Mahindra ची अल्ट्रामॉर्डन फीचर्सनी सुसज्ज XUV लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

महिंद्राची (Mahindra) बहुप्रतिक्षित XUV700 लवकरच बाजारात दाखल होणार आहे. ही 7 सीटर कार या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Mahindra ची अल्ट्रामॉर्डन फीचर्सनी सुसज्ज XUV लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
या महिन्यात होणार या ढासू कारची एन्ट्री
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 5:43 PM

मुंबई : महिंद्राची (Mahindra) बहुप्रतिक्षित XUV700 लवकरच बाजारात दाखल होणार आहे. ही 7 सीटर कार या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विक्रीसाठी उपलब्ध असेल. ही कार अल्ट्रामॉडर्न वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यात एक्सट्रा लाइटसह अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने या कारचा टीझरदेखील सादर केला आहे, ज्यामध्ये ही एक्सयूव्ही आकर्षक दिसतेय. (Mahindra XUV700 with ultramodern features ready to launch, know more)

महिंद्राच्या एक्सयूव्ही 700 मध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक्स आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम (ADAS) सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने यात 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ISOFIX चाईल्ड सीट माउंटसह 4 डिस्क ब्रेक देखील आहेत. रिपोर्ट्सनुसार एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, फुल एलईडी हेडलाइट्स, नवीन बिग ग्रिल, स्पोर्टी अ‍ॅलॉय व्हील्स आणि नवीन हॉरिजॉन्टली माउंटेड LED टेललाईट्सदेखील यात देण्यात आल्या आहेत.

रात्री ड्रायव्हिंग करणं सोपं होणार

महिंद्राची ही बहुप्रतिक्षित एक्सयूव्ही ‘ऑटो बूस्टर हेडलॅम्प्स’ (Auto Booster Headlamps) नावाच्या नवीन फीचरसह आली आहे. याद्वारे वाहन चालवताना, वाहनाचा वेग 80 किमीच्या पुढे गेला तर एक्स्ट्रा लाइट ऑन होईल. त्यामुळे ड्रायव्हरला अधिक चांगली व्हिजीबिलीटी प्राप्त होईल. अशा परिस्थितीत रात्री वाहन चालवणं अधिक सोपं होणार आहे.

‘या’ गाड्यांना टक्कर देणार

महिंद्रा एक्सयूव्ही 700 ही कार टाटा सफारी (Tata Safari), एमजी हेक्टर प्लस (MG Hector Plus) आणि ह्युंदाय अल्काझार (Hyundai Alcazar) सारख्या कारशी स्पर्धा करेल. यात उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच लोकांना सीट कम्फर्ट मिळेल याची काळजीही घेतली आहे. या कारची किंमत 15 लाखांपर्यंत असू शकते.

Mahindra XUV300 चा बाजारात जलवा

2021 मध्ये Mahindra XUV300 या कारच्या बुकिंगमध्ये 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, दरमहा सुमारे 6000 युनिट्स बुक केल्या जातात. या बुकिंगमध्ये बहुतेक ग्राहक पेट्रोल व्हेरिएंट निवडत असल्याचे निदर्शनास आले आहे. 48 टक्के ग्राहकांनी पेट्रोल व्हेरिएंटला पसंती दर्शवली आहे. दरम्यान, या वाहनाची लोकप्रियता इतकी वाढली आहे की या कारसाठीचा प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पीरियड) 12 महिने इतका झाला आहे.

ग्राहकही या वाहनाला सर्वाधिक पसंती देत ​​आहेत, कारण यात ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल पर्यायही मिळतात. म्हणजेच, जर आपण ही कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर हा निर्णय तुमच्यासाठी योग्य ठरेल, कारण यामध्ये तुम्हाला बरेच पर्याय मिळतील.

इतर बातम्या

अपडेटेड डिझाईन, जबरदस्त फीचर्ससह रेनॉ अधिकृत Dacia ची 2022 Duster बाजारात

5 नव्या फीचर्ससह Maruti Suzuki Baleno लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कशी असेल नवी कार

लांचिंगआधीच Hyundai च्या ‘या’ SUV साठी 4000 हून अधिक बुकिंग्स, डिझेल व्हेरिएंटला पसंती

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.