7th Pay Commission: दिवाळीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डबल धमाका; बोनससोबत मिळणार 18 महिन्यांची DA थकबाकी?

Govt Employees | इंडियन पेन्शनर्स फोरमने पीएम मोदींना केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनरांना महागाई भत्ता आणि महागाईची थकबाकी देण्याचे आवाहन केले आहे. या संघटनेने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून त्यांना या प्रकरणात मदत करण्यास सांगितले आहे.

7th Pay Commission: दिवाळीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डबल धमाका;  बोनससोबत मिळणार 18 महिन्यांची DA थकबाकी?
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 1:05 PM

नवी दिल्ली: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे. सरकारने दीड वर्षांपासून महागाई भत्ता (डीए) थकबाकी दिली नाही. मात्र, आता येत्या काही दिवसांत हे पैसे मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून लवकरच यासंदर्भात घोषणा होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या गोष्टीत लक्ष घातले आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे 18 महिन्यांपासून थकलेल्या महागाई भत्त्याचे पैसे दिले जाण्याची दाट शक्यता आहे.

इंडियन पेन्शनर्स फोरमने पीएम मोदींना केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनरांना महागाई भत्ता आणि महागाईची थकबाकी देण्याचे आवाहन केले आहे. या संघटनेने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून त्यांना या प्रकरणात मदत करण्यास सांगितले आहे.

1 जुलैपासून महागाई भत्त्याची रक्कम वाढली

मोदी सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्के केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (डीए) आणि महागाई आराम (डीआर) मध्ये 11 टक्के वाढ मंजूर केली होती. ज्यामुळे 48 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा झाला. आता डीएचा नवीन दर 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर गेला आहे.

गेल्यावर्षी कोरोनामुळे एप्रिल महिन्यात अर्थ मंत्रालयाने महागाई भत्त्यात वाढ (डीए) 30 जून 2021 पर्यंत रोखून धरली होती. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत डीए दर 17 टक्के होता.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता

केंद्र सरकारने आदेश जारी करताना म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता आणि डीए वाढवण्यात यावा. नियमांनुसार, HRA वाढविण्यात आलाय, कारण DA 25%पेक्षा जास्त आहे. या कारणास्तव केंद्र सरकारने HRA वाढवून 27% करण्याचा निर्णय घेतला.

हा आदेश जारी करताना सरकारने म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता (HRA) आणि DA मध्ये त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारे वाढ केली जाईल. सध्याचा नियम म्हणतो की, डीएची रक्कम बेसिक सॅलरीच्या 25 टक्क्यांहून अधिक झाल्यास HRA 3% ने वाढतो. 2017 मध्ये हा नियम करण्यात आला. कर्मचाऱ्याचा डीए त्याच्या बेसिक सॅलरीच्या 25% पेक्षा जास्त असेल त्याच्या HRA मध्ये बदल केला जाईल. त्यानुसार अलीकडेच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा एचआरए जाहीर केला होता.

एचआरए आणि वेतन एकत्र देऊन सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुहेरी बोनसचा लाभ देईल किंवा दोन्हीचे पैसे वेगवेगळे मिळतील, याबाबत कोणताही शासकीय निर्णय समोर आलेला नाही. परंतु सणासुदीचा काळ लक्षात घेता सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना या ‘डबल बोनस’चा लाभ देऊ शकते. एचआरएचे पैसे वाढीव दराने मिळाल्याने पगारामध्ये मोठी वाढ होऊ शकते. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या:

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; ऑक्टोबर महिन्यात मिळणार 2,18,200 रुपयांची भेट

दिवाळीपूर्वी मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट, महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ

सरकार एनपीएसमध्ये करणार हा मोठा बदल, कंपनी कायद्यात येऊ शकते पेन्शनचे काम

7th pay commission: निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA आणि ग्रॅच्युटी वाढणार

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.