टोयोटाने रिकॉल केल्या 2700 इलेक्ट्रिक कार… काय आहे कारण?

कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे, कारचे व्हील्समध्ये समस्या नेमकी काय अडचणी आहेत, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. कंपनी या अडचणींबाबत तपास करीत आहे. परंतु लवकरच यावर तोडगा निघेल असा विश्‍वास कंपनीला आहे.

टोयोटाने रिकॉल केल्या 2700 इलेक्ट्रिक कार... काय आहे कारण?
Automatic Car
Image Credit source: TV9
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 25, 2022 | 1:46 PM

टोयोटाने (Toyota) आपल्या 2700 इलेक्ट्रिक कार्सना (Electric cars) रिकॉल केले आहे. या कार्सच्या व्हील्समध्ये सातत्याने येत असलेल्या अडचणींना लक्षात घेउन कंपनीने हा मोठा निर्णय घेतल्याचे समजते. टोयोटाच्या bZ4X या इलेक्ट्रिक एसयुव्हीला जपानमध्ये लाँच होउन अद्याप दोन महिनेदेखील झाले नसल्याची माहिती आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कार रिकॉल (Recalled) करण्याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींनी स्वत: सूचना दिलेल्या आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा कारणांमुळे युएस, युरोप, कनडा आणि जपानमध्ये विकण्यात आलेल्या सर्व टोयोटा इलेक्ट्रिक कार्सला रिकॉल करण्यात येत असून त्यानंतर व्हील्समधील सर्व अडचणी दूर करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या सर्व कार्स पुन्हा तपासून त्यात नेमक्या काय चुका झाल्यात, याची माहितीही कंपनीकडून घेण्यात येणार आहे.

मोठी दुर्घटना होण्याचा धोका

टोयोटा कंपनीच्या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, कंपनीने इलेक्ट्रिक कार रिकॉल करण्याचा निर्णय यासाठी घेतला कारण, ड्रायव्हिंग करीत असताना व्हील जर वेगळे झाले तर, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत या समस्येचे समाधान होत नाही. तोपर्यंत अशा कार्सची कोणीही ड्रायव्हिंग करु नये, असेही सांगण्यात आले आहे.

कंपनीकडून तपास सुरु

कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे, कारचे व्हील्समध्ये समस्या नेमकी काय अडचणी आहेत, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. कंपनी या अडचणींबाबत तपास करीत आहे. परंतु लवकरच यावर तोडगा निघेल असा विश्‍वास कंपनीला आहे. दरम्यान, जपानी कार मन्यूफक्चरिंग कंपनी Subaru नेदेखील याबाबत अधिक खुलासा केला असून कंपनीदेखील आपली इलेक्ट्रिक कार Solterra च्या 2600  युनिट्‌सला रिकॉल करत असल्याची माहिती आहे. या कंपनीच्या कार्सच्या व्हील्समध्येही अडचणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

इलेक्ट्रिक मार्केट सेगमेंटमध्ये टोयोटा पिछाडीवर

इलेक्ट्रिक व्हीकल मार्केटमध्ये टोयोटाला येण्यास बराच उशिर झालेला आहे. टोयोटाची प्रतिस्पर्धी टेस्लाने 14 वर्षांपूर्वीच आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच केली होती. तर टोयोटाने जपानमध्ये मागील महिन्यात इलेक्ट्रिक कार bZ4X लाँच केली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें