Bank holidays in October 2025 : ओ ताई, दादा, काका.. इकडे लक्ष द्या ! ऑक्टोबरमध्ये इतके दिवस बँका राहणार बंद, तुमच्या शहरात कधी सुट्टी ? वाचा एका क्लिकवर !
Bank holidays in October : ऑक्टोबर महीना उद्यापासूनच सुरू होत असून या महिन्यात अनेक सण-उत्सवही आहेत. गांधी जयंती पासून ते दिवाळीपर्यंत अनेक सणांचा समावेश असून या निमित्त बँकांचे कामकाजही बंद राहणार आहे. संपूर्ण महिन्यात किती आणि कधी सुट्ट्या असतील ते जाणून घेऊया एका क्लिकवर..

सप्टेंबर महिन्याची शेवटची तारीख आज उजाडली असून उद्यापासून या वर्षाचा 10 वा महीना अर्थात ऑक्टोबर सुरू होत आहे. येता ऑक्टोबर महीना सणांनी भरलेला असून त्यात अनेक उत्सव येणार आहे. या महिन्यात गांधी जयंती, दसरा, दिवाळी, छट पूजा यासह अनेक मोठे उत्सव येणार असल्याने सर्वांसाठीच हा महीना अतिशय गडबडीचा, लगबगीचा असेल. वातावरणा सणानिमित्त उत्साह भरलेला दिसेल. पण सण म्हटले की सुट्ट्या आल्याच. सुट्टी कोणाल नको असते ? पण आपल्यासोबतच बँकांनाही या काळात सुट्ट्या असतातच.
ऑक्टोबरमध्ये तर विविध सणांनिमित्त संपूर्ण देशात तर काही सणांसाठी ठराविक राज्यात बँकांना सुट्टी दिलेली असते. या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे केले जाणाऱ्या सणांवरून निश्चित केल्या जातील. जर तुम्हाल ऑक्टोबर महिन्यांत बँकांची काही महत्वाची कामं असतील, बँकेत जायचं असेल तर बँका नेमक्या कधी सुरू आहेत आणि त्यांना कधी सुट्टी आहे ते नीट वाचून घ्या आणि तसं नियोजन करा. बँकांच्या सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक खाली नमूद केलं आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे (RBI) बँक सुट्ट्यांचे अधिकृत कॅलेंडर जारी केलं जातं. या कॅलेंडरनुसार, ऑक्टोबरमध्ये बँका 18 दिवस बंद राहतील. सणांव्यतिरिक्त, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच सर्व रविवारी बँका बंद असतात. या काळातही बँकाचे कामकाज होत नाही.
ऑक्टोबरमधील बँक हॉलिडे
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी – 11 आणि 25 ऑक्टोबर – आणि सर्व रविवारी – 5,12, 19 आणि 26 ऑक्टोबर रोजी सर्व बँका बंद राहतील.
तसेच दसरा, दुर्गा पूजा, गांधी जयंती, लक्ष्मी पूजा, महर्षी वाल्मिकी जयंती/कुमार पौर्णिमा, करवा चौथ आणि दिवाळी यांसारख्या इतर प्रसंगीदेखील बँकाचे कामकाज बंद राहील.
या दिवशी बँका राहणार बंद
1 ऑक्टोबर : केरळ, ओडिशा, त्रिपुरा, कर्नाटक, तामिळनाडू, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, झारखंड आणि मेघालयात, 1 ऑक्टोबर रोजी महानवमी, दसरा, आयुधपूजा, दुर्गा पूजा (दसैन) निमित्त बँका बंद राहतील.
2 ऑक्टोबर: महात्मा गांधी जयंती, दसरा आणि दुर्गा पूजा यानिमित्त संपूर्ण भारतात बँका बंद राहतील.
3 आणि 4 ऑक्टोबर: दुर्गा पूजा (दसैन)निमित्त फक्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.
6 ऑक्टोबर: लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने फक्त त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.
7 ऑक्टोबर: महर्षी वाल्मिकी जयंती आणि कुमार पौर्णिमेमुळे हिमाचल प्रदेश, ओडिशा, कर्नाटक आणि चंदीगडमध्ये बँका बंद राहतील.
10 ऑक्टोबर : करवा चौथनिमित्त हिमाचल प्रदेशात बँका बंद राहतील.
18 ऑक्टोबर: कटी बिहूनिमित्त, फक्त आसाममध्ये बँका बंद राहतील.
20 ऑक्टोबर: दिवाळी, नरक चतुर्दशी आणि कालीपूजेच्या निमित्ताने जम्मू आणि काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, आसाम आणि ओडिशा वगळता देशभर बँका बंद राहतील.
21 ऑक्टोबर : लक्ष्मीपूजन, दीपावली आणि गोवर्धन पूजनामुळे महाराष्ट्र, ओडिशा, मणिपूर, जम्मू-काश्मीर, सिक्कीम आणि मध्य प्रदेशमध्ये बँका बंद राहणार आहेत.
22 ऑक्टोबर: बुधवारी गोवर्धन पूजा, आयुध पूजा आणि विश्वकर्मा दिवस असे अनेक सण आहेत. या दिवशीन चंडीगढ़, दादरा और नगर हवेली, दमन आणि दिव, दिल्ली, गुजरात, लक्षद्वीप, पंजाब, तमिलनाडु, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये बँका बंद राहतील.
23 October: भाऊबीज,त्रगुप्त जयंती, लक्ष्मीपूजा भ्रातृद्वितिया आणि निंगोल चक्कूबा निमित्त सिक्कीम, पश्चिम बंगाल, मणिपूर, उत्तर प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील बँका बंद राहतील.
27 ऑक्टोबर: छठ पूजा (संध्याकाळची पूजा) उत्सवाच्या सन्मानार्थ, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमधील बँका या दिवशी बंद राहतील.
28 ऑक्टोबर: छठ पूजा (सकाळची पूजा) उत्सवांसाठी फक्त बिहार आणि झारखंडमधील बँका बंद राहतील.
31 ऑक्टोबर: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये बँका बंद राहतील.
ऑनलाइन बँकिंगचा करा वापर
आजकालच्या युगात, बहुतांश कामं ही डिजिटल पद्धतीने केली जातात. बँकांना सुट्ट्या असल्या तरी तुम्ही मोबाईल बँकिंग अॅप्स, इंटरनेट बँकिंग, ATM आणि UPI द्वारे विविध कामं करू शकता. तुम्ही खात्यातील शिल्लक तपासू शकता, तसेच NEFT, RTGS, IMPS किंवा UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करू शकता, बिले आणि EMI भरू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही डिजिटल केवायसीद्वारे फिक्स्ड आणि रिकरिंग डिपॉझिट उघडू किंवा बंद करू शकता, हरवलेले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ब्लॉक करू शकता, चेक बुक किंवा स्टेटमेंट ऑर्डर करू शकता आणि नवीन बचत खाते देखील उघडू शकता.
