Mercedes-Benz ची लक्झरी E-Class चं नवं फेसलिफ्ट मॉडेल लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मर्सिडीज बेंझने (Mercedes-Benz) आज त्यांचे ई-क्लास फेसलिफ्ट मॉडेल (E-Class Facelift Model) भारतात लॉन्च केले आहे.

Mercedes-Benz ची लक्झरी E-Class चं नवं फेसलिफ्ट मॉडेल लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Mercedes-Benz E-Class

मुंबई : मर्सिडीज बेंझने (Mercedes-Benz) आज त्यांचे ई-क्लास फेसलिफ्ट मॉडेल (E-Class Facelift Model) भारतात लॉन्च केले आहे. कंपनीने ही लक्झरी सेडान कार 63.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किंमतीत बाजारात सादर केली आहे. (New Mercedes-Benz E-Class facelift launch in India)

मर्सिडीज-बेंझ ई-क्लास (Mercedes-Benz E-Class) फेसलिफ्ट मॉडेलच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने या कारचा फ्रंट लुक बर्‍यापैकी अपडेट केला आहे. या कारच्या बम्परसह नवीन ग्रिल आणि रीडिजाइन्ड एलईडी हेडलॅम्प दिले आहेत. साइड प्रोफाइलमधील बदलांबद्दल बोलायचे झाल्यास त्यात केवळ 17 इंचाचे अलॉय व्हील्स जोडले आहेत. त्याच वेळी, त्याच्या मागील बाजूस नवीन टेललाइट्स बसविण्यात आल्या आहेत.

Mercedes-Benz E-Class फेसलिफ्टचं इंटीरियर

2021 Mercedes-Benz E-Class फेसलिफ्टच्या इंटिरियरबद्दल बोलायचे झाल्यास, यात एक नवीन MBUX (मर्सिडीज-बेंझ युझर एक्सपीरियन्स) मल्टीमीडिया सिस्टम आहे जी ‘Hey Mercedes’ व्हॉईस कमांड फीचरवर काम करते. यासह, यामध्ये दोन यूएसबी पोर्ट देखील देण्यात आले आहेत आणि रियर-सेंटर टचस्क्रीन कन्सोल देखील देण्यात आलं आहे. त्याच वेळी, मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांसाठी आता अधिक जागा मिळेल.

या लक्झरी सेडानच्या इंजिनबद्दल सांगायचे तर त्याला आधीच्या इंजिनसारखेच पर्याय मिळतील, ज्यामध्ये 2.0 लीटरचे-सिलेंडर इन-लाइन पेट्रोल इंजिन मिळेल ज्यामध्ये 194hp पॉवर आणि 320Nm टॉर्क जनरेट होईल. त्याच वेळी, 2.0 लीटर 4-सिलेंडर इन-लाइन डिझेल इंजिन दिले गेले आहे जे 192hp पॉवर आणि 400Nm ची टॉर्क उत्पन्न करते, तसेच यामध्ये तिसरे 3.0 लीटर डिझेल इंजिन असेल. यासह, तुम्हाला -स्पीड ऑटोमेटिक ट्रांसमिशन मिळेल.

सेफ्टी फीचर्स

या कारच्या सेफ्टी फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास नवीन मर्सिडीज-बेंझ ई-क्लास फेसलिफ्टमध्ये (Mercedes-Benz E-Class Facelift) सात एअरबॅग्स, ABS, EBD, ESP, TPMS, पार्कट्रॉनिकसह पार्किंग असिस्ट, अ‍ॅक्टिव्ह ब्रेक असिस्ट आणि 360 डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने ही कार डिझाईनो हयाकिंथ रेड, पोलर व्हाइट, ओबसिडीयन ब्लॅक, हायटेक सिल्व्हर, मोजावे सिल्व्हर आणि सेलेनाइट ग्रे अशा 6 रंगांमध्ये सादर केली आहे.

मर्सिडीजची 15 वी कार

मर्सिडीज बेंझने 1994 मध्ये भारतीय बाजारात प्रवेश केला होता. भारतातील मर्सिडिज बेंझचं मुख्यालय पुण्यात आहे. 1996 मध्ये या कंपनीने बंगळुरू येथे आपले संशोधन आणि विकास केंद्र स्थापन केले होते. भारतात मर्सिडीज-बेंझचा विस्तृत उत्पादन पोर्टफोलिओ आहे. भारत आता कंपनीसाठी मोठी बाजारपेठ आहे. मर्सिडीज बेंझच्या बर्‍याच मोटारी भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कंपनीने भारतात आतापर्यंत एकूण 14 मॉडेल्स लाँच केल्या आहेत. आज कंपनीने त्यांच 15 व मॉडेल सादर केलं आहे.

इतर बातम्या

2 रुपयात 5 किमी धावणार, ‘ही’ इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्या

Kia ची इलेक्ट्रिक कार EV6 चा फर्स्ट लूक जारी, नव्या डिझाईनसह कार सादर होणार

तुमच्याकडे मारुती सुझुकीची ‘ही’ कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

(New Mercedes-Benz E-Class facelift launch in India)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI