AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अखंड भारत बनवण्याचा प्रयत्नात भारत…’, अर्थसंकल्पात संरक्षणावरील तरतूद पाहून भडकले पाकिस्तानी तज्ज्ञ

Budget 2025: भारत फक्त पाकिस्तान अन् अफगाणिस्तानपर्यंत थांबणार नाही तर समुद्र क्षेत्रात इंडोनेशिया आणि मेलेशियापर्यंत जाणार आहे. भारतीय नैदलाचा क्षमता मोठी आहे, त्या तुलनेत पाकिस्तानी शक्ती खूप कमी आहे, असे पाकिस्तानी तज्ज्ञ सांगत आहेत.

'अखंड भारत बनवण्याचा प्रयत्नात भारत...', अर्थसंकल्पात संरक्षणावरील तरतूद पाहून भडकले पाकिस्तानी तज्ज्ञ
| Updated on: Feb 05, 2025 | 1:05 PM
Share

Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रावर मोठी तरतूद करण्यात आली आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी 6.81 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली गेली आहे. मागील वर्षी ही तरतूद 6.21 लाख कोटी रुपये होती. भारताच्या संरक्षण क्षेत्रावरील तरतुदीमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानी तज्ज्ञांनी भारत संरक्षण क्षेत्रात अधिक मजबूत होत असून पाकिस्तानसाठी हे धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणतात पाकिस्तानी तज्ज्ञ

पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी गुलाम मुस्तफा यांनी भारताने संरक्षण क्षेत्रावर केलेल्या तरतुदीमुळे भीती व्यक्त केली आहे. नवी दिल्लीतील भाजप सरकार अखंड भारत करण्याकडे आपली वाटचाल बनवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताच्या या अखंड भारताच्या स्वप्नात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा भाग असणार आहे, असे मुस्तफा यांनी म्हटले आहे.

भारताच्या तुलनेत पाकिस्तान कमकुवत

मुस्तफा यांनी सांगितले की, भारत फक्त पाकिस्तान अन् अफगाणिस्तानपर्यंत थांबणार नाही तर समुद्र क्षेत्रात इंडोनेशिया आणि मेलेशियापर्यंत जाणार आहे. भारतीय नैदलाचा क्षमता मोठी आहे, त्या तुलनेत पाकिस्तानी शक्ती खूप कमी आहे. नैदल क्षेत्रात भारताची शक्ती चीनप्रमाणे झाली आहे. तसेच सातत्याने भारताच्या शक्तीत वाढ होत आहे.

हिंद महासागरावर नियंत्रण करणार

भारताला दुसऱ्या खंडावर हल्ला करायचा नसेल तर एवढ्या मोठ्या नौदलाची गरज का आहे, असा सवाल गुलाम मुस्तफा केला. यानंतर आणखी एका माजी लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, भारताचे उद्दिष्ट हिंद महासागरावर नियंत्रण प्रस्थापित करणे आणि त्यानंतर आपल्या सैन्य आणि हवाई दलाची ताकद वाढवणे आहे. भारत आपल्या पायदळ आणि हवाईदलाची ताकद वाढवत आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत करताना देशातील मध्यमवर्गीयांना चांगली भेट दिली आहे. अर्थमंत्र्यांनी आयकर मर्यादा वाढवून १२ लाख केली आहे. त्याचा फायदा देशातील कोट्यवधी लोकांना होणार आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.