Union Budget 2023 : मोबाईल, टीव्ही, होणार स्वस्त, सिगारेटसह ‘या’ गोष्टी महागणार

मानसी मांडे,  Tv9 मराठी

|

Updated on: Feb 01, 2023 | 12:51 PM

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पाचवा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्य आणि कोणत्या महागल्या ते जाणून घेऊया.

Union Budget 2023 : मोबाईल, टीव्ही, होणार स्वस्त, सिगारेटसह 'या' गोष्टी महागणार

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitaraman) यांनी त्यांचा पाचवा अर्थसंकल्प सादर केला. हे मोदी सरकार 2.0 मधील पाचवं आणि शेवटचं बजेट (Budget 2023) आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 हे अमृत काळातील पहिलं बजेट असल्याचं सीतारमण यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अनेक वस्तूंवरील कस्टम ड्युटी (custom duty) कमी करण्याची घोषणा केली. त्यामुळे बजेट मध्ये कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आणि कोणत्या महागल्या हे जाणून घेऊया.

या वस्तू झाल्या स्वस्त :

– एलईडी टेलिव्हिजन होणार स्वस्त.

– तसेच बायो गॅसशी संदर्भातील वस्तूंची दरही कमी होतील.

– खेळणी, सायकल स्वस्त

– मोबाईल फोन, टेलिव्हिजन होणार स्वस्त. देशातील मोबाईल फोनच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मोबाईल फोन्सच्या भागांच्या आयातीवरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव.

– बॅटरी वरील आयात शुल्क होणार कमी

– सीमा शुल्क 13 टक्के करण्यात आले.

या वस्तू महागल्या :

– स्वयपाकाच्या गॅसची चिमणी होणार महाग

– सोन्या-चांदीचे दागिने महागणार

– सिगारेट होणार महाग

बजेट 2023 साठी खालील लिंकवर क्लिक करा

अर्थसंकल्प 2023 लाईव्ह टीव्ही

Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा

Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या घोषणा आणि परिणाम

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI