AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्कोडाने लोकप्रिय गाडी बंद करण्याचा घेतला निर्णय! कंपनीने वेबसाईटवरून हटवलं कारण…

Skoda Superb 2023: स्कोडा कंपनीच्या गाड्यांचे भारतात अनेक चाहते आहेत. या कंपनीच्या गाड्यांची नावं लोकांना तोंडपाठ आहेत. रस्त्यावरून जाताना दिसली की लगेच नाव तोंडावर येतं. पण आता या कंपनीची लोकप्रिय गाडी बंद झाली आहे.

स्कोडाने लोकप्रिय गाडी बंद करण्याचा घेतला निर्णय! कंपनीने वेबसाईटवरून हटवलं कारण...
स्कोडाची लोकप्रिय गाडी यापुढे मिळणार नाही, कंपनीने प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला कारण की...Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Jun 06, 2023 | 3:08 PM
Share

मुंबई : भारतीय बाजारात स्कोडा कंपनीने आपले पाय घट्ट रोवले आहेत. ग्राहकांची गरज ओळखून कंपनीने एकापेक्षा एक सरस गाड्या भारतात लाँच केल्या आहेत. पण यापुढे कंपनीची गाडी रस्त्यावर धावताना क्वचितच दिसणार आहे. कारण कंपनीने लोकप्रिय स्कोडा सुपर्ब कारची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. देशात या गाडीचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. पण यापुढे ही सेडाना कार मिळणार नाही. इतकंच काय तर कंपनीने या गाडीचं नाव अधिकृत वेबसाईटवरून हटवलं आहे. त्यामुळे या गाडी विक्री बंद केल्याचं सांगण्यात येत आहे. स्कोडा सुपर्ब ही एक लग्झरी सेडान कार असून अल्पावधीतच या गाडीने लोकप्रियता मिळवली होती.

युरोपियन कार कंपनी स्कोडाने सुपर्ब गाडीचं नाव अधिकृत वेबसाईटवरून हटवलं आहे. याचा अर्थ या गाडीचं प्रोडक्शन बंद केल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे, भारतात नवा एमिशन नियम लागू केला आहे. त्यामुळे काही गाड्यांवर रियल ड्रायव्हिंग एमिशन आणि बीएस6 फेस 2 नियमामुळे फरक पडला आहे. नव्या नियमामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे आणि त्यामुळे सेडान कारची विक्री बंद केल्याचं बोललं जातं आहे.

काही रिपोर्टनुसार, कंपनी ही गाडी बाजारात नव्याने सादर करण्याची शक्यता आहे. जर ही बातमी खरी असेल तर सुपर्ब गाडी अपडेटेड डिझाईन आणि फीचर्ससह लाँच केली जाऊ शकते. त्याचबरोबर नवी सुपर्ब गाडी नव्या एमिशन नियमांनुसार तयार केली जाऊ शकते.

सुपर्ब गाडी 2004 मध्ये फ्लॅगशिप सेडानसह सादर केली होती. या गाडीला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला होता. सेडान चाहत्यांना आणखी एक पर्याय मिळाला होता. कंपनीने वेळोवेळी या गाडीमध्ये अपडेट्स केले होते. या गाडीच्या इंटिरियर आणि ओव्हरऑल डिझाईनमध्ये टॉप क्वॉलिटी मटेरियल आणि अडव्हानस टेक्नोलॉजीसह अपग्रेड केलं आहे.

स्कोडा सुपर्ब ही गाडी स्पोर्टलाईन आणि एलएंडके या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध होती. या दोन्ही व्हेरियंटमध्ये 2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन पॉवर होती. पॉवर ट्रान्समिशनसाठी 7 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सुविधा होती. कारमध्ये स्मार्ट लिंक, अॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटोसह 8 इंचाचा टचस्क्रिन इंफोटेनमेंट सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ यासारखे फीचर्स आहेत.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.