देशात सेकेंड हँड दुचाकींच्या मागणीत मोठी वाढ, ऑटोमोबाईल मार्केट 90 टक्के ट्रॅकवर : CredR

भारतातला मोठा टू-व्हीलर ब्रॅण्ड क्रेडआरला (CredR) वापरलेल्या दुचाकींसाठी (Used Bikes) मागणीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. जवळपास 80 ते 90 टक्‍के विक्री व महसूल कोव्हिड आधीच्या पातळ्यांवर परतला आहे.

देशात सेकेंड हँड दुचाकींच्या मागणीत मोठी वाढ, ऑटोमोबाईल मार्केट 90 टक्के ट्रॅकवर : CredR
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 4:00 PM

मुंबई : भारतातला मोठा टू-व्हीलर ब्रॅण्ड क्रेडआरला (CredR) वापरलेल्या दुचाकींसाठी (Used Bikes) मागणीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. जवळपास 80 ते 90 टक्‍के विक्री व महसूल कोव्हिड आधीच्या पातळ्यांवर परतला आहे. प्रवासी सुरक्षित व किफायतशीर प्रवास पर्यायांना प्राधान्य देत असलेल्या काळामध्ये कंपनी एण्ट्री-लेव्हल (Entry Level Bikes) व मध्यम किंमती असलेल्या यूज्ड दुचाकी विभागांमधील मागणीची पूर्तता करण्याच्या उद्देशाने त्यांच्या सर्व शोरूम्समध्ये इन्वेन्टरी निर्माण करण्याकरिता त्यांची पुरवठा साखळी झपाट्याने वाढवत आहे.

क्रेडआरला लॉकडाऊन कालावधीपासून मागणीमध्ये प्रचंड वाढ होताना निदर्शनास आली आणि सणासुदीच्या काळात देखील हा ट्रेण्ड सुरू राहिल्याचे दिसून आले. सार्वजनिक परिवहनावर निर्बंध लादण्यात आल्यामुळे लोकांनी खासगी गतीशीलतेचा अवलंब केला आहे. लसीकरणामध्ये वाढ होण्यासोबत स्थिती सुरळीत होत असताना देखील लोकांमध्ये अजूनही गर्दीच्या ठिकाणी जाण्याबाबत संदिग्धता आहे. तसेच नुकतेच पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे कार्सऐवजी हाय मायलेज दुचाकींकडे कल वाढला आहे.

क्रेडआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ससीधर नंदिगम म्हणाले, “पूर्व-मालकीच्या किंवा सेकंड-हॅण्ड बाइक्स खरेदी करणाऱ्या लोकांच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. मागील एक वर्षामध्ये अनेक लोकांनी नोकऱ्या गमावल्या असल्यामुळे अशा बाइक्स बहुतांश भारतीयांसाठी प्राप्‍त करण्याजोग्या व किफायतशीर आहेत. यामुळे चारचाकींच्या विक्रीमध्ये घट होऊन बाइक्ससारख्या दुचाकींसाठी मागणीमध्ये अधिक वाढ झाली आहे. लोक त्यांच्या गरजांनुसार निवड करण्यासाठी उपलब्ध असलेल्या बाइक्सच्या व्यापक श्रेणीमुळे क्रेडआर सारख्या ऑनलाइन ब्रॅण्ड्स व लिस्टिंग व्यासपीठांकडे वळत आहेत. त्यांना सोयीसुविधा व दर्जासाठी थोडेच प्रिमिअम भरणे देखील सोईस्कर जात आहे.”

क्रेडआर कंपनी बाइकची विक्री करण्यापूर्वी 120 हून अधिक निरीक्षण व दर्जा तपासणी करते. व्यासपीठ युजर्सचे बजेट, शहर व चाललेल्या अंतरानुसार निवड करण्यासाठी बाइक्स व स्कूटर्सची व्यापक श्रेणी देते. यापेक्षाही अधिक सुविधा म्हणजे क्रेडआर बाइक खरेदी करण्याची इच्छा असलेल्यांना 6 महिन्यांची वॉरंटी व 7-डे बाय प्रोटेक्शन देखील देते.

इतर बातम्या

शानदार ऑफर! 4.30 लाखांची Datsun कार 2.75 लाखात खरेदीची संधी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक त्रस्त, Tata Motors उद्या दोन नवीन CNG कार लाँच करणार

धमाकेदार ऑफर! Maruti Alto अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, कार आवडली नाही तर पैसे परत

(second-hand bikes Demand increased in India : CredR)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.