KTM RC200 आणि RC390 च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, बाईकसाठी बुकिंग सुरु

KTM कंपनी न्यू जनरेशन RC200 आणि RC390 स्पोर्ट्स बाईक्स लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. (KTM RC200 and RC390 Unofficial bookings started)

KTM RC200 आणि RC390 च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, बाईकसाठी बुकिंग सुरु
ktm

मुंबई : KTM कंपनी न्यू जनरेशन RC200 आणि RC390 स्पोर्ट्स बाईक्स लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही फेयर्ड मॉडल्स यापूर्वी अनेक वेळा टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाले आहेत आणि येत्या काही आठवड्यात या दोन्ही बाईक्स भारतात लॉन्च केल्या जातील. काही निवडक केटीएम डिलरशिपने 2,000 रुपये ते 5000 रुपयांदरम्यानच्या टोकन रकमेसह दोन्ही बाईकचे बुकिंग सुरू केले आहे. काही डीलर्सनी असं सांगितलं आहे की, या दोन्ही बाईक्स जुलै 2021 पर्यंत लॉन्च होतील. (Unofficial bookings started for new Generation KTM RC200 and RC390)

नेक्स्ट जनरेशन RC390 अखेर नवीन टीएफटी डिस्प्ले स्क्रीनसह अपडेट केली जाईल, हे अपडेट सध्याच्या 390 ड्यूकमध्ये पाहायला मिळते. तसेच, अन्य प्रमुख अपडेट्समध्ये क्विकसिफ्टरचा समावेश असू शकतो. दुसरीकडे, नवीन RC200 अपडेटेड ग्राफिक्ससह पूर्णपणे डिजिटल एलसीडी युनिटची सुविधा मिळेल. बाहेरील बाजूला दोन्ही बाईक्स नवीन सिंगल पॉड हेडलॅम्प्ससह डिझाइन केल्या जातील.

डिझाईन आणि इंजिन

न्यू-जनरेशन आरसी 390 ची एक्सटीरियर पेंट स्कीम नुकतीच ऑनलाइन लीक झाली होती. या बाईकच्या मेकॅनिकल अँगलबाबत बोलायचे झाल्यास, दोन्ही बाईक्समध्ये समान प्रकारचे फीचर्स दिले जाऊ शकतात. RC390 मध्ये 373.2cc सिंगल सिलिंडर इंजिन दिले जाईल. ही बाईक लिक्विड कूल्ड फ्यूल इंजेक्टेड इंजिन आणि 6 स्पीड गिअरबॉक्ससह सादर केली जाणार आहे.

बाईकच्या किंमती

RC200 मध्ये 199.5 सीसीचे एअर कूल्ड इंजिन आणि 6 स्पीड गिअरबॉक्स मिळेल. दोन्ही मोटारसायकल बीएस 6 च्या कंप्लायंटसह येणार आहेत. RC390 ची किंमत जास्त असू शकते. तर RC200 ची किंमत सध्याच्या 2.10 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते.

केटीएम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळ्या मोटारसायकलींची रचना करत असते. केटीएम बाईक्स हाय स्पीड, स्टाईलिश डिझाईन आणि लाइटवेटसाठी ओळखल्या जातात.

इतर बातम्या

सिंगल चार्जमध्ये 240Km रेंज,’या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्ससमोर अनेक मोठ्या बाईक फेल

‘या’ इलेक्ट्रिक सायकलसमोर ऑटो फेल, एकदा चार्ज केल्यावर 100 किमी धावणार

सिंगल चार्जमध्ये 483 किमी रेंज, Ford च्या ‘या’ गाडीसाठी ग्राहकांच्या रांगा, एका दिवसात 20,000 बुकिंग्स

(Unofficial bookings commence for new gen KTM RC200 and RC390 bikes)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI