मारुती सुझुकीचा विक्रम; 35 वर्षांत 100 देशांत 20 लाख कारची विक्री

मारुती सुझुकीचा विक्रम; 35 वर्षांत 100 देशांत 20 लाख कारची विक्री (Maruti Suzuki's record; Sales of 20 lakh cars in 100 countries in 35 years)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:24 PM, 27 Feb 2021
मारुती सुझुकीचा विक्रम; 35 वर्षांत 100 देशांत 20 लाख कारची विक्री
मारुती सुझुकीच्या छोट्या मोटारींची मार्चमध्ये धूम

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीच्या नावावर नवा विक्रम नोंद झाला आहे. कंपनीने 1986-87 पासून आतापर्यंत म्हणजेच मागील 35 वर्षात 100 हून अधिक देशांमध्ये तब्बल 20 लाख कारची निर्यात करून तेथे विक्री केली आहे. या विक्रमाने कंपनीच्या लोकप्रियता कैकपटीने वाढल्याचे स्पष्ट होत आहे. मारुती सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 1986-87 मध्ये कारच्या निर्यातीचा श्रीगणेशा केला होता. मारुती सुझुकीच्या 500 कारची पहिली ऑर्डर सप्टेंबर 1987 साली हंगेरीत पाठवण्यात आली होती. त्यानंतर 2012-13 मध्ये 10 लाख कारच्या टप्पा कंपनीने ओलांडला. हा कंपनीच्या प्रवासातील मैलाचा दगड ठरला. पुढे कंपनीच्या विक्रीचा आलेख झपाट्याने उंचावला. सुरुवातीच्या 10 लाख कारपैकी 50 टक्क्यांहून अधिक गाड्यांची युरोपिय देशांमधील विकसित मार्केटमध्ये निर्यात करण्यात आली होती, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. (Maruti Suzuki’s record; Sales of 20 lakh cars in 100 countries in 35 years)

सध्या 14 मॉडेल्सचे 150 व्हेरिएंट उपलब्ध

कंपनीने जारी केलेल्या रिलिजनुसार, मारुती सुझुकीने लॅटिन अमेरिका, अफ्रीका आणि आशिया क्षेत्रांतील विकसनशील बाजारपेठांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे पुढील आठ वर्षातच कंपनीला आणखी 10 लाख गाड्यांच्या विक्रीचे उद्दीष्ट पूर्णत्वास नेता आले. कंपनीने चिली, इंडोनेशिया, दक्षिण अफ्रीका आणि श्रीलंका यांसारख्या बाजारपेठांमध्ये कंपनीला मोठे यश मिळवता आले. इथल्या बाजारपेठांमध्ये ऑल्टो, बलेनो, डिजायर आणि स्विफ्ट यांसारखी मॉडेल ग्राहकांचा लोकप्रिय पर्याय ठरली. सध्याच्या घडीला आम्ही 100 हून अधिक देशांमध्ये 14 मॉडेलचे जवळपास 150 वेरिएंट निर्यात करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कॉम्पॅक्ट ऑफ-रोडर जिम्नीचे उत्पादन आणि निर्यात सुरू

कंपनीने यंदा जानेवारीत भारतातून सुझुकीच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट ऑफ-रोडर जिम्नीचे उत्पादन आणि निर्यात सुरू केली. मारुती सुझुकीने जानेवारीत 184 वाहनांची पहिली ऑर्डर मुंद्रा बंदरगाहहून कोलंबिया आणि पेरू यांसारख्या लॅटिन अमेरिकन देशांमध्ये पाठवली होती. आयकॉनिक तीन दरवाजे असलेली एसयूवी कारची लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि अफ्रीकेतील बाजारपेठांमध्ये भारतातून निर्यात केली जाईल. सध्या यूरोपमध्ये सातत्याने बदलत राहिलेल्या नियमांमुळे याठिकाणी जिम्नी कारची निर्यात करण्यात आलेली नाही. जिम्नी कारचे उत्पादन भारतात होत आहे. त्याआधारे कंपनी वैश्विक उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी फायदा घेण्याच्या तयारीत आहे. जिम्नीचे उत्पादन हरियाणाच्या मानेसर येथील प्लांटमध्ये केले जात आहे. जिम्नीची लांबी 3,645 mm, रुंदी 1,645 mm आणि ऊंची 1,720 mm आहे. याशिवाय यात 1.5 लीटर K15B नॅच्यरली एस्पीरेटचेड पेट्रोल इंजन मिळू शकेल. हे इंजिन 105 एचपीची पाॅवर देईल. (Maruti Suzuki’s record; Sales of 20 lakh cars in 100 countries in 35 years)

इतर बातम्या

खूशखबर ! आता स्मार्टफोन देणार मोतीबिंदूच्या त्रासापासून आराम, जाणून घ्या कसे होईल फायदेशीर

चुकीचं काम केलं असेल तर शिक्षा झालीच पाहिजे, मग उदयनराजे का असेना; पूजा चव्हाण प्रकरणी उदयनराजे कडाडले