AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mercedes-Benz च्या दोन नव्या SUV बाजारात, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) GLA आणि AMG GLA 35 4M या दोन नवीन गाड्या भारतीय बाजारात दाखल करत आहे.

Mercedes-Benz च्या दोन नव्या SUV बाजारात, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स
Mercedes-Benz GLA And AMG GLA 35
| Updated on: May 25, 2021 | 5:01 PM
Share

पुणे : भारतातील आघाडीची लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझने (Mercedes-Benz) GLA आणि AMG GLA 35 4M या दोन नवीन गाड्या संपूर्ण भारतात उपलब्ध करत असल्याची घोषणा केली आहे. या कार ऑनलाईन खरेदी करू इच्छिणारे ग्राहक या दोन्ही एसयूव्हीज् (SUVs) कंपनीच्या ऑनलाईन स्टोरवरुनदेखील खरेदी करु शकतात. (Mercedes-Benz GLA And AMG GLA 35 Launched In India; Prices Start At Rs 42.10 Lakh)

GLA ही एसयूव्ही एप्रिलमध्ये बाजारात दाखल केली जाणार होती. परंतु देशातील कोव्हिड-19 ची परिस्थिती पाहता कंपनीने हे काम पुढे ढकललं. आता मे महिन्याच्या शेवटी या गाड्या बाजारपेठेत दाखल करण्यात येत आहेत. ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, व्यवसाय निरंतरतेला बळ देण्यासाठी आणि रिटेल नेटवर्कच्या आर्थिक स्थिरतेसाठी कंपनीने आपल्या या दोन नव्या गाड्या विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या एसयूव्हींच्या किंमती (सर्व किमती एक्स-शोरूम भारत)

  • GLA 200 – 42.10 लाख रुपये)
  • GLA 2020D – 43.7 लाख रुपये
  • GLA 2020D 4M – 46.7 लाख रुपये
  • AMG GLA 35 4M – 57.3 लाख रुपये

या इंट्रोडक्टरी किंमत 30 जून 2021 पर्यंत लागू राहतील. 1 जुलै 2021 पासून GLA च्या किमती 1.5 लाख रुपयांनी वाढतील.

8 वर्षांची वॉरंटी

नवीन GLA आणि AMG GLA 35 4M मधील इंजिन आणि ट्रान्स्मिशनवर 8 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. जी या उद्योगक्षेत्रातील सर्वाधिक आहे, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच या सेगमेंटमधील सर्वोत्तम 3 वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटीदेखील यासोबत दिली जात आहे.

आगामी वाहनं लाँच होण्यास उशीर होण्याची शक्यता

मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मार्टिन श्वेन्क यांनी सांगितले की, “आमच्या लोकांचे आरोग्य आणि सुरक्षा यांना आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो आणि आमच्या आजूबाजूच्या लोकांच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देत आहोत. त्याचवेळी व्यवसाय सुरळीतपणे चालत राहणे, आमच्या नेटवर्कला आणि संपूर्ण इकोसिस्टिमला पाठिंबा दिला जाणे, या देखील महत्त्वाच्या बाबी आहेत.

सध्याच्या काळात आर्थिक पातळीवर विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि भविष्याच्या दृष्टीने सकारात्मक दृष्टीकोन कायम राखण्यासाठी आम्हाला या बाबींची मदत होत आहे. 2021 साठी आम्ही जे धोरण आखले होते, त्यावर आम्ही आजही ठाम आहोत आणि सध्या त्यामध्ये कोणतेही लक्षणीय बदल करण्यात आलेले नाहीत. परंतु बाजारपेठेतील आव्हाने लक्षात घेऊन काही उत्पादने दाखल करण्यात विलंब होऊ शकतो.

कंपनीचं बाजारापेठेबाबतचं जुनं धोरण कायम

श्वेन्क म्हणाले की, “नवीन जीएलए अधिक जास्त प्रभावी आहे, आधीच्या गाड्यांच्या तुलनेत नवीन जीएलएमध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. दीर्घकाळापासून या गाडीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्राहकांच्या सर्व इच्छा यानिमित्ताने पूर्ण होतील यात काहीच शंका नाही. ही एसयूव्ही आता स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या AMG च्या रूपात AMG GLA 35 4M म्हणून दाखल केली जात आहे. हे आमचे तिसरे AMG मॉडेल आहे. या उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम 8 वर्षांची वाढीव वॉरंटी इंजिन आणि ट्रान्समिशनवर दिली जात असल्याने GLA आणि AMG GLA 35 4M चे अनोखेपण अधिकच वाढले आहे.

देशभरात जिथे-जिथे उद्योगव्यवसाय सुरु आहेत तेथील ग्राहकांना या गाड्या विकत घेता येतील. इच्छा असल्यास ग्राहक आमच्या शोरूम्सनादेखील भेट देऊ शकतात, त्याठिकाणी सर्व स्थानिक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते किंवा ऑनलाईन स्टोरमार्फत संपूर्णपणे सुरक्षित, संपर्करहित प्रक्रियेमार्फत देखील ग्राहक GLA ऑर्डर करू शकतात. आम्ही आशा करतो की, कोव्हिड-19 मुळे निर्माण झालेले हे वादळ लवकरच निवळेल आणि आपल्या जीवनात पूर्वीचे सर्वसामान्य दिवस परत येतील.”

इतर बातम्या

Baleno, Ciaz, Nexa सह Maruti च्या गाड्यांवर 50000 रुपयांचा बंपर डिस्काऊंट

बंपर ऑफर! मारुतीची CNG कार अवघ्या 34 हजारात खरेदीची संधी

Mahindra वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय

(Mercedes-Benz GLA And AMG GLA 35 Launched In India; Prices Start At Rs 42.10 Lakh)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...