Maruti Suzuki दोन शानदार कार लाँच करणार, जाणून घ्या नव्या गाड्यांमध्ये काय असेल खास

मारुती सुझुकीने अलीकडेच नवीन, अधिक शक्तिशाली इंजिन, उत्तम स्टाईलिंग आणि बर्‍याच वैशिष्ट्यांसह स्विफ्ट हॅचबॅक कार सादर केली आहे.

Maruti Suzuki दोन शानदार कार लाँच करणार, जाणून घ्या नव्या गाड्यांमध्ये काय असेल खास
Maruti Suzuki Vitara Brezza

मुंबई : इंडो-जपानी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने अलीकडेच नवीन, अधिक शक्तिशाली इंजिन, उत्तम स्टाईलिंग आणि बर्‍याच वैशिष्ट्यांसह स्विफ्ट हॅचबॅक कार सादर केली आहे. येत्या काही महिन्यांत, कंपनी सेलेरिओ हॅचबॅक आणि विटारा ब्रेझा सब 4 मीटर एसयूव्हीचे नवीन-जनरेशन मॉडेल सादर करणार आहे. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार 2021 मारुती सुझुकी सेलेरिओ (2021 Maruti Suzuki Celerio) मे महिन्यात लाँच केली जाईल आणि 2021 मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (2021 Maruti Suzuki Vitara Brezza) यंदाच्या दिवाळीत लाँच केली जाण्याची शक्यता आहे. (Maruti Suzuki will launch two new cars, find out what will be special in the new cars)

मारूती सेलेरिओ विद्यमान आर्किटेक्चर वरून नवीन हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर बदलली जाईल. या कारच्या लीक झालेल्या फोटोंमधून असा अंदाज बांधळा जात आहे की, ही हॅचबॅक कार तिचा टॉल ब्वॉय स्टान्स कायम ठेवेल. नवीन लाँच होणारी सेलेरिओ सध्याच्या सेलेरिओपेक्षा थोडी मोठी असेल, या कारमध्ये अधिक स्पेस मिळेल. जर आपण कारच्या डिझाइनमधील बदलांविषयी चर्चा केली तर यात नवीन ग्रिल, अपडेटेड हेडलॅम्प्स, बंपर्स आणि टेललॅम्प दिले जाऊ शकतात.

नव्या हॅचबॅकच्या इंटीरिरमध्ये अनेक नवे फीचर्स दिले जातील, जे ग्राहकांचं लक्ष वेधून घेतील. यात 7.0 इंचांची स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेन्मेंट सिस्टम, नवीन डॅशबोर्ड आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीयरिंग माउंट कंट्रोल्स आणि ऑटोमॅटिक क्लायमेट युनिटचा समावेश असेल. 2021 मारुती सेलेरिओ 83bhp, 1.2L पेट्रोल आणि 68bhp, 1.0L पेट्रोल इंजिन आणि 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गियरबॉक्ससह सादर केली जाईल.

कशी असेल 2021 Maruti Suzuki Vitara Brezza

दरम्यान, अशा काही अफवा समोर येत आहेत की, 2021 मारुती विटारा ब्रेझा ही सध्याच्या आर्किटेक्चर किंवा सुझुकीच्या हार्ट प्लॅटफॉर्मच्या सुधारित आवृत्तीवर (मॉडिफाइड वर्जन) आधारित असेल. यात काही नवे अपडेट्स देखील मिळतील. न्यू जनरेशन मॉडेल 1.5L डिझेल इंजिनसह उपलब्ध केले जाईल.

या कारबाबत जे अहवाल प्रसिद्ध करण्यात आले आहेत त्यात असे सुचविले गेले आहे की, या सब कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये 1.5L चे 1515 नॅचरल एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन (104bhp / 138Nm) मजबूत लाइटवेट हायब्रिड सिस्टम असेल. नवीन विटारा ब्रेझामध्ये अनेक फीचर्स दिले जाऊ शकतात. यात आपल्याला कार कनेक्टेड टेक्नोलॉजी, वायरलेस फोन चार्जिंग आणि नवीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले जाऊ शकते.

संबंधित बातम्या

Maruti Suzuki च्या ‘या’ तीन कार्सवर डिस्काऊंट, 50 हजारांची सूट मिळवण्याची अखेरची संधी

मारुती सुझुकीच्या ‘या’ CNG गाड्यांवर 40 हजारांचा डिस्काऊंट

Maruti Suzuki Car Price Hike: येत्या महिन्यापासून मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार, जाणून घ्या

(Maruti Suzuki will launch two new cars, find out what will be special in the new cars)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI