1 रुपया महिना आणि 2 लाखांचा विमा, जाणून घ्या योजना काय?

सरकारने कोणत्याही बँकेत खातेदारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली. या योजनेत तुम्ही वर्षाला फक्त 12 रुपयांच्या प्रीमियमवर 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण घेऊ शकता. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक प्रकारची अपघात विमा पॉलिसी आहे, ज्या अंतर्गत अपघाताच्या वेळी मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याच्या रकमेवर दावा करता येतो.

1 रुपया महिना आणि 2 लाखांचा विमा, जाणून घ्या योजना काय?

नवी दिल्लीः PMSBY: कोरोना महामारी आल्यापासून लोकांना विम्याचे महत्त्व समजण्यास सुरुवात झाली. लोक जीवन, आरोग्य, वैद्यकीय विम्याबद्दल जागरूक होत आहेत. पण कोरोना महामारीमुळे विमा महाग झालाय. असे बरेच लोक आहेत, ज्यांना इच्छा असूनही विमा मिळवता येत नाही. जे लोक पैशाअभावी विम्याचा लाभ घेऊ शकत नाहीत, त्यांना मदत करण्यासाठी सरकार विम्याच्या बाबतीत पुढे आलेय. केंद्र सरकारने अत्यंत कमी प्रीमियमसह विमा योजना सुरू केल्यात, ज्याच्या मदतीने अगदी कमी उत्पन्न असलेली व्यक्तीसुद्धा विमा संरक्षण घेऊ शकते.

सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) चा लाभ घेऊन एक सामान्य माणूस आपल्या कुटुंबाला सुरक्षित हमी देऊ शकतो. येथे आम्ही या दोन योजनांची तपशीलवार चर्चा करीत आहोत.

पीएम सुरक्षा विमा योजना

सरकारने कोणत्याही बँकेत खातेदारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली. या योजनेत तुम्ही वर्षाला फक्त 12 रुपयांच्या प्रीमियमवर 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण घेऊ शकता. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक प्रकारची अपघात विमा पॉलिसी आहे, ज्या अंतर्गत अपघाताच्या वेळी मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याच्या रकमेवर दावा करता येतो.

ही योजना 18 ते 70 वयोगटातील लोकांसाठी आहे, ज्यांचे बँक खाते आहे. या योजनेंतर्गत विमाधारक व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दोन लाख रुपये मिळतील. याशिवाय विमाधारकाच्या अपघातात दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय खराब झाले तर त्याला 2 लाख रुपये मिळतील. आंशिक अपंगत्व असल्यास 1 लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाईल.

पीएम सुरक्षा विमा योजना प्रीमियम

PMSBY साठी खातेदाराला वर्षाला फक्त 12 रुपये भरावे लागतील, जे बँकेकडून थेट खात्यातून कापले जातील.
यासाठी दरवर्षी 1 जूनपूर्वी फॉर्म भरले जातात. ज्या बँकेत तुमचे खाते आहे तेथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म सबमिट केल्यानंतर बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम कापेल.
लक्षात ठेवा की जर तुमच्याकडे दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये दोन बचत खाती असतील आणि दोन्ही खाती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेशी जोडलेली असतील, तर विम्याची रक्कम फक्त एका खात्यावर चालू ठेवली जाईल. इतर खात्याने भरलेल्या प्रीमियमची रक्कम रोखली जाईल.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सामील होण्यासाठी आपण प्रथम आपले आधार कार्ड बँकेशी लिंक करणे आवश्यक आहे. यानंतर दरवर्षी 1 जूनपूर्वी एक फॉर्म भरून बँकेत द्यावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.

1 जून ते 31 मेपर्यंत विमा संरक्षण

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण फक्त 1 जून ते 31 मेपर्यंत उपलब्ध आहे, यासाठी तुमच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. जर बँक खाते बंद झाले किंवा प्रीमियम कापण्याच्या वेळी खात्यात पुरेशी शिल्लक नसेल तर तुमचा विमा देखील रद्द होऊ शकतो.

संबंधित बातम्या

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने घसरले, चांदीदेखील स्वस्त, पटापट तपासा

पैसे कमवण्याची संधी! Oyo 8340 कोटींचा IPO आणतोय, जाणून घ्या तपशील

1 rupee a month and 2 lakh insurance, know what is the plan?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI