BMW 220i ब्लॅक शॅडो एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

BMW इंडियाने भारतात 2 सीरीज ग्रॅन कूपचे नवीन लिमिटेड एडीशन मॉडेल लॉन्च केले आहे. BMW 220i 'ब्लॅक शॅडो' एडीशन म्हणून नॉमिनेट, नवीन मॉडेल फक्त 24 युनिट्सपुरते मर्यादित असेल.

BMW 220i ब्लॅक शॅडो एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Bmw 220i Black Shadow Edition
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 6:04 PM

मुंबई : BMW इंडियाने भारतात 2 सीरीज ग्रॅन कूपचे नवीन लिमिटेड एडीशन मॉडेल लॉन्च केले आहे. BMW 220i ‘ब्लॅक शॅडो’ एडीशन म्हणून नॉमिनेट, नवीन मॉडेल फक्त 24 युनिट्सपुरते मर्यादित असेल. या कारची किंमत 43.50 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) इतकी आहे. अलिकडच्या काळात BMW India ने लॉन्च केलेल्या स्पेशल आणि लिमिटेड एडीशन्सप्रमाणे, नवीन 2GC ब्लॅक शॅडो एडिशन फक्त BMW ऑनलाइन शॉपमधून ऑनलाइन खरेदी करता येईल. (New BMW 220i Black Shadow Edition Launched in India; check price and specs)

BMW 2 सीरीज ग्रॅन कूप ‘ब्लॅक शॅडो’ एडिशन एम स्पोर्ट डिझाईन ट्रिममध्ये उपलब्ध असेल आणि ती फक्त पेट्रोल व्हर्जनमध्ये येते. कारच्या व्हिज्युअल हायलाइट्सबद्दल बोलायचे झाल्यास BMW 2 सीरीज ग्रॅन कूप ‘ब्लॅक शॅडो’ एडिशन दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये अल्पाइन व्हाइट (नॉन-मेटलिक) आणि ब्लॅक सॅफायर (मेटलिक) या रंगांचा समावेश आहे. उपलब्ध अपहोल्स्ट्री अनुक्रमे Sensatec Oyster आणि Sensatec Black आहेत. एक्सटीरियरमध्ये BMW इंडिविजुअल हाय-ग्लॉस शॅडो लाइन पॅकेज, हाय-ग्लॉस ब्लॅक मेश-स्टाईल एम फ्रंट ग्रिल आणि ब्लॅक एक्सटीरियर मिरर कॅप देखील आहे.

कारला BMW ‘M’ परफॉर्मन्स रियर स्पॉयलर देखील मिळतो, जो हाय-ग्लॉस ब्लॅकमध्ये पूर्ण होतो, त्यासोबत ब्लॅक क्रोम टेलपाइप्स आणि जेट ब्लॅक मॅटमध्ये 18 इंच M परफॉर्मन्स Y स्पोक स्टायलिंग 554M फोर्ज्ड व्हील्स आहेत.

‘ब्लॅक शॅडो’ एडीशनमध्ये काय आहे खास?

केबिनसाठी, BMW 2 सिरीज ग्रॅन कूप ‘ब्लॅक शॅडो’ एडिशनमध्ये ड्रायव्हर-फोकस्ड कॉकपिट, मोठे पॅनोरमिक ग्लास सनरूफ, इलेक्ट्रिकल मेमरी फंक्शनसह स्पोर्ट सीट्स आणि 40/20/40 स्प्लिट रीअर सीट बॅकरेस्ट यासारखे फीचर्स आहेत. याशिवाय, नवीन लिमिटेड एडिशन मॉडेल सेगमेंट-फर्स्ट ट्रिम ऑफर करते.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत, कार 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आणि 10.25 इंच इन्फोटेन्मेंट सिस्टमसह BMW Live Cockpit Professional सह येते, ज्यामध्ये 3D नेव्हिगेशन आहे. BMW व्हर्च्युअल असिस्टंटशी बोलून किंवा जेश्चर कंट्रोल्सद्वारे सिस्टम कंट्रोल केली जाऊ शकते. कारला स्मार्टफोन इंटिग्रेशनसह (Apple CarPlay आणि Android Auto) रियर व्ह्यू कॅमेरा, रिव्हर्सिंग असिस्टंट आणि पार्किंग असिस्टंट देखील मिळतो.

दमदार इंजिन

BMW 220i ब्लॅक शॅडो एडिशन 2.0 लीटर ट्विन पॉवर टर्बो फोर-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. या कारची मोटर 1350-4600 rpm वर 187 bhp पॉवर आणि 280 Nm मॅक्सिमम टॉर्क जनरेट करते. इंजिन पॅडल-शिफ्टर्ससह 7 स्पीड स्टेपट्रॉनिक स्पोर्ट ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. कार केवळ 7.1 सेकंदात 0-100 किमी प्रतितास इतका वेग पकडते.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(New BMW 220i Black Shadow Edition Launched in India; check price and specs)

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.