AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुती ग्रँड विटारा एसयुव्ही भारतात लाँच, एक लीटर पेट्रोलमध्ये तब्बल ‘इतका’ मायलेज…

ग्रँड विटाराच्या लुकबद्दल बोलायचे झाल्यास, यात मसकुलर बोनेट स्ट्रक्चर, वाइड सेंट्रल एअर एनटेक, स्पोर्टी फॉग लँप हाउसिंग, नवीन डिझाईनसह 17 इंचाचे अलॉय व्हील्सचा वापर करण्यात आला आहे. यात एक रुफ लाइनदेखील देण्यात आली आहे.

मारुती ग्रँड विटारा एसयुव्ही भारतात लाँच, एक लीटर पेट्रोलमध्ये तब्बल ‘इतका’ मायलेज...
| Updated on: Jul 20, 2022 | 5:29 PM
Share

मुंबईः भारतीय ऑटोमोबाईल बाजारामध्ये सर्वात लोकप्रिय ब्रँड असलेल्या मारुतीने (Maruti) आपल्या मिड साइज एसयुव्ही (mid size SUV) कारची माहिती शेअर केली आहे. या कारचे नाव मारुती ग्रँड विटारा एसयुव्ही असे ठेवण्यात आले आहे. या कारची स्पर्धा एमजी एस्टर, टाटा हॅरियर, किआ सेल्टोस अणि ह्युंदाई क्रेटासोबत होणार आहे. ही एक हायब्रिड इंजिनसह उपलब्ध होणारी कार आहे. यामुळे या कारला एक चांगला मायलेज उपलब्ध होणार आहे. ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये जवळपास 27.97 किमीचा मायलेज देईल, अशी अपेक्षा आहे. ग्रँड विटाराच्या लुकबद्दल (Features) बोलायचे झाल्यास, यात मसकुलर बोनेट स्ट्रक्चर, वाइड सेंट्रल एअर एनटेक, स्पोर्टी फॉग लँप हाउसिंग, नवीन डिझाईनसह 17 इंचाचे अलॉय व्हील्सचा वापर करण्यात आला आहे. यात एक रुफ लाइनदेखील देण्यात आली आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा कारची लेंथ 4.3 मीटर आहे. मारुतीची ही लेटेस्ट कार टोयोटा अर्बन क्रूजर अर्बन हायराइडर कार सारखी आहे. दोन्ही कार्समध्ये अनेक साम्य आहेत. दोन्ही कार्समध्ये एकसारखे पॉवरट्रेनचा वापर करण्यात आला आहे. या दोन्ही कार्सचा बाहेरील लूकदेखील एकमेकांशी मेळ खातो.

फीचर्स आणि किंमत

मारुती सुझुकी ग्रँड विटारामध्ये सुझुकी लोगोसोबत एक स्लीक एलईडी टेललँप देण्यात आला आहे. ही कार हाई माउंटेड फॉग लँपसह उपलब्ध होते. मारुतीने आपल्या या कारला टोयोटा वाहन निर्माताच्या कर्नाटकातील फॅक्ट्रीमध्ये तयार केले आहे. या कारची किंमत अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही. परंतु याची संभावित किंमत 9.35 लाख रुपयांपासून 19.5 लाख रुपयांपर्यंत (एक्सशोरुम किंमत) आहे.

पॉवरफूल इंजिन

मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या इंजिनबाबत बोलायचे झाल्यास, यात 1.5 लीटरचा 4 सिलेंडर के15सी माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6000 आरपीएमवर 103 पीएसची पावर आणि 4400 आरपीएमवर 135 एनएमचा टार्क जनरेट करु शकते. यात 5 स्पीड मॅन्यूअल आणि 6 स्पीड टार्क कंव्हर्टर देण्यात आले आहे.

हायब्रिड सिस्टीम

हायब्रिड सिस्टीम 177.6 वोल्ट लिओन बॅटरी पॅकच्या सोबत कनेक्टेड आहे. बॅटरीच्या मदतीने ही कार जवळपास 25 किमीपर्यंत चालू शकते. यासोबत कंपनीच्या दाव्यानुसार, कारला 27.97 किमीपर्यंतचा मायलेज मिळू शकतो. आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक मायलेज देणारी कार ठरते.

महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल...
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं.
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.