AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Holidays: कोरोनाकाळात बँकेत जायचा विचार करताय, त्यापूर्वी 8 सुट्ट्यांची यादी वाचली का?

शनिवार आणि रविवार जोडल्यास मे महिन्यातील पुढील दिवसात बँका एकूण 8 दिवस बंद राहतील.Bank Holidays in May

Bank Holidays: कोरोनाकाळात बँकेत जायचा विचार करताय, त्यापूर्वी 8 सुट्ट्यांची यादी वाचली का?
Bank Holidays In August 2021
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: May 09, 2021 | 11:53 AM
Share

मुंबई : भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशातील काही राज्ये सोडल्यास अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. त्यामुळे बँकाच्या कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. मे महिन्यातील राहिलेल्या दिवसांमध्ये खासगी आणि सार्वजनिक बँका एकूण 8 दिवस बंद राहणार आहेत. बँकांच्या विविध सुट्यांमुळे 4 दिवस बँका बंद राहतील. सुट्टीशिवाय प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. म्हणजेच शनिवार आणि रविवार जोडल्यास मे महिन्यातील पुढील दिवसात बँका एकूण 8 दिवस बंद राहतील.(Banks holidays in May bank will closed for eight days banks  due to various holidays)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वेबसाइटनुसार मे 2021 मध्ये बँकाना 9 दिवस सुट्टी राहणार होती. यापैकी 1 मे कामगार दिनाची सुट्टी होऊन गेलेली आहे. रमजान, बुद्ध पौर्णिमा अशा विविध उत्सवांमुळे बँका पुढील काळात बंद असणार आहेत.

कोणत्या दिवशी बँका बंद राहतील?

  • 9 मे: रविवार (संपूर्ण देशभरात)
  • 13 मे : या दिवशी ईद (ईद-उल-फितर) आहे. बेलापूर, जम्मू, कोची, मुंबई, नागपूर, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथे बँक बंद राहतील.
  • 14 मे : भगवान श्री परशुराम जयंती, रमजान-ईद, बसवा जयंती आणि अक्षय तृतीया यामुळे आगरतळा, अहमदाबाद, बेंगलुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, चेन्नई, देहरादून, गंगटोक. गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाल, जयपूर, कानपूर, कोलकत्ता, लखनऊ, नवी दिल्ली, पाटना, पणजी, रायपूर, रांची, शिलांग आणि शिमला येथील बँक बंद राहतील.
  • 16 मे: रविवार (संपूर्ण देशभरात)
  • 22 मे: चौथा शनिवार (संपूर्ण देशभरात)
  • 23 मे: रविवार (संपूर्ण देशभरात)
  • 26 मे: बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहरादून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर येथील बँका बंद असतील.
  • 30 मे: रविवार (संपूर्ण देशभरात)

कोरोना काळात बँकांच्या वेळा बदलल्या

देशामध्ये वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे बँकांमध्ये काम करण्याची पध्दत ही बदलेली आहे. कोरोना झोनमध्ये असलेल्या बँकांच्या कर्मचार्‍यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी सुविधा मर्यादित केल्या आहेत. यासह अनेक राज्यांतील बँकांचे कामकाजाचे तास कमी करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या:

Bank Holidays : मे महिन्यात 9 दिवस बँका बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी !

या सरकारी बँकेकडून ग्राहकांसाठी मोठं गिफ्ट, व्याज दरांमध्ये केली कपात

(Banks holidays in May bank will closed for eight days banks  due to various holidays)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो.

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो