मारुती सुझुकीच्या ‘या’ CNG गाड्यांवर 40 हजारांचा डिस्काऊंट

जानेवारी 2021 मध्ये मारुती सुझुकीची विक्री 0.6 टक्क्यांनी घसरली होती. ही आकडेवारी फेब्रुवारी 2021 मध्ये 11.8 टक्क्यांनी वाढली आहे.

मारुती सुझुकीच्या 'या' CNG गाड्यांवर 40 हजारांचा डिस्काऊंट
Maruti Suzuki

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात जवळपास सर्वच ऑटो कंपन्या तोट्यात होत्या. परंतु या कंपन्या आता हळूहळू ट्रॅकवर येऊ लागल्या आहेत. बहुतांश वाहन उत्पादक कंपन्यांची वाहन विक्री पुन्हा एकदा उच्चांकास स्पर्श करु लागली आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी आता त्यांच्या वाहनांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. अधिक मागणीमुळे, कार उत्पादक कंपन्या आता त्यांच्या वेगवेगळ्या कार्सवर लाभ आणि सूट जाहीर करत आहेत. (Maruti Suzuki giving Rs 40000 dicount on alto, wagonR, S presso, celerio)

जानेवारी 2021 मध्ये मारुती सुझुकीची विक्री 0.6 टक्क्यांनी घसरली होती. त्याच वेळी, ही आकडेवारी फेब्रुवारी 2021 मध्ये 11.8 टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षी याच महिन्यात कंपनीने 1,47,110 वाहनांची विक्री केली होती. यंदा कंपनीने फेब्रुवारी महिन्यात 1,64,469 वाहनांची विक्री केली आहे. अशा परिस्थितीत वाहन निर्माता कंपनीने पुन्हा एकदा आपल्या वाहनांवर सूट घोषित केली आहे.

मारुतीने एस-सीएनजी (S-CNG) वाहनांवर सूट जाहीर केली आहे. मारुती कंपनी त्यांच्या वाहनांसोबत बचत, सुरक्षा आणि सॉलिड परफॉर्मन्सचं वचन देते. मारुती कंपनीचे म्हणणे आहे की, त्याच्या एस-सीएनजी गाड्या मार्केटमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी बनवण्यात आल्या आहेत.

या गाड्यांवर डिस्काऊंट

कंपनीने सवलतीसह कांही गाड्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मारुती सुझुकी अल्टो, वॅगनआर, एस प्रेसो, अर्टिंगा, इको आणि सेलेरिओ या कार्सच्या सीएनजी व्हेरिएंट्सचा समावेश आहे. सवलतीच्या बाबतीत, अल्टो कारवर 30,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर एस प्रेसोवर 40,000 रुपयांची सूट जाहीर करण्यात आली आहे. तसेच कंपनीने इको आणि सेलेरिओवरही 40 हजार रुपयांची सूट देऊ केली आहे.

सरकारी कर्मचार्‍यांसाठीही कंपनीने खास सवलत सादर केली आहे. यात कर्मचार्‍यांना 4000 रुपयांपर्यंत खास एलटीसी बोनान्झा ऑफर मिळत आहे. मारुतीने म्हटले आहे की त्यांची वाहने लीक प्रूफ डिझाइन आणि इंटीग्रेटेड हार्नेससह सादर करण्यात आली आहेत. त्याच वेळी उत्कृष्ट कामगिरीसाठी वाहनांमध्ये मजबूत सस्पेंशन आणि इंटेलिजेंट इंजेक्शन सिस्टिम देण्यात आली आहे, जेणेकरून प्रत्येक रस्ता सहज पार केला जाऊ शकेल. त्याच वेळी, कारमध्ये इंधनाची अधिक बचत व्हावी यासाठी आपल्याला उत्कृष्ट मायलेज आणि वॉरंटीदेखील मिळते.

इतर बातम्या

शानदार ऑफर! 5 लाखांची कार अवघ्या 1.90 लाखात

Green Highways वर सरकार 7 लाख कोटी खर्च करणार, नितीन गडकरींचं सॉलिड प्लॅनिंग

कार्सपाठोपाठ बाईक-स्कूटरदेखील महागणार, हिरो मोटोकॉर्पकडून Price Hike ची घोषणा

(Maruti Suzuki giving Rs 40000 dicount on alto, wagonR, S presso, celerio)