भारतीयांच्या मनात विशेष स्थान, Ford च्या ‘या’ टॉप 5 गाड्या लोक विसरु शकणार नाहीत

फोर्ड (Ford) कार कंपनीनं नुकताच आपल्या देशातून गाशा गुंडाळला आहे. याआधी GM म्हणजेच जनरल मोटर्स निघून गेली नंतर हार्ले डेव्हिडसन आणि आता फोर्डनेही भारतातून काढता पाय घेतलाय.

भारतीयांच्या मनात विशेष स्थान, Ford च्या 'या' टॉप 5 गाड्या लोक विसरु शकणार नाहीत
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 8:05 PM

मुंबई : फोर्ड (Ford) कार कंपनीनं नुकताच आपल्या देशातून गाशा गुंडाळला आहे. याआधी GM म्हणजेच जनरल मोटर्स निघून गेली नंतर हार्ले डेव्हिडसन आणि आता फोर्डनेही भारतातून काढता पाय घेतलाय. गेल्या बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत FORD कंपनीच्या वाहनांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच फोर्ड कंपनीने भारतामधील आपले दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला. (These are Ford’s top 5 most popular cars in India)

बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत फोर्डची कोणतीही नवीन गाडी आली नव्हती. त्यामुळे कंपनी भारतातील व्यवसाय गुंडाळण्याच्या विचारात होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. चेन्नई आणि गुजरातच्या साणंद येथे फोर्ड कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. याठिकाणी इकोस्पोर्ट, फिगो आणि एस्पायर या गाड्यांची निर्मिती केली जाते. या प्रकल्पांमध्ये फोर्डने तब्बल 2.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. व्यवसाय पुर्नरचना योजनेंतर्गत भारतात कंपनीकडून फक्त आयात केलेली वाहने विकली जाणार आहेत. सुमारे 4000 भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे.

फोर्ड कंपनी भारतात चांगलं मार्केट तयार करण्यात जरी अपयशी ठरली असली तरी या कंपनीच्या काही गाड्यांना देशात बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली होती. आज आम्ही तुम्हाला फोर्डच्या भारतातील पाच लोकप्रिय उत्पादनांबाबत माहिती देणार आहोत.

फोर्डच्या भारतातील लोकप्रिय गाड्या

  • Ford Ikon : फोर्ड आयकॉन/इकॉन ही 1999 मध्ये फोर्डने विकसित केलेली सबकॉम्पॅक्ट कार आहे. सुरुवातीला फोर्ड फिएस्टा हॅचबॅकचे सेडान व्हेरिएंट म्हणून सादर केले होते. फोर्ड आयकॉन ही 5 सीटर सेडान आहे, या कारची किंमती 4.97 – 5.59 लाख रुपये इतकी होती. फोर्ड आयकॉनचे उत्पादन आता थांबवले आहे.
  • Ford EcoSport : फोर्डच्या भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक असलेली सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही इकोस्पोर्ट 2013 मध्ये लाँच करण्यात आली. फोर्ड इकोस्पोर्टची किंमत 8.19 लाख ते 11.69 लाख रुपयांदरम्यान आहे. फोर्ड इकोस्पोर्ट 11 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
  • Ford Endeavour : फोर्ड कंपनीची Endeavour ही कार लोकप्रिय एसयूव्ही आहे जी टोयोटा फॉर्च्युनरसारख्या मोठ्या एसयूव्हींच्या सेगमेंटमध्ये असूनही बरीच लोकप्रिय आहे. 2003 मध्ये बाजारात दाखल झालेल्या मोठ्या एसयूव्हीपैकी एक एन्डेव्हर होती. फोर्ड एन्डेव्हरची किंमत 39.06 लाखांपासून सुरू होते आणि 41.84 लाख रुपयांपर्यंत जाते.
  • Ford Figo : भारतातील फोर्ड फिगोचे सध्याचे व्हेरिएंट शेवटचे 2019 मध्ये अपडेट केले गेले. फोर्ड फिगोची किंमत 6.63 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 9.56 लाख रुपयांपर्यंत जाते.
  • Ford Fiesta : फोर्डची 5 सीटर फिएस्टा (Fiesta) आता बंद करण्यात आली आहे. फोर्ड फिएस्टाची किंमत 8.63 लाख ते 10.31 लाख रुपयांदरम्यान होती. Fiesta ने Honda City, Maruti Suzuki Ciaz, Honda Jazz, Hyundai i20 सारख्या गाड्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता.

इतर बातम्या

जिच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लॉबिंग केलं होतं, त्या ‘फोर्ड’नं देशातून गाशा का गुंडाळला? वाचा सविस्तर

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

(These are Ford’s top 5 most popular cars in India)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.