Toyota Sales Report | टोयोटा किर्लोस्करचा धडाका, वाहनांच्या विक्रीत 92 टक्क्यांची वाढ

टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor) कंपनीने यावर्षीच्या पहिल्या महिन्याचा सेल रिपोर्ट जारी केला आहे.((Toyota Kirloskar Motor january sale Report)

Toyota Sales Report | टोयोटा किर्लोस्करचा धडाका, वाहनांच्या विक्रीत 92 टक्क्यांची वाढ
Toyota fortuner

मुंबई : टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor) कंपनीने यावर्षीच्या पहिल्या महिन्याचा सेल रिपोर्ट जारी केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार टोयोटाने जानेवारी 2021 मध्ये भारतीय मार्केटमध्ये 11,126 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) कंपनीने देशांतर्गत मार्केटमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या जानेवारी महिन्यात 92 टक्के अधिक विक्री केली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात कंपनीने 5,804 वाहनांची विक्री केली होती. (Toyota Kirloskar Motor Reports 92 Percent Increase in Domestic Sales at 11,126 Units in January 2021)

टीकेएम कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवीन सोनी यांनी रविवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “नवीन वर्ष आमच्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाने सुरू झाले आहे आणि आमच्या वाहनांची जोरदार विक्री सुरु आहे. आमच्या उत्पादनांची घाऊक विक्री खूपच उत्साह वाढवणारी आहे आणि बुकिंगच्या ऑर्डरमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. कंपनीने यंदा नवीन फॉर्च्युनर आणि लीजेंडर सादर केली आहे. या दोन्ही मॉडेल्सना जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सादर करण्यात आलेल्या नवीन इनोव्हा क्रिस्टलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मारुतीच्या सेलमध्ये 4.3 टक्क्यांची वाढ

दरम्यान, मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि टाटासह (Tata) अनेक कंपन्यांनी जानेवारीमध्ये झालेल्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प काल (1 फब्रुवारी) सादर केला. दरम्यान, मारुतीने (Maruti) त्यांच्या देशांतर्गत विक्रीत 4.3 टक्के वाढ झाल्याची माहिती जाहीर केली आहे.

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी 2020 मध्ये 1 लाख 54 हजार 123 वाहनांची विक्री केली होती. त्यामध्ये यंदा 4.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मारुतीने यंदा जानेवारी महिन्यात 1 लाघ 60 हजार 752 वाहनांची विक्री केली आहे. मारुतीच्या प्रवासी व्हेईकल्सची विक्री 6.9 टक्क्यांनी घसरून 103,435 वाहनांवर आली आहे. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत 0.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर निर्यातीत 29.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महिंद्रा अँड महिंद्राच्या विक्रीत घट

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जानेवारी 2021 मध्ये एकूण 39,148 वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात कंपनीने केलेल्या विक्रीच्या तुलनेत ही सुमारे 25.4 टक्के घट आहे. दरम्यान महिंद्राच्या एकूण प्रवासी वाहनांची विक्री 4 टक्क्यांनी वाढून 20 हजार 634 मोटारींवर आली आहे. तर शेतीच्या उपकरणांची विक्रीदेखील वाढली आहे. शेतीच्या उपकरणांच्या विक्रीत 50 टक्क्यांची वाढ होऊन यंदा जानेवारीत महिंद्राने 34,778 उपकरणांची विक्री केली आहे.

टाटाच्या विक्रीत 28 टक्क्यांनी वाढ

टाटा कंपनीने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 45 हजार 252 युनिट्स वाहनांची विक्री केली होती. त्यामध्ये यंदा 28 टक्क्यांची वाढ झाली आहे. टाटाने यंदा जानेवारी महिन्यात 57 हजार 742 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. टाटाच्या कार्सची विक्री दुपटीने वाढली आहे. जानेवारीमध्ये टाटाच्या 26 हजार 978 कार्सची विक्री झाली आहे. मात्र टाटाच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 15 टक्क्यांची घट झाली आहे.

ह्युंदायच्या विक्रीतही वाढ

ह्युंदाय इंडियाने देशांतर्गत मार्केटमध्ये यंदा जानेवारी महिन्यात 52 हजार 5 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. तर 8 हजार 100 वाहनांची निर्यात केली आहे. म्हणजेच ह्युंदाय इंडियाने 60105 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. ह्युंदाय इंडियाच्या एकूण विक्रीत 15.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. ह्युंदाच्या देशांतर्गत विक्रीत 23.8 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर निर्यातीत मात्र 19 टक्क्यांची घट झाली आहे.

वॉल्वो आयशर

वॉल्वो आयशरची जानेवारीमध्ये एकूण विक्री 2.3 टक्क्यांनी वाढून 5 हजार 673 युनिट्स राहिली. देशांतर्गत वाहन विक्रीतही 1.9 टक्क्यांनी वाढ होऊन 4 हजार 871 वाहनांची विक्री झाली. तर वॉल्वोच्या वाहनाच्या निर्यातमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा

स्क्रॅपेज पोलिसी लागू झाल्यानंतर 20 वर्ष जुन्या कार भंगारात जाणार? जाणून घ्या तुमच्याकडील पर्याय

15 वर्षांहून जुनी वाहनं 1 एप्रिलपासून थेट भंगारात; नितीन गडकरींची महत्त्वाच्या धोरणाला मंजुरी

वाहन स्क्रॅपेज धोरण लागू झाल्यावर 50000 हजार नोकऱ्या मिळणार; एक कोटी गाड्या रिजेक्ट होणार

Citroen C5 एयरक्रॉस लाँचिंगसाठी सज्ज, फिचर्सच्या बाबतीत बड्या कंपनीच्या SUVs ना मागे टाकणार?

(Toyota Kirloskar Motor Reports 92 Percent Increase in Domestic Sales at 11,126 Units in January 2021)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI