अवघ्या 18 मिनिटात 80% चार्ज, सिंगल चार्जमध्ये 510 KM रेंज, Kia च्या इलेक्ट्रिक कारसाठी ग्राहकांचा रांगा

किआ कंपनीच्या (Kia Motors) या इलेक्ट्रिक कारने दक्षिण कोरियन बाजारात एक वेगळा विक्रम नोंदवला आहे. (Kia EV6)

अवघ्या 18 मिनिटात 80% चार्ज, सिंगल चार्जमध्ये 510 KM रेंज, Kia च्या इलेक्ट्रिक कारसाठी ग्राहकांचा रांगा
Kia EV6
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 9:04 AM

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने (Electric  Vehicles) रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (Kia EV6 gettting more attention from customers in Korea and european markets)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, कोरियन कार उत्पादक कंपनी किआ कॉर्पोरेशनने (Kia Corporation / Automobile manufacturer) त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. या कारने कोरियन मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर आता या कारला युरोपियन बाजारातही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.

किआच्या इलेक्ट्रिक कारचा बाजारात धुमाकूळ

किआ कॉर्पोरेशनने माहिती दिली आहे की, ग्राहक त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारला चांगली पसंती दर्शवत आहेत. कंपनीला युरोपमध्ये प्री-सेलच्या जबरदस्त ऑर्डर्स मिळत आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या इलेक्ट्रिक वाहनाला ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इतर मोठ्या देशांकडून 7000 युनिट्सच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. किआने गेल्या महिन्यात दक्षिण कोरियामधील एका डेडिकेटेड प्लॅटफॉर्मवर त्यांची ही क्रॉसओव्हर ईव्ही लाँच केली होती. या कारला लाँचिंगच्या दिवशीच 21,016 प्री-ऑर्डर्स मिळाल्या. एवढ्या मोठ्या ऑर्डरमुळे कंपनीने एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. हा विक्रम कंपनीने त्यांच्या देशांतर्गत बाजारात प्रस्थापित केला होता. आता या कारचा जलवा युरोपातदेखील पाहायला मिळत आहे.

किआ ईव्ही 6 इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (ई-जीएमपी) वर आधारित आहे, हा प्लॅटफॉर्म विशेषत: इलेक्ट्रिक वाहनांसाठी विकसित केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की आगामी काळात या प्लॅटफॉर्मचा इतर मॉडेल्समध्येही विस्तार होईल. 2026 पर्यंत 7 इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करण्याची किआची योजना आहे. ईव्ही 6 या ऑर्डरमधील पहिले मॉडेल आहे.

शानदार डिझाईन

कारचं फ्रंट पॅनल आधुनिक पद्धतीने डिझाईन करण्यात आलं आहे. ईव्ही 6 मध्ये एक शॉर्ट ओव्हरहँग आहे, असं फोटोंवरुन समजतंय. या कारची हेडलाईट बारीक असून एलईडी पॅटर्नमुले या कारला एक अनोखा लुक मिळाला आहे. नवीन इंटीरियरबद्दलची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल आणि नेव्हिगेशन (AVN) स्क्रीन जी हायटेक आणि हाय डेफिनेशन क्वालिटीसह येते. Kia EV6 ची बॅटरी पॉवर या कारला विशेष बनवते आणि नवीन फिलॉसफीसह या करचं डिझाइन तयार केलं आहे. कंपनी आता लवकरात लवकर अजून काही इलेक्ट्रिक व्हिकल सादर करणार आहे.

3.5 सेकंदात 100 किमी वेग

ही कार 4680 मिमी लांब, 1880 मिमी रूंद आणि 1550 मिमी उंच आहे. किआ ईव्ही 6 ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये विकली जाते, ज्यात 58kWh आणि 77.4kWh चा समावेश आहे. या बॅटरीच्या मदतीने ही ईव्ही अवघ्या 3.5 सेकंदात 100 किमी प्रतितास इतका वेग पकडते. त्याच वेळी, केबिनमध्ये अधिक जागा असलेली बरेच दमदार फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.

18 मिनिटात 80% चार्ज

Kia EV6 मध्ये 800 व्होल्टची चार्जिंग सिस्टम मिळेल, ज्याच्या मदतीने केवळ 18 मिनिटांत ही कार 10 वरुन 80 टक्क्यापर्यंत चार्ज केली जाऊ शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार केवळ 4.30 मिनिटं चार्ज केली तरी ही कार किमान 100 किलोमीटरपर्यंत धावते. तर या कारची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 510 किलोमीटरची रेंज देते. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही EV6, EV6 GT-Line आणि EV6 GT सह तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. ही कार EV6 टू-व्हील ड्राइव्ह (2WD) आणि ऑल व्हील ड्राइव्हसह (AWS) सादर करण्यात आली आहे.

इतर बातम्या

एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार

(Kia EV6 gettting more attention from customers in Korea and european markets)

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.