AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mercedes-Benz EQS AMG 53 4Matic+ लक्झरी इलेक्ट्रिक कार लाँच, किंमत ऐकून चक्करच येईल

ऑल न्यू मर्सिडीज बेंझ EQS AMG 53 4Matic+ ही इलेक्ट्रिक सेडन कार कंपनीकडून बाजारात आणण्यात आली आहे. अपकमिंग कारमध्ये 107.8kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे, की EQS AMG 53 4Matic+ इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 570 किमीपर्यंतचा प्रवास करू शकते.

Mercedes-Benz EQS AMG 53 4Matic+ लक्झरी इलेक्ट्रिक कार लाँच, किंमत ऐकून चक्करच येईल
| Updated on: Aug 24, 2022 | 5:20 PM
Share

जर्मन लक्झरी कार ब्रँड मर्सिडीज-बेंझने (Mercedes Benz) आज एक नवीन इलेक्ट्रिक सेडन कार लाँच केली आहे. कंपनीने मर्सिडीज EQS AMG 53 4Matic+ भारतात आणली आहे. नवीन कार मर्सिडीज-बेंझची पहिली ऑल-इलेक्ट्रिक एएमजी कार (electric car) आहे. एका चार्जवर ही कार 570 किमीपर्यंत रेंज मिळवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. येत्या पाच वर्षांत मर्सिडीजच्या भारतातील एकूण विक्रीत इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा 25 टक्के असेल. यासाठी कंपनी 2022 मध्ये भारतात तीन नवीन इलेक्ट्रिक कार आणणार आहे. त्याची सुरुवात आज मर्सिडीज-बेंझ EQS AMG 53 4Matic+ लाँच करून होत आहे. न्यू इलेक्ट्रिक सेडन कारची सुरुवातीची एक्सशोरूम किंमत (ex showroom price) 2.45 कोटी रुपये आहे.

मर्सिडीज EQS AMG 53 4Matic+ कार कॉम्प्लेटली बिल्ट युनिट (CBU) मार्गाने भारतात आणली जाईल. ग्राहकांना 2 वर्षे / 30,000 किमीची सर्व्हिस वॉरंटी आणि 10 वर्ष/2,50,000 किमीची बॅटरी वॉरंटी मिळेल. TOI नुसार, अपकमिंग कार ही भारतातील सर्वोच्च EV आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एका चार्जवर 529-586 किमीपर्यंत रेंज देईल.

एक्सटिरियर आणि EQS 580 लाँच

अत्याधुनिक मर्सिडीज कारमध्ये डीआरएलसोबत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एलईडी लाइटिंग देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कार असल्याने तिच्या ग्रिलला स्पोर्टी डिझाइन देण्यात आले आहे. त्याच वेळी, कारच्या मागील बाजूस उत्कृष्ट लाईटींगदेखील बघायला मिळणार आहे. कारच्या मागील बॅक लाइटला 3D कर्व मिळाला आहे. मर्सिडीजच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे कंपनीने आज सांगितले आहे, की ती पुढील महिन्यात भारतात EQS 580 देखील लॉंच करणार आहे.

भारतातील अशी पहिली कार

2022 EQS ही 56 इंचाची MBUX हायपरस्क्रीन असलेली मर्सिडीजची भारतातील पहिली कार आहे. हायपरस्क्रीन गोरिल्ला ग्लासच्या आत तीन स्वतंत्र OLED डिस्प्लेसह एकत्रित केले आहे. हे 8 CPU कोर आणि 24GB RAM ला सपोर्ट करते. नवीन इलेक्ट्रिक सेडन कारमध्ये 107.8kWh क्षमतेचे बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही कार केवळ 3.4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते आणि तिचा वेग 250 किमी प्रतितास इतका आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.