Donald Trump : भारतासाठी मोठी बातमी, ट्रम्प अखेर झुकले! टॅरिफ वादात घेतला मोठा निर्णय, या स्टॉकमध्ये येणार उसळी
Stock Market : अखेर डोनाल्ड ट्रम्प नरमले. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी याविषयीचे मोठे संकेत दिले. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराला उधाण येणार आहे. या 20 स्टॉकवर जर तुम्ही लक्ष ठेवले तर कदाचित तुमचा मोठा फायदा होऊ शकतो.

Donald Trump visit to India : भारतावर 50 टक्के टॅरिफ आणि दंड लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. तेव्हापासून दोन्ही देशांचे संबंध ताणल्या गेले. भारतावर दबाव टाकण्यासाठी व्हाईट हाऊसने 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली. त्यामुळे भारत-अमेरिकेतील व्यापारी करार अडचणीत सापडला. पण मागील आठवड्यांपासून दोन्ही देशातील संवाद वाढला आणि तणाव कमी झाला. अमेरिकेने भारतात सर्जियो गोर या नवीन राजदूताची नेमणूक केली. संबंध झपाट्याने बदलले. आता तर एक मोठी बातमी समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे नोव्हेंबर 2025 मध्ये भारत भेटीवर येणार असल्याचे संकेत राजदूर गोर यांनी दिले. त्यामुळे शेअर बाजाराला भरते येण्याची दाट शक्यता आहे.
मोदी नोव्हेंबर 2025 मध्ये भारत भेटीवर
सर्जियो गोर यांनी मोठे संकेत दिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नोव्हेंबर 2025 मध्ये भारत दौऱ्यावर येतील असे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या भारत भेटीनंतर अथवा नियोजनाचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते सोमवारी, 15 सप्टेंबर रोजी शेअर बाजाराला भरते येण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन महिन्यात दौऱ्याची रुपरेषा समोर येताच या 20 स्टॉकमध्ये तेजी येईल.सोमवारी बाजार जवळपास 100 ते 120 अंकांनी वधारण्याची शक्यता आहे. NSE, BSE मध्ये तुफान तेजी येण्याची शक्यता पण वर्तवण्यात येत आहे. याशिवाय आयटी, ऑटो, फार्मा, टेक्सटाईल आणि संरक्षण क्षेत्रातील स्टॉक तेजीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या 20 शेअरमध्ये मोठी तेजी
वेल्थचे संचालक अनुज गुप्ता यांच्या मते, ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे ऑटो, आयटी, फार्मा, टेक्सटाईल आणि संरक्षण क्षेत्रातील जवळपास 20 शेअरमध्ये उलाढाल दिसू शकते.
- अरबिंदो फार्मा, सिप्ला आणि ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या शेअरवर ठेवा लक्ष
- बीईएल, एचएएल आणि कोचीन शिपयार्ड हे संरक्षण क्षेत्रातील स्टॉक
- टेकएम, एचसीएल टेक, विप्रो आणि इन्फोसिस हे आयटी शेअर
- ट्रायडेंट, वेलस्पन लिव्हींग हे टेक्सटाईलमधील शेअर
- आयशर मोटर्स,टाटा मोटर्स, टीव्हीएस मोटर, बजाज ऑटो, जेबीएम ऑटो,
- बॉश, अमारा राजा, एक्साईड इंडस्ट्रीज आणि युएनओ मिंडा तेजीत असू शकतात.
डिस्क्लेमर : हे तज्ज्ञांचे मत आहे. गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणुकीपूर्वी शेअर बाजारातील तुमच्या तज्ज्ञाचे मत जरूर घ्या.
