AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Loan : कर्जदाराचा झाला मृत्यू तर व्याज भरणार तरी कोण? समजून घ्या बँकेचा तो नियम?

Loan Refund Rules : आजकाल घर,कार आणि इतर महागड्या वस्तुंसाठी कर्ज घेणे ही सामान्य बाब झाली आहे. कर्जदाराचा झाला मृत्यू तर व्याज भरणार तरी कोण? असा प्रश्न विचारला जातो. काय सांगतो बँकेचा नियम?

Bank Loan : कर्जदाराचा झाला मृत्यू तर व्याज भरणार तरी कोण? समजून घ्या बँकेचा तो नियम?
कर्ज परतफेड
| Updated on: Oct 25, 2025 | 2:47 PM
Share

Bank Loan Repayment : वाहन, घरासाठी वा इतर गोष्टीसाठी कर्ज काढणे ही सामान्य बाब झाली आहे. बँका कर्ज देण्यापूर्वी व्यक्तीचा आर्थिक इतिहास, त्याचे उत्पन्न आणि कर्ज फेडण्याची त्याची क्षमता याचा विचार करतात. पण जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मग कर्जाची परतफेड कोणाला करावी लागते. कर्जावरील व्याज कोणाला भरावे लागते असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. कुटुंबावर हे कर्ज फेडण्याची बांधिलकी आपसुकच येते का? काय सांगतो याविषयी बँकेचा नियम?

काय आहे वसुलीचा नियम?

जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँक सर्वात अगोदर सह अर्जदाराशी संपर्क करते. सह अर्जदाराचे नाव गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज यासाठीच्या अर्जावर असते. अनेकदा त्यासाठी संयुक्त कर्जखाते असते. जर सहकर्जदार हे कर्ज चुकवण्यासाठी सक्षम नसेल तर मग बँक हमीदाराशी (Guarantor) संपर्क करते.

जर हमीदार सुद्धा कर्ज फेडण्यासाठी, परतफेड करण्यासाठी नकार देत असेल तर बँक मयताच्या कायदेशीर वारसाशी (Legal Heir) संपर्क साधते. यामध्ये मयताचे कुटुंबिय, सदस्य, पत्नी, मुलं अथवा त्याचे आई-वडील यांचा समावेश असतो. बँक त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी नोटीस देते. स्मरणपत्रं पाठवते. पुढे जर याप्रक्रियेत प्रतिसाद मिळाला नाही तर मग कायदेशीर कारवाई करते.

बँक केव्हा संपत्ती जप्त करू शकते?

जर सहअर्जदार,हमीदार आणि कायदेशीर उत्तराधिकारी कोणीही कर्ज परतफेड करण्यास तयार नसेल तर बँक मयताची संपत्ती जप्त (Seizure) करते आणि ती विक्री करते.

गृहकर्जाच्या बाबतीत बँक थेट मयताची मालमत्ता, बंगला, फ्लॅट, घर जप्त करते. हे घर मग लिलावात विक्री करण्यात येते. त्यात बँक चांगला फायदा कमावते.

वाहन कर्ज असेल तर बँक वाहन ओढून नेते आणि त्याची लिलावाद्वारे विक्री करते.

वैयक्तिक कर्ज प्रकरणात बँक मयताची संपत्ती विक्री करुन कर्जाची परतफेड करते.

जर कर्ज विमा असेल तर काय होईल?

जर मयत व्यक्तीने कर्जावर विमा केला असेल तर त्याच्या मृत्यूनंतर पूर्ण कर्ज विमा कंपनी चुकते करते. त्याच्या कुटुंबियावर रुपयांचाही बोजा पडत नाही.

कर्ज फेडीसाठी जबरदस्ती?

बँक कायदेशीर उत्तराधिकाऱ्यावर कर्ज परतफेडीसाठी दबाव आणू शकते का? तर याचे उत्तर हो असे आहे. जर कायदेशीर वारस संपत्तीवर अधिकार सांगत असेल तर मग बँक त्या व्यक्तीला कर्ज जबाबदारीची जाणीव करून देते. जर व्यक्ती कायेदशीर वारस नसेल तर त्याच्यावर कर्ज परतफेडीसाठी कोणताही दबाव आणल्या जात नाही. पण जर त्याचा संपत्तीवर दावा असेल तर मग मात्र त्याला कर्ज परतफेडीसाठी बँकेला सहकार्य करावे लागते.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.