AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरुषांची मक्तेदारी संपली, मारुती सुझुकीचा महिलांसाठी मोठा निर्णय, कंपनीचा मास्टर प्लॅन काय?

मारुती सुझुकीने आपल्या उत्पादन प्रकल्पांमध्ये महिलांचा सहभाग वाढवला असून, आता महिला थेट कार निर्मिती आणि इंजिन असेंब्लीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत

पुरुषांची मक्तेदारी संपली, मारुती सुझुकीचा महिलांसाठी मोठा निर्णय, कंपनीचा मास्टर प्लॅन काय?
Maruti Suzuki
| Updated on: Apr 16, 2026 | 3:10 PM
Share

कार निर्मितीचा कारखाना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त पुरुष कामगार येतात. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलताना पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आपल्या कारखान्यांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणावर कामाला घेतले आहे. विशेष म्हणजे या महिला फक्त ऑफिसचे काम करत नाहीत, तर थेट कारच्या सुट्या भागांची जोडणी आणि इंजिन बनवण्याचे कठीण काम देखील करत आहेत.

मारुती सुझुकीने त्यांच्या गुरुग्राम आणि मानेसर या ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या वेगाने वाढवली आहे. गेल्या एका वर्षात १९० हून अधिक महिलांना कार बनवण्याच्या मुख्य कामात सामावून घेण्यात आले आहे. यामुळे कंपनीतील एकूण महिला कर्मचाऱ्यांची संख्या १,३०० च्या वर पोहोचली आहे. या महिला आता कारचे इंजिन जोडणे, गाडीची जुळणी करणे आणि गाडीची गुणवत्ता तपासणे अशी महत्त्वाची कामे करत आहेत.

महिलांसाठी विशेष सोयी-सुविधा

  • या कारखान्यात काम करणाऱ्या महिलांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कंपनीने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत.
  • महिलांसाठी वेगळी स्वच्छतागृहे, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र जागा आणि लहान मुलांसाठी पाळणाघराची सोय केली आहे.
  • महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करताना कोणतीही भीती वाटू नये, म्हणून खास सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. तसेच या परिसरात गस्त देखील वाढवण्यात आली आहे.
  • पुरुषांप्रमाणेच महिलांनाही नवीन तंत्रज्ञान आणि मशिनरी हाताळण्याचे तज्ज्ञ प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी महिलांचा आदर राखला जावा यासाठी POSH सारखे विशेष ट्रेनिंग सर्व कर्मचाऱ्यांना दिले जाते.

कंपनीचे मत काय आहे?

याबद्दल मारुती सुझुकीचे सीईओ हिसाशी ताकेउची यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडे आधीपासूनच अनेक महिला मार्केटिंग किंवा ऑफिसमध्ये काम करत होत्या. पण कार निर्मितीच्या मुख्य प्रवाहात त्या आल्या, तरच खरा बदल दिसेल. आमच्या कंपनीला केवळ महिलांची संख्या वाढवायची नाही, तर त्यांना पुरुषांच्या बरोबरीने संधी देऊन सक्षम बनवायचे आहे, असे सीईओ हिसाशी ताकेउची यांनी सांगितले. दरम्यान मारुती सुझुकीचा हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे वाहन उद्योगात काम करणाऱ्या इतर महिलांसाठीही करिअरचे नवीन दरवाजे उघडले आहेत.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं