TVS Jupiter च्या किंमतीत 2336 रुपयांची वाढ, Apache मॉडेलही महागलं

टीव्हीएस मोटर (TVS Motor) कंपनीने ज्युपिटर 110 स्कूटरच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती वाढवल्या आहेत. टीव्हीएस ज्युपिटरच्या स्टँडर्ड व्हेरिएंटच्या किंमतीत 736 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

TVS Jupiter च्या किंमतीत 2336 रुपयांची वाढ, Apache मॉडेलही महागलं
TVS Jupiter

मुंबई : टीव्हीएस मोटर (TVS Motor) कंपनीने ज्युपिटर 110 स्कूटरच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती वाढवल्या आहेत. टीव्हीएस ज्युपिटरच्या स्टँडर्ड व्हेरिएंटच्या किंमतीत 736 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर टॉप-स्पेसिफिक झेडएक्स ट्रिमच्या किंमतीत 2336 रुपयांची वाढ केली आहे. अपडेटेट ज्युपिटर रेंज आता शीट मेटल व्हाईट व्हेरिएंटची किंमत आता 65,673 रुपयांपासून सुरू होते, तर ZX डिस्क ट्रिमची किंमत 75,773 रुपयांपर्यंत वाढली आहे. या सर्व किमती दिल्लीच्या एक्स-शोरूमनुसार आहेत. TVS च्या Apache मॉडेलच्या किंमतीत झालेली ही पहिलीच वाढ आहे. (TVS Jupiter price increase by up to Rs 2336, Apache model prices also hikes)

टीव्हीएस ज्युपिटर (TVS Jupiter) भारतात होंडा अॅक्टिव्हा 6G नंतरची दुसरी सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर आहे. मॉडेल कम्फर्ट, परफॉर्मन्स आणि प्रॅक्टिकलिटीचं योग्य संतुलन असल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीला दिवाळीत या स्कूटरचा सेल वाढवायचा आहे. त्यामुळे कंपनीने यामध्ये काही फिचर्स वाढवले आहेत. ज्यामध्ये युएसबी चार्जर, फ्रंट स्टोरेज स्पेस आणि Tinted visor सारखे फिचर्स वाढवण्यात आले आहेत.

टीव्हीएस जुपिटरमध्ये काय आहे खास

टीव्हीएस जुपिटर फ्यूल इंजेक्शन 109.7 सीसी, एअर-कूल इंजिनसह सुसज्ज आहे. जे 7.37 बीएचपी पॉवर आणि 8.4 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. मोटर सीव्हीटी गियरबॉक्ससोबत जोडली गेली आहे. स्कूटरच्या फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रियरमध्ये सिंगल शॉक आहे. ब्रेकिंग परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ड्रम ब्रेक आणि एक ऑप्शनल फ्रंट डिस्कसह येते. यामध्ये 12 इंचांचे व्हील देण्यात आले आहेत. टीव्हीएस ज्युपिटरचं वजन 107 किलोग्रॅम इतकं आहे.

ज्युपिटर क्लासिकमध्ये 110cc चं इंजिन आहे. बीएस 4 व्हर्जनमध्ये हे इंजिन 7.9 bhp इतकी पॉवर आणि 8.4 Nm पिक टॉर्क जनरेट करतं. ज्युपिटर क्लासिक ईटी-एफआय स्कूटर अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये सनलाईट आयव्हरी, ऑटम ब्राऊन आणि न्यू इंडिब्लू शेडचा समावेश आहे.

TVS Apache च्या किंमतीत वाढ

टीव्हीएस मोटर कंपनीने त्यांच्या दोन नेकेड स्ट्रीटफायटर्स अपाचे आरटीआर 200 4 व्ही (Apache RTR 200 4V) आणि अपाचे आरटीआर 160 4 व्ही (Apache RTR 160 4V) ची किंमत वाढवली आहे. या दोन्ही गाड्यांच्या किंमतीत कंपनीकडून तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. अपाचे आरटीआर 160 4 व्ही ची किंमत 3000 रुपयांनी वाढवली आहे. तर या बाईकच्या डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत आता 1,14,615 रुपये इतकी आहे. तर ड्रम ब्रेक ट्रिम 1,11,565 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर Apache RTR 200 4V 3,750 रुपयांनी महागली आहे. दुसरीकडे 200cc स्ट्रीट नेकेड आता 1,33,065 रुपये या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल.

इतर बातम्या

जीप 2023 मध्ये आणणार आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या यात काय असेल खास

‘ही’ आहे भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार; फिचर्स, लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये; लॉन्चपूर्वीच झाला हा मोठा खुलासा

(TVS Jupiter price increase by up to Rs 2336, Apache model prices also hikes)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI