AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात, एकदा चार्ज केल्यावर 8 तास काम करणार

भारत सरकार येत्या 15 दिवसांत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः याबाबत घोषणा केली आहे.

भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात, एकदा चार्ज केल्यावर 8 तास काम करणार
| Updated on: Feb 20, 2021 | 4:02 PM
Share

मुंबई : भारत सरकार येत्या 15 दिवसांत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच करणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः याबाबत घोषणा केली आहे. अद्याप या ट्रॅक्टरच्या फीचर्सबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या ट्रॅक्टरमध्ये बॅटरीचा वापर केला जाणार असून हा ट्रॅक्टर इलेक्ट्रिक असेल. (Sonalika tiger first electric tractor of India which gives 25kmph top speed and 8 hours working capacity)

दरम्यान, हा देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर नाही. कारण वाहन उत्पादक कंपनी सोनालिकाने यापूर्वीच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच केला आहे. कंपनीने गेल्या वर्षी ‘Tiger Electric’ नावाने इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच केला आहे. हा ट्रॅक्टर युरोपात डिझाईन करण्यात आला आहे आणि पूर्णपणे भारतात तयार केला आहे. या ट्रॅक्टरचं प्रोडक्शन भारतात सुरु आहे.

Sonalika Tiger चे फीचर्स

सोनालिका टायगर इलेक्ट्रिकमध्ये कंपनीने IP67 मानांकन असलेली 25.5 kW क्षमता असलेल्या नॅचुरल कुलिंग कॉम्पॅक्ट बॅटरीचा वापर केला आहे. या ट्रॅक्टरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो डिझेल ट्रॅक्टरच्या खर्चापेक्षा केवळ एक चतुर्थांश खर्च या ट्रॅक्टरवर होतो. त्यामुळे हा ट्रॅक्टर वापरणाऱ्याची खूप बचत होईल. कंपनीने म्हटलं आहे की, तुमच्या घरातील रेग्युलर सॉकेटद्वारे या ट्रॅक्टरची बँटरी चार्ज करता येईल. विशेष म्हणजे केवळ 10 तासात या ट्रॅक्टरची बॅटरी पूर्ण चार्ज होईल.

दरम्यान, कंपनीने फास्ट चार्जिंग सिस्टिमही ऑफर केली आहे. ज्यामध्ये तुम्ही अवघ्या 4 तासात या ट्रॅक्टरची बॅटरी फुल चार्ज करु शकता. हा ट्रॅक्टर 2 टन वजनाच्या ट्रॉलीसोबत 24.9 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावू शकतो. एकादा फुल्ल चार्ज केल्यावर हा ट्रॅक्टर तब्बल 8 तास काम करतो. सोनालिका ट्रान्समिशनने सुसज्ज असल्याने हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूपच सोयीस्कर ठरू शकतो. कारण या ट्रॅक्टरमधून कोणत्याही प्रकारची उष्णता बाहेर पडत नाही.

इतर बातम्या

Seltos, Creta ला जोरदार टक्कर, MG ची नवी SUV लाँच होणार

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

Nissan Magnite की Renault Kiger कोणती कार आहे अधिक दमदार?

Skoda च्या नव्या कारची पहिली झलक सादर, मेड इन इंडिया SUV 18 मार्चला बाजारात

(Sonalika tiger first electric tractor of India which gives 25kmph top speed and 8 hours working capacity)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.