॅटरी वापरलेली नाही. या ट्रॅक्टरची पहिली सिरीज HAV S1 बाजारात दाखल झाली आहे. यासाठीचे बुकिंग 30 मेपासून सुरू केलं जाणार आहे. बुकिंगची रक्कम 10 हजार रुपये इतकी आहे आणि ही रक्कम रिफंडेबल आहे. प्री-बुक केलेल्या HAV tractor चे वितरण (डिलीव्हरी) ऑगस्ट 2021 पासून सुरू होईल.

संबंधित बातम्या

कोरोनाचं संकट रोखता येत नसेल तर लष्कराकडे आरोग्य सेवा सोपवा; नितीशकुमारांना पाटना हायकोर्टाने फटकारले

Coronavirus News Updates: देशात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, कॅटची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी

तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार, वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू बिनकामाचे; डॉ. गुलेरिया यांचा इशारा

(India First Fully Automatic Hybrid Tractor HAV S1 launched; check price and features)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.