KIA SBI YONO offer : तुम्हीही KIA कारच्या प्रेमात आहात? एसबीआयची भन्नाट ऑफर जरुर पाहा!

जर तुम्ही नवी कोरी किया (KIA) कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) भन्नाट ऑफर आणली आहे. एसबीआय या कारच्या खरेदीसाठी स्वस्त कर्ज पुरवत आहे.

KIA SBI YONO offer : तुम्हीही KIA कारच्या प्रेमात आहात? एसबीआयची भन्नाट ऑफर जरुर पाहा!
KIA seltos
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Jul 31, 2021 | 12:51 PM

KIA SBI YONO offer : जर तुम्ही नवी कोरी किया (KIA) कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) भन्नाट ऑफर आणली आहे. एसबीआय या कारच्या खरेदीसाठी स्वस्त कर्ज पुरवत आहे. त्यासाठी SBI YONO द्वारे तुम्हाला कार बुकिंग करावं लागणार आहे. जर याद्वारे कार बुकिंग केली तर कारची डिलिव्हरीही प्रायोरिटीने मिळेल. इतकंच नाही तर कार लोनच्या व्याजावर 0.25 टक्के सूट मिळणार आहे. SBI ने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.

बुकिंग कसं करायचं?

KIA car बुकिंग करण्यासाठी तुम्हाला SBI YONO अॅप लॉग इन करावं लागेल. त्यानंतर शॉप अँड ऑर्डरवर क्लिक रा. तिथे ऑटोमोबाईल सेक्शन दिसेल, तिथे किया कारच्या पर्यायावर क्लिक करा. त्याशिवया YONO अॅपद्वारेच SBI car loan साठी अप्लाय करा. तुम्हाला व्याज दरातील सुटीसह अन्य फायदेही मिळतील.

YONO वर बुकिंग केल्यामुळे कारची डिलिव्हरीही प्राधान्याने केली जाईल. यामध्ये काही नियम आणि अटी बँकेने घातल्या आहेत. त्यामुळे कार बुकिंग करताना त्याकडे आवश्य लक्ष द्या.

एसबीआयने ट्विट करताना, बँक ही कारच्या विक्री, क्वालिटी, फीचर्स किंवा त्यासंबंधीच्या बाबींसाठी कंपनीच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

SBI मधून किती कर्ज मिळेल?

स्टेट बँकेच्या कार लोनसाठी 21 ते 67 वर्षातील व्यक्ती अर्ज करु शकतात. हे कर्ज 7 वर्षांच्या मुदतीसाठी दिलं जाईल. कारच्या ऑन रोड किमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकतं. ऑन रोड किमतीत विमा आणि रजिस्ट्रेशनचाही समावेश आहे.

SBI car loan व्याज दर

स्टेट बँकेच्या वेबसाईटनुसार, कार लोनवरील व्याज दर 7.75 टक्के वार्षिकपासून सुरु आहेत. यामध्ये एक वर्षाचा MCLR ही अॅड असतो. जर तुम्ही कार लोनसाठी SBI कडे अर्ज केल्यास, तुम्हाला 7.75 ते 8.45 दरम्यान व्याजाने कर्ज मिळू शकेल. व्याजांचा हा दर ग्राहकांच्या सिव्हिल स्कोरवरही अवलंबून आहे. SBI चं सामान्य कारलोनवरील व्याजदर 9.52 टक्के इतका आहे. मात्र किया कारसाठी योनो अॅपद्वारे बुकिंग आणि लोनसाठी अप्लाय केल्यानंतर 0.25 टक्के सूट व्याजदरात मिळणार आहे.

(टीप : अधिक आणि अपडेट माहितीसाठी बँक किंवा कार कंपनीला भेट द्या)

संबंधित बातम्या  

अवघ्या 18 मिनिटात 80% चार्ज, सिंगल चार्जमध्ये 510 KM रेंज, Kia च्या इलेक्ट्रिक कारसाठी ग्राहकांचा रांगा

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा जलवा, लाँचिंगपूर्वीच 7000 गाड्यांची विक्री

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें